पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाते, की उच्चपदस्थांचे नैतिक पोखरलेपण आता इतके खोलवर जात चाललेय, की कार्यकर्त्यांनी संघटनेतल्या नेत्यांना म्हणजेच संघटनेला उत्तरदायी असले पाहिजे, हे ठामपणे सांगण्याची हिंमतही उरू नये, अनेक संस्था-संघटनांमध्ये तर आज हेही दिसते, की "तुम्ही मला प्रश्न विचारू नका, मी तुम्हांला विचारणार नाही" अशा काहीशा परस्परसामंजस्यातून व्यवहार चालतात. अशा सगळ्या वातावरणात कार्यकर्ते, त्यांच्या प्रेरणा, त्यांच्या मन- बुद्धीची मशागत, त्यांच्या क्षेमकुशलाची चिंता हे विषय कितीतरी संघटनांच्या अजेंड्यावरून अदृश्यच झाले आहेत. महाराष्ट्रातल्या त्याच महानेत्याने "फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्मदंडाच्या प्रश्नावरून लोक रस्त्यावर येतात हे दुर्दैवी आहे" असेही विधान केलेय. खुद्द त्या नेत्यासह सर्वचजण हे जाणतात, की विचारांचा वारसा महापुरुषांचा नुसता उदोउदो करून रुजत नाही. त्यासाठी दीर्घ पल्ल्याचा विचार करून आणि मूल्यांशी तडजोड न करता धीरोदात्तपणे काम करणारे कार्यकर्ते जपावे लागतात, फुलवावे लागतात! स्वयंसेवी सामाजिक कार्यात या पद्धतीने काम करणारे काही एकांडे शिलेदार आजही आहेत. आजूबाजूच्या विलक्षण असुरक्षित, गुंतागुंतीच्या, आणि गोंधळात टाकणाऱ्या वातावरणात त्यांनी शोधलाय तो पावलांपुरता प्रकाश आणि कमालीच्या चिकाटीने त्यांचा सुरू आहे तो एक प्रकारचा 'कदमताल'! स्वत:ची स्वायत्तता, स्वातंत्र्य, स्वयंपूर्णता यांच्या बळावर मोठ्या हिमतीने ही मंडळी उभी आहेत. पण त्यातून अवघ्या समाजाला सामावून घेणारी चळवळ वगैरे उभी राहण्याची शक्यता तशी धूसरच. प्रकारच्या आपली स्वयंपूर्णता जपत, एक निमव्यावसायिकनिष्ठ पद्धतीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यत्वे एन. जी. ओ. क्षेत्रातील मंडळींचा समावेश आहे. या क्षेत्रात इतके विविध प्रकार आहेत, की कोणतेही सामान्यीकरण करणे कठीणच. काहींनी खरोखरच आदर्श कामे उभी करून स्वयंसेवी क्षेत्राच्या विश्वासार्हतेत भर घातली आहे. याउलट अनेकांनी या क्षेत्राला जन्मतःच लाभलेल्या आणि अजूनही न लोप पावलेल्या 'सेवाभावी' वलयाशी कोणतेही इमान न राखता चक्क दुकानदारी चालविली आहे समाजकार्य महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेल्या आणि उराशी, निदान सुरुवातीला तरी निखळ सेवाकार्याच्या समाधानाचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक तरुणांना एन.जी.ओ. क्षेत्राचा भूलभुल्लैय्या असा खिळवून ठेवतो, की अवघ्या काही वर्षांतच 'कार्यकर्त्यां' चा 'कर्मचारी' होतो. राजकारणाप्रमाणेच क्षेत्रालाही एक प्रकारच्या बुद्धिमांद्यासारख्याच भावमांद्याने ग्रासले आहे. विलक्षण मनापासून ध्येयधुंद होऊन काम करावे, आनंदाने परिश्रम झेलावेत, स्वत:चे, सहकाऱ्यांचे मनस्तापही सांभाळावेत, कटकटींचा सामना करावा आणि परिवर्तन घडविण्याची जिद्द हरपू न देता दिवसअखेर विलक्षण समाधानाने, नव्या दिवसाची नवी स्वप्ने पाहत झोपी जावे, ही खरे म्हणजे हाडाच्या कार्यकर्त्यांची भावनिक गरज. पण या भावनेची, बावनकशी