पान:निवडक अंतर्नाद.pdf/३१९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाले असले तरी इतरांत आणि आपल्यात असलेला एक फरक आहे, तो म्हणजे – 'मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्हटलं । सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं ।' इतरांच्या जीवनात न आलेला 'जीवनाचे गाणे' बनण्याचा क्षण आपल्या जीवनात प्रेमसाफल्यामुळे आला, याची कृतार्थंता प्रकट करून हे आत्मकथन संपवले जाते. मानवी जीवनात प्रेमभावनेला लाभलेले असे असाधारण स्वरूप सांगितल्याशिवाय प्रेमासंबंधीच्या शहाणपणाचे मूल्य तरुणांना कळणार नाही म्हणून प्रेमाचे शहाणपण देणाऱ्या कवितांबरोबरच प्रेमाची महती सांगणाऱ्या कविता 'बोलगाणी' म्हणून पाडगावकरांनी लिहिल्या असाव्यात. प्रेम 'असे असे' असते एवढे कळणे पुरेसे नसते तर त्याचा प्रत्यक्षात अनुभव घेणे गरजेचे असते. 'गाणं कागदावरचं आणि आपलं' या बोलगाण्यातून हा संदेश पाडगावकर तरुणांना देतात. या कवितेत 'मुक्कामाला जाणे ही प्रतिमा प्रेमपूर्तीसाठी योजिली गेली आहे. ते विचारतात 'मला सांगा व्हायचं कसं? । मुक्कामाला जायचं कसं? घट्ट जवळ घेतल्याखेरीज । माणूस नसतं आपलं! । कोऱ्या कोऱ्या कागदावर | असलं जरी छापलं । ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं!' मग 'आपण ओठ लावल्याखेरीज पाणी नसतं आपलं आणि 'फुलपाखरू झाल्याखेरीज फूल नसतं आपलं' अशा प्रतिमांमधून प्रेमपूर्ती कशी केली पाहिजे याचे शहाणपण शिकवले जाते. प्रेम करत असताना प्रियकराला प्रेयसीच्या प्रेम करण्याच्या आणि प्रेम करवून घेण्याच्या पद्धतीचा अनुभव नसतो. त्यासाठी यासंबंधीचे तिचे मानसशास्त्र तरुणांना समजावून सांगण्याची गरज असते. 'खाली डोकं वर पाय या कवितेत हे शहाणपण मिस्किलपणे दिले गेले आहे. प्रेयसीच्या प्रकट बोलण्यातल्या अर्थापलीकडे आणि सूचित होणाऱ्या अपेक्षांच्यापलीकडे बरेच काही महत्त्वाचे असते आणि ते प्रियकराने समजून घेऊन प्रेमाची कृती करायची असते. पण हे अनेक प्रियकरांना लक्षात येत नाही. त्यासाठी 'खाली डोकं वर पाय चा कथनकर्ता अशा प्रियकरांच्या मदतीसाठी त्यांना सल्ला देऊ लागतो. तो म्हणतो : 'तिला जेव्हा वाटत असतं । तुम्ही जवळ यावं | जवळ यावं याचा अर्थ | तुम्ही जवळ घ्यावं!' पण हे न ओळखता - 'अशा क्षणी । चष्मा पुसत । तुम्ही जर शुद्ध काव्य बोलत बसला । व्यामिश्र अनुभूती । शब्दांनी तोलत बसला, । तर काय, । तर काय ? खाली डोकं वर पाय !!' ती जेव्हा पावसात भिजायचं म्हणते तेव्हा तुम्ही चिंब भिजून तिला घट्ट जवळ घ्यावं असा त्याचा अर्थ असतो. अशा वेळी जर तुम्ही खोकल्याचं औषध बाहेर काढलं तर काय? 'खाली डोकं वर पाय!' या कवितेत वारंवार येणाऱ्या 'खाली डोकं वर पाय!' या उक्तीतून प्रियकराचा भाबडेपणा आणि प्रेमासंबंधीचा अजाणपणा कथनकर्त्याने मिस्किलपणे प्रकट केला आहे. जीवनाला अर्थपूर्णता मिळवून देणाऱ्या आणि त्याचे गाणे बनवणाऱ्या प्रेमावर पारंपरिक समाजजीवनामध्ये अनेक बंधने घातली गेली आहेत. प्रेमासंबंधी अनेक निषिद्धे लागू केली गेली आहेत. त्यामुळे तरुणांना प्रेमाचा मुक्तपणे अनुभवच घेता येत नाही, तरुणांनी प्रेमासंबंधीची ही प्रस्थापित निषिद्धे नाकारली पाहिजेत आणि प्रेमावर लादलेली ही बंधने तोडली पाहिजेत. ३१८ निवडक अंतर्नाद पाडगावकरांची ही 'बोलगाणी' हे करू पाहणाऱ्या तरुणांच्या मदतीला येतात. या बोलगाण्यात प्रेम करणाऱ्या तरुणांची बाजू घेऊन त्यांचे समर्थन केले जाते. त्यासाठी 'म्हाताच्या पिढीच्या या वृत्तीला दूषण देणारे चार शब्द ऐकवले जातात. 