पान:निवडक अंतर्नाद.pdf/३४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राहील एवढं अंतर ठेवण्याचा नियमच आहे. इलाज नाही.' जेपींचा चेहरा पुन्हा त्रासिक झाला. 'ठीक आहे' असं म्हणाले आणि हात हलवून त्या लोकांना त्यांनी 'निघा' असं सांगितलं. धुळीचे फवारे येतच होते. वेग कमी करून ते चुकवण्याचा प्रयत्न आमचा ड्रायव्हर करत होता. जेपी मध्येच खोकत, पण आपल्याला त्रास होतोय हे ते विसरूनच गेले. काळाच्या ओघात माणसं येतात. काही टिकतात, काही टिकत नाहीत, काही माणसं त्यांच्या जाण्यानंतर थोडा काळ लोकांच्या लक्षात राहतात. काही माणसं बराच काळ, तर काही माणसं जवळपास कायम आठवणीत राहतात. शेक्सपीअर भारतात जन्मला नव्हता, त्यानं भारतासाठी वगैरे काहीही केलेलं नाही. त्याचा आपला काहीच संबंध नाही. तरीही त्याची आठवण आपल्याला येत राहते. मार्क्स नावाचा माणूसही भारतातला नाही, भारताचा त्याच्याशी संबंध नाही. पण त्या माणसानं जो काही उद्योग केला त्याचा साऱ्या जगावर परिणाम झाला. त्याची आठवण आपल्याला राहते. ज्ञानेश्वर, शिवाजी, ही माणसं जाऊन बरेच दिवस झाले, तरी त्यांची आठवण आपल्याला येते. आंबेडकरही आपल्या स्मरणात फार दिवस राहतील असं दिसतंय म्हणजे माणसांचं असं काहीतरी असतं जे आपल्याला उपयोगी पडतं, त्यासाठी आपण माणसांची आठवण काढतो. कोणाचे विचार, कोणाचे शब्द, कोणाचे सिद्धान्त, कोणाचं जोरदार जगणं यांतून इतर माणसं प्रेरणा घेतात, जेपींना जे कोणी व्यक्तिशः भेटले त्यांना जेपींच्या आठवण आजही येत राहील. कारण त्यांचं व्यक्तिमत्त्व हीच गोष्ट सर्वांत जास्त प्रभावी होती, विचार वगैरे गोष्टी त्यांच्यात विशेष नव्हत्या, जेपींच्या सहवासात येणारी माणसं झपाटून जात नसत, पण प्रभावित जरूर होत असत. जेपींसारखाच एक माणूस त्या काळात होता. एसेम जोशी (पान ३३९ वरून) या सगळ्या कार्यक्रमात बाजी मारली ती इंग्लंडनं, 'इंग्लंड' ही घोषणा झाली आणि क्षणार्धाचाही विलंब न करात इंग्लंडचे कन्यापुत्र लष्करी शिस्तीत मंचावर दाखल झाले. आपापसात मसलत करून सामूहिक गाणं ठरवताना त्यांची अजिबात पंचाईत झाली नसावी. एक इंग्लिशमन आपल्या गटासमोर उभा राहून कंडक्टरचे शिस्तबद्ध इशारे देत होता आणि सगळे जण एका आवाजात, एका लयीत, कसलीही चूक होऊ न देता आपलं गीत सादर करून मंचावरून खाली उतरले. टाळ्यांच्या गगनभेदी कडकडाट झाला. जणू काही जाकार्ताला येण्यापूर्वी शेती - अर्थशास्त्रज्ञांचा हा संघ महिनोन् महिने या गीताचा रिवाज करीत असावा असा निर्दोष आणि रेखीव कार्यक्रम इंग्लंडनं रुजू केला. हा फार अंतर्मुख करणारा अनुभव होता. आपल्या देशाला बांधणारी सूत्रंच नाहीत अशी विदारक जाणीव