पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देणारी गुंतवणूक नव्हे. हरवत चाललेल्या भाषा व लिप्या जिवंत राहणं, हाच या गुंतवणुकीचा परतावा आहे मराठीत आहे का असा कोणी? का नाही ? फेस्टिवलमध्ये नॉन-फिक्शन लिहिणाऱ्यांनाही मोठं महत्त्व असतं. व्यवसाय, अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण, चरित्र असे प्रकार हाताळणाऱ्यांना ऐकण्यासाठीही इथे खूप रसिक येत असतात. त्यांच्यात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. या • तरुणांना खूप प्रश्न विचारायचे असतात. त्यांचं वाचनही खूप असतं. याचा प्रत्यय देणारं एक सत्र होतं तरुण खन्ना या प्रिन्सटन विद्यापीठातील प्राध्यापकांच्या मुलाखतीचं! Billions of Entrepreneurs: How China and India are reshaping their future हे खन्ना यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या संदर्भातच या गप्पा होत्या, चीन आणि भारतातील उद्योजकांना कोणत्या परिस्थितीत राह्यवं लागतं, काय सोपं आहे, काय कठीण आहे, याचा ऊहापोह या वेळी झाला. भारतात चीनच्या संदर्भात लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत, पण चीनमध्ये भारताविषयी काही नाही, कारण आपण त्यांच्या दृष्टीने नगण्य आहोत. चीनमधल्या लोकांसाठी भारत म्हणजे बॉलिवूड नाच, बुद्ध आणि सॉफ्टवेअर, उद्योजकांसाठी मुख्य फरक जाणवतो तो पद्धतीमुळे. भारतातल्या लोकशाहीचे परिणाम आणि चीनमधल्या कम्युनिस्ट सरकारचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतात, तसेच फायदेही घेता येतात. खन्ना यांच्या या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर कम्युनिस्ट पक्षाकडून त्यांना त्यांच्या बीजिंग पार्टी स्कूलमध्ये भाषणाचं आमंत्रण आलं, तसंच पुस्तकाचा अनुवाद करण्याची परवानगीही मागण्यात आली. परंतु अनुवाद करताना कम्युनिस्ट पक्षाला नकारात्मक रंगवणारा भाग वगळायच्या अटीवर खन्ना अर्थातच नाही म्हणाले ( या आधीच तो भाग वगळून अनुवाद सरकार चालवण्याच्या तयार होता, ही गोष्ट अलाहिदा.) पण हे लक्षात घ्यायला हवं, की या पुस्तकाची दखल पक्षाने घेतली. त्याचा आपल्या उद्योजकांना फायदा कसा करून घेता येईल याचा विचार पक्षाने केला. भारतात अशा प्रकारचं proactive पाऊल कोणत्याच पक्षाने / सरकारने उचलल्याचं फारसं ऐकवात नाही माझ्यातरी, तसंच, तिकडे एखाद्या लहान उद्योजकाचा एखादा प्रयोग यशस्वी झाला तर तो मोठ्या प्रमाणावर कसा प्रत्यक्षात येईल, इतर उद्योजक त्याचा कसा फायदा घेऊ शकतील, यासाठी पक्ष/सरकारी पातळीवर प्रयत्न होतात. आपल्याकडे काय होतं, ते सांगण्याची आवश्यकता नाही. खन्ना यांना उपस्थितांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं, अनेक उद्योजकांना या गप्पांमधून चांगलीच स्फूर्ती मिळाली होती. भारतातल्या आजच्या घडीला लोकप्रिय असणाऱ्या व अनेक तशा भाषांमधून मोठा खप असलेल्या एक लेखिका म्हणजे सुधा मूर्ती. त्यांच्याशी गप्पा मारल्या नमिता गोखले यांनी बंदिस्त बैठक सभागृह्यत झालेल्या या सत्राला बच्चेकंपनीची मोठी गर्दी होती, तशीच मोठ्यांचीही. त्या