पान:निवडक अंतर्नाद.pdf/३२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काळालाही उपयुक्त ठरतील असे व्यवस्थापनाचे, अनुशासनाचे धडे देऊ शकतील अशा अनेक विषयांना सामावून घेणारा, कौटिल्याचा अर्थशास्त्र हा ग्रंथ हे संस्कृत वाङ्मयसागरातले आणखी एक देदीप्यमान रत्न, त्याला पारखलेले विद्वानही मोजकेच आहेत. प्राचीन भारतीय इतिहासाचा महत्त्वाचा दस्तैवज असणाऱ्या या ग्रंथात कितीतरी ज्ञानविज्ञान दडलेले आहे. मात्र संस्कृतच्या उत्तम ज्ञानाची किल्ली हस्तगत केल्याशिवाय हा खजिना उघडू शकत नसल्यामुळे आजची 'असंस्कृत' पिढी या ज्ञानापासून वंचित राहिली आहे. अजून कितीतरी मोती या महासागराच्या तळाशी पडून आहेत. मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांवर प्रकाश टाकीत, जगण्याची परिभाषा नेमक्या शब्दांत मांडणारी, जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करणारी असंख्य संस्कृत सुभाषिते संस्कृत वाङ्मयाच्या वैलक्षण्याला उठाव आणतात. आज मात्र त्यांची अवस्था एका सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, 'जीर्णमगे सुभाषितम् सुभाषित जागच्या जागीच जिरून गेले - अशी झाली आहे. प्राचीन संस्कृत कवींनी आपल्या सर्वंकष प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा चमत्कार दाखवण्याच्या उद्देशाने रचलेली चित्रकाव्ये, काव्यात्म कोडी यांसारख्या अनवट वाङ्मयप्रकारांच्या वाटेला जाणारे संस्कृत अभ्यासक हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच. जानेट अम् ही बर्कले विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच. डी. करणारी विद्यार्थिनी काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आली. तिला चित्रकाव्यांचे शास्त्र समजून घ्यायचे होते. तिला विचारले, "या नसत्या खटाटोपात का पडलीस?" ती म्हणाली, "ही चित्रकाव्ये समजू लागली की जगातल्या एका श्रीमंत, देखण्या, प्रमाणबद्ध भाषेची नजाकत आपल्याला कळली याचा विलक्षण आनंद होतो आणि याची बरोबरी करणारा कुठलाच आनंद नसतो." जो आनंद एक कोरियन विद्यार्थिनी लुटू शकणार आहे त्याला आम्ही 'सुसंस्कृत रसिकते' अभावी मुकणार आह्येत. संस्कृत हे जसे भाषेचे, वाङ्मयाचे नाव, तसेच ते एका संस्कृतीचे जीवनदृष्टीचे नाव आहे. एखादी भाषा आणि तिने जोपासलेले वाङ्मय जिथे जिथे रुजते तिथे तिथे त्या वाङ्मयाशी नाते सांगणारी संस्कृती उपजते, स्थिरावते युरोभारतीय भाषेच्या अभ्युपगमानुसार संस्कृतचे खानदान भारताबाहेर युरोप, मध्य आशिया या भूप्रदेशावर पसरले आहे; तिचे मूलस्थानही भारताबाहेर आहे तथापि वाड्मयाच्या रूपात ती भारतात स्थिरावली आणि त्यामुळे भारतीय भाषा म्हणून गणली गेली. संस्कृत वाङ्मयातून भारतीय संस्कृती अंकुरली विस्तारली. वैदिक किंवा हिंदू संस्कृती असे तिला संबोधले जाते. वास्तविक जैन आणि बौद्ध संस्कृतीसुद्धा या संस्कृतीचीच अंगे आहेत. या दोन्ही संस्कृतींच्या आविष्काराच्या प्रारंभीच्या भाषा जरी वेगळ्या होत्या तरी वैदिक संस्कृतीच्या पर्यावरणात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि त्या संस्कृतीशी संवाद साधण्यासाठी त्यांना संस्कृत भाषेचा अवलंब करावा लागला, इसवी सनाच्या प्रारंभीच्या शतकात बौद्ध धर्मप्रसारक श्रीलंका, जावा, सुमात्रा, थायलंड, चीन इत्यादी