पान:निवडक अंतर्नाद.pdf/३३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तलावातलं चांदणं या कथा अशाच या दुहेरी संस्कारांतून निर्माण झाल्या, रामायण, महाभारत, पुराणं इत्यादींचे संपन्न संस्कार जर माझ्या मनातून पुसले गेले तर मी लेखक म्हणून आणि माणूस म्हणून दरिद्री होईन. समाजजीवनातील आणि वैचारिक क्षेत्रातील बहुविधता स्वीकारायची या हिंदू समाजाला सवय असल्यामुळे अनेक विविध विचारधारा व वैचारिक पंथ या समाजात एकाच वेळी सहजगत्या अस्तित्वात असू शकतात. याच देशातल्या मुसलमानांना सलमान रश्दीचं पुस्तक स्वीकारणं, किंवा त्याच्या अस्तित्वाला व वाचनाला मान्यता देणं मंजूर नाही. त्यामुळे त्या पुस्तकावर आपल्या निधर्मी देशातही बंदी घातली जाते. पण रामावर वाटेल तशी टीका केली तरी ते इथे खपून जातं. हा बहुविधतेचा स्वीकार मुक्तपणे साहित्यनिर्मिती करण्यास अत्यंत उपकारक असतो. आणि या देशात बहुसंख्य हिंदू असल्यामुळेच असं वातावरण इथे नांदू शकतं. साहजिकच एक लेखक म्हणून हिंदुत्व नाकारणं मला उचित वाटत नाही. बहुविधतेचा स्वीकार करायची या देशात परंपरा असल्यामुळे आणि समाजरचनेत व समाजजीवनात बहुविधता असल्यामुळेच या देशात लोकशाही अजून टिकाव धरू शकली आहे. आणि ही लोकशाही आहे म्हणूनच मी या देशात मोकळेपणानं जगू आणि लिहू शकतो. अन्यायाची अस्पृश्यता हा ज्या समाजाचा अंगभूत भाग होता, स्त्रियांना ज्यात अत्यंत वाईट वागणूक मिळत असे तो समाज लोकशाही प्रकृतीचा आहे असं तुम्ही म्हणता तरी कसं? असा अगदी रास्त प्रश्न हे सगळं विवेचन वाचून कोणाला विचारावासा वाटेल आणि ते रास्तही होईल. आपल्या देशाच्या घटनेत आणि नंतर केलेल्या कायद्यांत हे दोष दूर करण्यात आले आहेत. आणि त्यावेळी उपकार केले असंच माझं मत आहे. बुद्धांची आध्यात्मिक भूमिका शंकराचार्यांनी बहुतांशी स्वीकारली होती. हिंदू परंपरेत समाविष्ट केली होती, पण सामाजिक पातळीवर त्याची शिकवण स्वीकारली गेली नव्हती. ती आता हिंदू परंपरेनं बऱ्याच अंशी प्रत्यक्ष व्यवहारातदेखील स्वीकारली आहे ती या परंपरेनं आता पूर्णांशाने स्वीकारावी आणि अधिक व्यापक समावेशक स्वरूप धारण करावं असं मला वाटतं. कारण बहुविधता, समावेशकता आणि परिवर्तनशीलता हे या परंपरेचे एकेकाळी विशेष होते असं मला वाटतं, आणि त्यामुळेच माझ्यातल्या निर्मितीक्षम कलावंताला ती आपलीशी वाटते. या प्रश्नाचं उत्तर दोन पातळ्यांवर देता येईल. जगातल्या इतर आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा पाहिल्या तर त्यातही स्त्रीला दुय्यम स्थान होतं असं आढळतं. आणि समाजातल्या खालच्या वर्गांना गुलामासारखं वागवायचं ही प्रथा सर्व मध्ययुगीन जीवनात आढळते. तेव्हा केवळ हिंदू परंपराच या बाबतीत दोषी आहे, असं म्हणता येणार नाही, पण ह्या युक्तिवादाला मी फारसं महत्त्व देत नाही. आपल्या देशाच्या घटनेत आणि