आल्या तेव्हा एखाद्या स्यरला मिळाव्यात टाळ्या पडल्या. त्यांच्या लहानपणाबद्दल, आजी- आजोबांसोबत घालवलेल्या मूल्यवान सुट्यांबाबत त्यांनी लिहिले आहेच; परंतु, इकडच्या मुलांना प्रश्न होता, की त्यांच्या आजीच्या गोष्टींचा पुढचा भाग कधी येणार आहे. एका तरुण आईने त्यांना विचारलं, "नोकरी करणाऱ्या आईला मूल वाढवताना तुम्ही काय सांगाल ?" आयुष्य कसं जगावं, याचे मंत्र त्यांनी सांगितले, ते आपण अनेकांच्या तोंडून ऐकलेले असतात. परंतु, प्रचंड ऐश्वर्य असूनही सामाजिक भान ठेवून साधं बिनभपक्याचं आयुष्य जगणाऱ्या सुधाआजींकडून ते ऐकलं, की ते मंत्र महत्त्वाचे वाटायला लागतात. "पैसा आवश्यक आहे, परंतु प्रमाणातच. आपण स्वतःपुरती एक रेष आखून घेतली, की त्याच्या पलीकडचा पैसा ह्य गरजू लोकांना द्यावा. दान श्रद्धापूर्वक करावं. नात्यातल्याच माणसांना देणं म्हणजे दान नव्हे तू माझी पाठ खाजव, मी तुझी खाजवतो, असं झालं तर शेवटी पाठीवर जखम होते, " असं त्या म्हणाल्या तेव्हा अशा कितीतरी घटना डोळ्यांसमोरून तरळल्या. त्यांनी त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा उल्लेख केला, ज्याच्याबद्दल मला माहिती नव्हती, ते म्हणजे Beyond the Atlantic. अमेरिकेत असताना १९७८-७९मध्ये एकटीने केलेल्या प्रवासाबद्दल ते आहे. तुटपुंजी अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांमध्ये त्यांनी बॅकपॅकिंग केलं, त्या अनुभवांवरचं मूळ कानडी पुस्तक त्यांचं पहिलं. तो काळ लक्षात घेता, निदान आता तो वाचून असाच काही भटकंतीचा उद्योग करायला हवा, असं मला तीव्रतेने वाटलं. रक्कम हातात असताना टीमवर्कतर्फे जयपूरमधल्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांचीही निवड करून त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ही कंपनीच प्रसिद्धीचंदेखील काम पाहाते. सलग काही वर्षं एकच कार्यक्रम आयोजित केल्याने मिळणारा अनुभव फार मोठा असतो, आणि अनुभवाने माणूस शहाणा होतो, हे जेएलएफमध्ये दिसून येतं. मराठी साहित्य संमेलन दरवर्षी वेगळ्या ठिकाणची स्वागत समिती आयोजित करते, त्यामुळे मागच्या चुकांवरून शिकण्याची संधीच त्यांना मिळत नाही. त्यामुळेच दरवर्षी चुकांची/गोंधळाची पुनरावृत्ती होतेच. फेस्टिवलमध्ये अनेक कलाकारांना / चित्रकारांना त्यांची शिल्पं, चित्रं, installations मांडण्याची संधी मिळते. ती पाहायला फार मजा येते. डिग्गी पॅलेसमधल्या तरणतलावात, तो रिकामा करून अर्थात, ही शिल्पं उभारलेली असतात, किंवा एखाद्या मांडवात बाजूला असतात, सोबत त्या कलाकाराची पूर्ण माहिती असते, हे विशेष. यंदा प्रथमच मला मराठी ऐकायला मिळाली फेस्टिवलमध्ये, स्वच्छतागृहात जाण्यासाठी रांगेत उभं असताना मागे उभ्या असलेल्या दोघी मराठी बोलताना ऐकलं. त्या दोघी मुंबई / ठाण्यातल्या विद्यार्थिनी होत्या, इंग्रजी व मराठी शिकणाऱ्या १८ जणांचा गट करून ही मंडळी आली होती. पाच दिवस आमच्यासाठी मेजवानी आहे, असं त्या उत्फुल्ल चेहऱ्याने सांगत होत्या. मला हे खूप सकारात्मक वाटलं. जयपूर मुंबईपासून काही फार लांब नाही, निवडक अंतर्नाद ३२३