पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जादू जयपूरच्या मृण्मयी जेएलएफचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हा फेस्ट पूर्णपणे मोफत आहे. झी, गूगल, ब्रिटिश एअरवेज, अॅमॅझॉन. इन, यूएन विमेन, डीएनए, दैनिक भास्कर, रेडिओ मिर्ची, पत्रिका ग्रूप, कोकाकोला, पर्यटन विभाग वगैरेंसारख्या तगड्या प्रायोजकांमुळेच हे साध्य होतं. परंतु म्हणून एकही पैसा न देता पाच दिवसांत खूप महत्त्वाचा असामान्य अनुभव एक सामान्य माणूस घेऊ शकतो, तेही सुस्थितीत, हे मान्य करावंच लागतं. साधारण सप्टेंबरमध्ये पुढच्या वर्षीच्या जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या (जेएलएफ) तारखा येतात. त्या आल्या, की जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पाच दिवस होणाऱ्या या फेस्टिवलला जाण्याची तयारी सुरू करायची, हे गेल्या तीन-चार वर्षांपासून ठरून गेलेलं विमान परवडणार असेल तर तिकीट लगेच काढायचं, ट्रेनने जायचं असेल तर नोव्हेंबरपर्यंत थांबायचं. हॉटेलही लगोलग बुक करायचं, मुख्य म्हणजे जेएलएफच्या वेबसाइटवर जाऊन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करायची. पुढचे दिवस वेळापत्रक कधी येणार, कोण लेखक/कलाकार असणार आहेत, याची माहिती मिळण्याची वाट पाहायची. वेळापत्रक डिसेंबरमध्ये येतं. ते पाहून काय काय चुकवून चालणारच नाही, याचा विचार करायचा. आपण जाणार आहोत, या विचारानेच येणारा थरार अनुभवायचा. ( मी जातेय बरं का, असं इतरांना सांगून जळवलं तर हा थरार अधिक जाणवतो, ह्य तीन वर्षांचा स्वानुभव!) एकीकडे थंडी कितपत आहे याचा अंदाज घेऊन ऊबदार कपड्यांची जमवाजमव करायची. (हो, मुंबईकरांना जमवाजमव करावीच लागते. आमच्याकडे वुलन्स वा थर्मल नसतात - नेहमी लागत नसल्याने.) आणि अखेर जेएलएफच्या पहिल्या दिवशी जयपूरला पोचायचं. डिग्गी पॅलेस या राजवाड्याच्या परिसरात गेली काही वर्षं हा फेस्टिवल भरवला जातो. जयपूरमधल्या रिक्षावाल्यांना तो अनेकदा माहीतही नसतो, कारण तो मुख्य रस्त्याच्या आत आहे. मग 'एसएमएस हॉस्पिटल के सामने असं सांगून चालतं. एसएमएस म्हणजे सवाई मानसिंग, जयपूरमध्ये या एसएमएसच्या नावाने अनेक संस्था आहेत. डिग्गी पॅलेसला पोचलं, की ह्यतातलं आपलं ओळखपत्र दाखवून आपल्या नोंदणीनुसार जेएलएफचं ओळखपत्र घ्यायचं नि गळ्यात अडकवायचं पुढचे पाच दिवस हे ओळखपत्रच आपल्यासमोर असीम आनंदाचा, माहितीचा खजिना उघडणार असतं. लिटफेस्टची ओळखपत्रासोबत मिळतं वेळापत्रक पाच दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सहा ठिकाणी प्रत्येकी तासभराची दीडशे ते दोनशे सत्रं होणार असतात. आपण एका वेळी एकाच ३२० निवडक अंतर्नाद ठिकाणी असू शकतो, हे आपलं सगळ्यात मोठं दुर्भाग्य असं वाटायला लावणाऱ्या व्यक्ती या सत्रांमध्ये बोलणार असतात. अशा वेळी हॅरी पॉटरची मैत्रीण हर्मायनी ग्रेंजर टाइमट्रॅव्हल करून अनेक विषय अभ्यासते, तशी सोय हवी होती, असं प्रकर्षांने वाटतं. उदाहरणार्थ, यंदा पहिल्या दिवशी जावेद अख्तर, होमी के. भाभा, जीत थयिल, देवदत्त पटनाईक, गिरीश कर्नाड अशी मंडळी वेगवेगळ्या सत्रांमध्ये होती. सकाळी सव्वा अकरा ते दीड या वेळेतल्या दोन सत्रांमध्ये. मग कुठलं तरी येडंबागडं लॉजिक लावून गिरीश कर्नाड चालेल हुकला तरी, पटनाईकांना ऐकू असं ठरवायचं नि त्या मांडवात जायचं. डिग्गी पॅलेसच्या अतिभव्य परिसरात बैठक आणि दरबार हॉल अशी दोन बंदिस्त सभागृहं आहेत. बऱ्यापैकी मोठी, दोनशेहून अधिक व्यक्ती एका वेळी मावतील अशी चार बाग, फ्रंट लॉन, मुगल टेंट व संवाद असे चार प्रचंड मांडव या पॅलेसच्या हिरवळींवर घातलेले असतात. त्यातला फ्रंट लॉन सर्वांत मोठा, हजारेक माणसं बसू शकतील व त्याहून थोडी कमी आजूबाजूला उभं राहू शकतील एवढा, चार बाग व मुगल टेंट त्याहून थोड्या कमी आकाराचे संवाद खूपच छोटा, एकटेच असलो तर ठरवणं सोपं असतं. आपल्या आवडीनुसार त्या मांडवात जायचं, जागा पटकवायची आणि फोन बंद करून फक्त कान/ डोळे उघडे ठेवायचे सोबत कोणी असेल तर आपापल्या आवडीनुसार ही सत्रांना हजेरी लावू शकतोच की आपण, किंवा तू 'तिथे', मी 'इथे' असं करायचं, 'तिथे' जास्त चांगलं वाटलं तर 'इथून जायचं, किंवा 'तिथ' ल्याला 'इथे' बोलवायचं. जेएलएफच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर दिलेल्या वेळेलाच सुरू होतो व संपतो. प्रत्येक मांडव पाचही दिवस साधारणपणे एकाच कार्यकर्त्यांच्या ताब्यात असतो. सत्र वेळेवर सुरू होणं व संपवणं ही त्याची / तिची जबाबदारी असते. आतापर्यंत मी उपस्थित राहिलेल्या तीन वर्षांत एखादंच सत्र उशिरा सुरू झालं असावं, दोन सत्रांच्या मध्ये १५ मिनिटं असतात. ती लोकांना एका मांडवातून दुसरीकडे जाता यावं यासाठी जेवणाची वेळ असते पाऊण तास, पण त्याही वेळात प्रत्येक मांडवात एखाद्या पुस्तकाचं प्रकाशन, गाणं, काहीतरी सुरू