नंतर केलेल्या कायद्यांत हे दोष दूर करण्यात आले आहेत. आणि त्यावेळी आपल्या पार्लमेंटमधले बहुसंख्य सदस्य सवर्ण होते आणि पुरुषही होते. गुलामगिरी नष्ट करायला अमेरिकेत एक यादवी युद्ध व्हावं लागलं हे ध्यानात घेतलं की, या गोष्टीचं यथार्थ महत्त्व ध्यानात येईल असं मला वाटतं. असो. मी काही हिंदू आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेचा सखोल शिस्तबद्ध अभ्यास केलेला नाही. तेव्हा या लेखातले विचार म्हणजे काही अभ्यासपूर्वक काढलेले निष्कर्ष नाहीत, पण मी या हिंदू परंपरेत जन्माला आलो, वाढलो, अनेक प्रकारे तिनं माझ्यावर संस्कार केले. पुढे तिच्यातील दोषांमुळे मी संतापलो. मी ती नाकारली, तरी मी ती झटकून टाकू शकलो नाही. महाभारत हा ज्या परंपरेचा भाग आहे ती मी कशी नाकारणार, झटकून टाकणार? माझ्या जीवनात पुनः पुन्हा तिच्या दीर्घ इतिहासाचं मला दर्शन घडत राहिलं. त्यातून व्यक्त होणाऱ्या तिच्या संपन्नतेनं, बहुविधतेनं आणि समावेशकतेनं मी भारावलो, स्तिमित झालो. विराट जीवनाचं विश्वरूपदर्शन तिनं मला घडवलं. मानवी जीवनातल्या अर्थपूर्णतेचा आणि अर्थशून्यतेचा प्रत्यय तिनं मला दिला. नैतिक समस्यांच्या चक्रव्यूहातून तिनं मला फिरवलं आणि त्यातून बाहेर पडायला अनेकदा मार्गच नसतो, असं दाखवून दिलं. मानवी जीवनाविषयीचे अनुत्तरित प्रश्नं तिनं माझ्यासमोर उभे केले. कलावंत म्हणून माझी रसिकता तिनं संपन्न केली. निर्मितीची बीजं माझ्या मनात पेरली. आयुष्याच्या दीर्घ प्रवासात निरनिराळ्या रूपांनी आपलं दर्शन तिनं मला घडवलं आहे. या सगळ्या अनुभवांतून हा लेख निर्माण झाला, आपल्या पार्लमेंटमधले बहुसंख्य सदस्य सवर्ण होते आणि पुरुषही होते. अस्पृश्यतेविषयी अशी उदार भूमिका हिदूंनी स्वीकारली असूनही आंबेडकरांना ती परंपरा नाकारावी आणि बौद्ध धर्म स्वीकारावा असं वाटलं हे अगदी खरं आहे आणि त्याबद्दल त्यांना दोष द्यावा असं मला मुळीच वाटत नाही. उलट तसं करून त्यांनी या देशातल्या हिंदू आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेवर फार ३३८ निवडक अंतर्नाद या परंपरेचं अगदी वेगळं, ती किती वाईट आहे हे दर्शविणारं चित्रही अनेकांनी काढलं आहे. त्यांच्याशी माझं भांडण नाही. एकाच परंपरेची अशी अगदी वेगवेगळी चित्रं मनात उमटणं शक्य असतं याची मला कल्पना आहे. कारण प्रत्येक परंपरेत बऱ्या आणि वाईट गोष्टी असतात. त्यातल्या चांगल्यांवर भर दिला तर ती चांगली ठरते आणि वाईटांवर दिला तर ती वाईट ठरते. हिंदू परंपरेच्या बहुविधतेमुळे असं करणं अधिक शक्य होतं. मला इतकंच वाटतं की अशा परिस्थितीत कोणत्याही परंपरेला केवळ चांगली अगर त्याज्य ठरवणं हेच मुळात चूक आहे. उलट व्यवहारात तरी या परंपरेचा चांगला भाग अधोरेखित करून तिला अधिक व्यापक व विकसनशील स्वरूप देणं आपल्या हिताचं आहे आणि ते सहजतः शक्यही आहे. (जून १९९७)