झाली आणि ही सूत्रं शोधण्याचा आपण नीट प्रयत्नही केला नाही हेही लक्षात आलं. परिषद संपल्यावर दोन दिवस मी जकार्तामध्ये राहिलो होतो. ३४४ निवडक अंतर्नाद असं त्याचं नाव. तोही मोठा मजेशीर व छान माणूस होता. त्याच्याही सहवासात आलेली माणसं प्रभावित होत असत. जेपी आणि एसेम यांचे संबंध जवळचे आणि जिव्हाळ्याचे होते. जेपी, एसेम यांच्याबद्दल जे काही होतं ते खरंखरं, जसंच्या तसं, मीठ-मसाला न लावता, त्यांचे महात्मे करण्याच्या खटपटीत न पडता लिहिलं, तर आजही ती माणसं लोकांच्या आठवणीत राहू शकतील. त्यांचा सहवास मिळालेली माणसं आता नाहीशी होत चालली आहेत. • अनेकांनी जेपींना जवळून पाहिलं आहे अनेकांनी कमी- अधिक प्रमाणात, कमी-अधिक दिवस जेपींच्या सहवासात काढले आहेत. त्यांच्या आठवणीत जेपी राहतील. मी काही तासच त्यांना जवळून पाहिलं आहे त्यांच्या सहकाऱ्यांना मी जमेल तेवढं खरवडलं आहे. पत्रकारितेच्या नादात खूप माणसं पाहिली, त्यात जेपी हे एक होते. छान माणूस होता. आठवण झाली की बरं वाटतं. पण आजचा काळ, आजचे प्रश्न, भविष्य यांचा विचार करायला बसलं की त्यांची आठवण होत नाही. जेपी आज असते तर बरं झालं असतं, ते आज असायला हवे होते, त्यांची देशाला गरज आहे असं माझ्या मनात येत नाही. त्यांच्या काळात त्यांनी कामगिरी केली. त्यांचा काळ ते उत्तम जगले. त्यांच्याबद्दल वाचायला आवडतं. गदगदून येत नाही, त्यांच्यावाचून अडतंय असं वाटत नाही. परिस्थिती खूप बदलली आहे. खूप वेगळी व गुंतागुंतीची झाली आहे. तिच्यातून वाट काढावी लागेल. एखाद- दुसऱ्या माणसाच्या चरित्रामधून वाट निघेल असं वाटत नाही. जेपीच काय, त्या त्या काळात झालेली इतरही बहुतेक मोठी माणसं या काळात उपयोगी पडण्यासारखी नाहीत. प्रत्येक काळाला स्वत:ची माणसं जन्माला घालावी लागतात, मागली माणसं उसनी आणून उपयोग होत नाही, (ऑगस्ट २००१, जयप्रकाश नारायण विशेषांक) त्या अवधीत एका भव्य राष्ट्रीय स्मारकगृहाला भेट दिली. पुरातन काळापासून अगदी सुकर्णो सुझर्तौ इत्यादींपर्यंतचा इतिहास तिथं चित्रांतून कोरलेला होता, त्या स्मारकगृहाला भेट देणारा इंडोनेशियन नागरिक फुगलेल्या छातीनंच बाहेर पडेल अशी सगळी व्यवस्था होती. इंडोनेशिया हा भौगोलिक दृष्ट्याही एक नसलेला, हजारो बेटांत विभागलेला देश; पण त्यानं राष्ट्रीय अभिमानाची काळजीपूर्वक जपणूक केलेली आहे. सूत्रं शोधलेली आहेत आणि त्यातली बरीचशी सूत्रं त्या मुस्लिम देशाला रामायण-महाभारतात सापडलेली आहेत हे आणखी एक आश्चर्य, गेली कित्येक वर्षं इंडोनेशियाचा आर्थिक विकासही आपल्या देशाच्या तुलनेत अधिक वेगानं होत आहे. हीही काही योगायोगाची गोष्ट नाही. (सप्टेंबर १९९८)