समाधानाची भूकच लागत नसेल तर कुठले परिश्रम, कुठली जिद्द आणि कसले समाधान ? राजकारणात या ३५० निवडक अंतर्नाद आणि स्वयंसेवी क्षेत्रातही परिवर्तनाची तहान असलेला आणि समाधानाच्या भावनेने भूक हरपून काम करणारा वर्ग घटतो आहे सार्वजनिक जीवनातल्या कार्यकर्तावृत्तीला कसर लागण्याचे हे एक महत्वाचे कारण म्हणता येईल. राजकारण असो वा सामाजिक कार्य, आजच्या कार्यकर्त्यांना वा आज नेतेपदी पोचलेल्या कालच्या कार्यकर्त्यांनासुद्धा मुदलातच परिवर्तनाची अशी भूक लागतच नसेल, हे संभवत नाही. काळाच्या ओघात वरती खूपशा जाड थराच्या स्वरूपात राख साचलेली असली, तरी ध्येयवादाचा, सच्च्या प्रेरणेचा निखारा सर्वदूर ठार विझलेलाच असेल असे मानण्याचे कारण नाही. पण बदलत्या काळात निखाऱ्यात नुसती धुगधुगी असणे पुरत नाही, तसे ते पूर्वीही कधी पुरे पडत नव्हतेच! पण अस्तित्वाच्या लढाईत दुविधांच्या दगडांना ठेचकाळत मार्गक्रमणा करणारा कार्यकर्ता ●आपल्याच मनाची समजूत घालत एका मागोमाग एक तडजोडी करत जातो, तेव्हा मनाच्या गाभाऱ्यात उठणारी नैतिक पोखरलेपणाची समांतर रेषा निखाऱ्याची धग आणखीनच सौम्य करते. सुरुवातीचा तत्त्वांचा आग्रह आपली तत्त्वे आपल्या व्यवहारातून दिसावीत यासाठी धडपड, आणि ही धडपड फारशी जमत नाही या जाणिवेतून होणारी मनाची तडफड हे सारे त्याच्याच आतल्या आवाजाच्या साक्षीने मंदावत जाते. अशा अवघड वाटेवरच मग प्रारंभकाळातले तरुण, संवेदनशील मन कदाचित त्याच्याही नकळत 'अश्रद्ध' बनू लागते. स्वतः स्वीकारलेल्या तडजोडवादाच्या समर्थनासाठी हे मन चळवळीतल्याच इतरांच्या वर्तनाचा आधार शोधू लागते, नेमक्या याच अवस्थेत त्याला गरज असते ती सावरणाऱ्या हातांची, विवेकाच्या मार्गावरून ढळू न देणाऱ्या एक मित्राची आणि मार्गदर्शकाची बहुसंख्य चळवळींमधल्या नेत्यांच्या वा कार्यकर्त्यांच्याही परस्परसंबंधांची आजची स्थिती पाहता अशा मित्र- मार्गदर्शकाची उणीव ही आज आपल्या संस्था-संघटनांची आणि पर्यायाने एकूणच सार्वजनिक जीवनाची मोठीच उणीव झाली आहे. एकेकाळी उमेदीने, निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आज अनेकदा ढेपाळलेले तरी दिसतात किंवा परिस्थितीपुढे शरण जाऊन तडजोड हाच धर्म मानत, वारा वाहील तशी पाठ फिरवून बदलांना सामोरे गेलेले दिसतात. जे थकतात, गोंधळून जाऊन थबकतात, निराश होतात, त्यांना पाठीवर हात फिरवून दिलासा देणारे आणि 'चकमक हरला असलास तरी लढाई अजूनही जिंकता येईल असे मनःपूर्वकतेने, तळमळीने आणि 'कन्व्हिसिंगली' सांगणारे आज दुर्मिळ आहेत. सुट्यासुट्या, एकेकट्या माणसांच्या संस्था- संघटनांमध्ये समोर दिसत असूनही, घरंगळणाऱ्यांना सावरणारी माणसेच नसणे ही खरी समस्या आहे. कर्ता नसलेली कुटुंबे, ती हीच ! घसरणाऱ्या वा सामाजिक आणि खरे म्हणजे राजकीय कामासंदर्भातसुद्धा आज एका चाकोरीबाह्य आणि व्यावसायनिष्ठ दृष्टिकोनाची गरज आहे. एकेकाळी गरिबीचे उदात्तीकरण करण्याची लाट होती आणि बहुधा त्याचीच प्रतिक्रिया म्हणून की काय आज साधी राहणी, मूल्य म्हणून सहजासहजी लोकांच्या गळी उतरत नाही, या मूल्याबद्दलची सखोल आणि समग्र जाणच संपत चालल्यामुळे