'म्हाताऱ्या' च्या या वृत्तीचा उपास केला जातो. यासाठी प्रथम 'म्हातारपणावरचं तरुण गाणं' या बोलगाण्यातून म्हाताऱ्यांनाच प्रेमाचे शहाणपण शिकवले गेले आहे. या गाण्यातला कथनकर्ता म्हाताऱ्यांना विचारतो : 'आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे ?' आणि त्यांना सल्ला देतो की, आधी एवढंच तुमच्या कानात सांगतो । वय तुमचं साठ असो सत्तर असो । तिच्यासाठी फुलांची आणा वेणी; । मोरासारखा अंधार फुलून आल्यावर | मझा आणते थोडीशी काजूफेणी!' म्हाताऱ्यांना असा सल्ला देण्याबरोबरच पाडगावकरांनी जीवन समरसून जगलेल्या आणि म्हातारपणीही तसेच जगणाऱ्या आजोबांचे व्यक्तिचित्र 'नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं' या बोलगाण्यात रेखाटले आहे. आजोबांचा नातू या गाण्याचा कथनकर्ता आहे आजोबा नुकतेच देवाघरी गेले आहेत. परंतु त्यांच्या नातवाला त्यांची आठवण येते. याचे कारण माणसाने जसे जगायला हवे तसेच आजोबा जगत आले आणि जगण्याच्या प्रारंभावस्थेत असलेल्या या नातवाला त्यांचे हे जगणे भावले आहे. ते नातवाशी मित्रासारखे वागतात. त्यामुळे नातूही त्यांना 'आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?' असा प्रश्न विचारू शकतो आणि आजोबाही त्याला त्या खूप असल्याचे सांगतात आणि त्याचवेळी आजी तेथे आल्याबरोबर आपली जीभ चावतात, असे आजोबा सतत आपल्याशीच गाणे गुणगुणणारे, ढेकर दिल्यावर 'आय अॅम जस्ट देकेरिंग' असा पोरकट विनोद करणारे आणि नातवाला 'बेटा, एक लक्षात ठेव । एकटं एकटं जाता आलं पाहिजे । स्वतःला स्वत:शीच गाता आलं पाहिजे!' । असा उपदेश करणारे, म्हातारपणातही आपले मानसिक तारुण्य टिकवणारे, S परंतु अजून 'म्हातारी' न झालेली पिढीही जेव्हा म्हाताऱ्यांसारखे बोलू वागू लागते तेव्हा पाडगावकरांच्या बोलगाण्यांत त्यांचा उपहास केला जातो. 'प्रेम म्हणजे प्रेम असतं' या कवितेचा कथनकर्ता म्हणतो: 'प्रेमबीम झूठ असतं । म्हणणारी माणसं भेटतात आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच • मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही... त्याला वाटलं मला पटलं! ।' परंतु ते जरी असे वागत नसले तरी त्यांच्या मनात मात्र प्रेमाबद्दल, शृंगाराबद्दल दाबले दडपले गेलेले सुप्त आकर्षण असते. अशीच एक व्यक्ती यासंबंधीचा कबुलीजबाब 'खरं काय वाटतं त्याचं गाणं या बोलगाण्यात देत आहे हा कबुलीजबाब उपहासाच्या स्वरात व्यक्त केला गेला आहे. ती म्हणते : 'बाई आणि बुवा यांचं कुठेही जर लफडं दिसलं । मग मी तुमच्यासारखा कडक चिडतो, । उच्च नैतिक मूल्यांना तडक भिडतो!!' पण आपल्यालाही 'वाटत असतं, धडक देऊन तडक त्याला हाकलून द्यावा;। आणि मग तिच्याकडून हळूच तिचा पत्ता घ्यावा !!' प्रेम करत आपले 'गाणं' मुक्तपणे गाणाऱ्या तरुणांना विरोध करणाऱ्या 'म्हाताऱ्या' जगाला ताडन करणारा उपहास पाडगावकरांच्या 'तुमचं काय गेलं?' या आणि यासारख्या अनेक कवितांत केला गेला आहे आणि अशांकडे लक्ष न देता मुक्तपणे