राष्ट्रांत पोचले होते. एका ऐतिहासिक वृत्तांतानुसार चौथ्या शतकात कुमारजीव ह्या पंडिताला चिनी अधिकारी लक्वांग चीनमध्ये संस्कृत ग्रंथांच्या चिनी अनुवादासाठी घेऊन गेला. ह्यूएनत्संग ६७१ साली भारतात यायला निघाला तेव्हा प्रथम वाटेत सुमात्रा बेटावरील श्रीवर्धन याठिकाणी थांबून संस्कृत संभाषण शिकला. चिनी यात्रेकरूंनी भारतातून संस्कृत हस्तलिखिते भरभरून चीनमध्ये नेली. बौद्ध धर्माचे बोट धरून भारतीय वैद्यकशास्त्र चीनमध्ये पोचल्याचे काही पुरावे प्राचीन चिनी दस्तैवजात आढळतात. डॉ. विजया देशपांडे या विदुषींनी अशा काही दस्तैवजांचा अभ्यास करून आपल्या पुस्तकात असे म्हटले आहे, की प्राचीन चिनी नेत्र चिकित्साशास्त्रावर भारतीय नेत्रचिकित्साशास्त्राचा खूप प्रभाव होता, संस्कृत वाङ्मय चीनप्रमाणेच तिबेट, म्यानमार, थायलंड इ. ठिकाणी पोचले. चिनी भाषेत भाषांतरित झालेल्या संस्कृत ग्रंथांची संख्या ४४४६ असून तिबेटन भाषेत १४६७ संस्कृत ग्रंथांचा अनुवाद झाला आहे असे एका लेखात नमूद केले आहे. यापैकी बहुसंख्य ग्रंथांची मूळ संस्कृत हस्तलिखिते नामशेष झाली असून सारनाथमधील तिबेटी विश्वविद्यालयासारख्या काही संस्थांमध्ये अनुवादावरून मूळ संस्कृत ग्रंथांच्या पुनर्रचनेचे काम चालू आहे बौद्ध धर्मप्रसारक जसे आशियाखंडाच्या काही भूप्रदेशावर गेले तसेच हिंदू पुरोहित, व्यापारी आणि राजघराण्यातले काही लोक स्थलांतर करीत जावा, सुमात्रा, बाली, कंपूचिया, व्हिएटनाम इ. प्रदेशांत जाऊन पोचले. त्यांनी बरोबर नेलेल्या सांस्कृतिक संचितात संस्कृत वाङ्मयाबरोबर कलावंत, कारागीर यांचाही समावेश होता. वैदिक धर्माच्या पालखीत बसून या भूप्रदेशावर अवतरलेल्या भारतीय संस्कृतीचे आविष्कार वाड्मयाबरोबरच शिलालेख, मंदिरे, वास्तुशिल्पे, कला इ. अनेक माध्यमांतून उमटले. महाभारताचा अनुवाद जावानीज भाषेत झाला. कंपूचियामधील ६ व्या शतकात खोदलेल्या एका शिलालेखात सोमशर्मा नावाच्या पुरोहिताने त्रिभुवनेश्वराला महाभारताची पोथी अर्पण केली आणि त्या मंदिरात तिच्या दैनंदिन पारायणाची सोय केली असा उल्लेख आहे. शेल्डन पोलक या अमेरिकन प्राच्यविद्या पंडिताने एका लेखात म्हटले आहे, की इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात आशिया खंडात पश्चिमेला पुरुषपुर (पेशावर) पासून पूर्वेला व्हिएटनामधील पांडुरंग आणि मध्य जावामधील प्रंबननपर्यंतच्या भूप्रदेशावर ठिकठिकाणी त्या त्या काळातल्या सत्ताधीशांचा दानशूरपणा व त्यांच्या अन्य गुणांची कीर्ती गाणारे शिलालेख हजारोंच्या संख्येत कोरले गेले. एकट्या कंपूचियामध्ये दीड हजाराहून अधिक संस्कृत शिलालेख असून फ्रेंच अभ्यासकांची एक तुकडी त्या शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तिथे तळ ठोकून होती. सम्राट अशोकाचे शिलालेख हे प्राचीनतम उपलब्ध शिलालेख असून ते प्राकृत भाषांमध्ये आहेत. यानंतरचे शिलालेख मात्र वर निर्देशिल्याप्रमाणे संस्कृतात आहेत याची कारणमीमांसा करताना पोलक, फिल्योझा इ. विद्वान म्हणतात, की वैदिक संस्कृती जेव्हा दक्षिणपूर्व आशियामध्ये विस्तारली तेव्हा तिच्या आकर्षक आणि प्रगत स्वरूपामुळे प्रभावित झालेल्या तिथल्या सत्ताधीशांनी तिचे स्वागत केले. संस्कृत भाषेचे माधुर्य, नेमकेपणा आणि, पोलक म्हणतो त्याप्रमाणे, अन्य कोणत्याही निवडक अंतर्नाद ३२७