पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पावसाच्या अनिश्चिततेमुळे विज्ञाननिष्ठा शेतकऱ्याच्या अंगी बाणूच शकत नाही. शेतातले पीक आणि परिणामतः कच्च्याबच्च्यांचे जीवनच पावसाच्या पडण्यावर वा न पडण्यावर अवलंबून आहे. या जाणिवेमुळे विज्ञाननिष्ठा त्याच्या बुद्धीला पटली तरी मनाला पटू शकणार नाही. आधुनिक औषधोपचार जवळपास उपलब्ध नाहीत, असले तरी परवडत नाहीत, म्हणून तर त्याला जवळ असेल त्या वैदू- भोंदूचे औषधपाणी करावे लागते. आपल्या प्रियजनांना उत्तमातले उत्तम औषधपाणी करणे आपल्याला जमले नाही, ही मनाला घरे पाडणारी जाणीव विसरण्यासाठी वैदूभोंदूंच्या प्रभावाच्या कथा रचाव्या लागतात, आणि स्वतःलाही त्यावर विश्वास ठेवावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पीकबुडीपासून शेतकऱ्याला संरक्षण मिळेल, म्हणजे वास्तविक उत्पादनखर्च भरून निघण्याची शाश्वती मिळेल, त्या दिवशी या शेतकऱ्याला विज्ञाननिष्ठा शिकवण्याची गरजच राहणार नाही. बरेच स्वयंस्फूर्त कार्यकर्ते हिंदुत्ववादी वा राष्ट्रवादी चळवळीत काम करताना दिसतात. आपला देश हे एक राष्ट्र आहे ही भावना जोपासण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तरीही अनेक विघटनवादी शक्ती देशात आढळतात. देशात अशी फुटाफूट का झाली? ज्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक जातीजमातीतल्या भर उमेदीतल्या तरुणांनी हसत हसत मरणालादेखील कवटाळले त्या देशातल्या तरुणांच्या मनातील देशभक्ती एकदम आटून कशी गेली? पाकिस्तानबरोबरच्या लढ्यांत चार चार वेळा इतर जवानांच्या बरोबरीने शीख 'हिंदुस्थान' बद्दल एकदम एवढ्या चिडीने का बोलू लागला? भारतीय लष्करात परम शौर्य गाजवणारे गुरखे एकदम एवढे नाराज का झाले? मुस्लिम जमातीचा प्रश्न आणि दलितांचा प्रश्न पेटतच का राहिले ? लढणारा तरुण सगळ्या भूमिहीन शेतकऱ्यांचे आणि छोट्या कारागिरांचे प्रश्न सुटल्याखेरीज सर्वसामान्य मुसलमानाच्या मनातील असुरक्षिततेची आणि कोंडले गेल्याची भावना दूर होणे कठीण आहे. मग तो सहजपणे आर्थिक विकासापेक्षा 'आखिरात' जास्त महत्त्वाची आहे असे निकराने सांगू लागतो. या वातावरणाचा फायदा त्यांचे शहरी पुढारी घेतात. परिणामतः, स्वातंत्र्याच्या एखाद्यातरी प्रकाशकिरणाकरिता मनात आक्रंदणाऱ्या मुसलमान मायबहिणीसुद्धा 'शरियत चे समर्थन करू लागतात. मुस्लिम समाजाचे अर्थकारण करणारा नेता जन्मलाच नाही, हे मोठे दुर्दैव आहे. हिंदू आणि मुसलमान यांच्यातील प्रश्न सोडवणे खरोखरच बिकट आहे. मुसलमान जमातीचे काही मूठभर नेते शहरात राहतात, व्यापार - धंदा करतात आणि त्यांतील काही चांगले धनाढ्यही आहेत. पण सर्वसाधारण मुसलमान दलितांपेक्षाही दलित आहेत. खरे सांगायचे तर त्यांच्यातील अनेकांचे पूर्वज भणंग दारिद्यामुळेच धर्मांतराकडे वळले. धर्म बदलल्याने आर्थिक हलाखी संपली नाही, पण इस्लामने थोड्या फार प्रमाणात 'माणूस' म्हणून आत्मसन्मान आणि अभिमान दिला. गावातला मुलाणी, छोटय शेतकरी, कारागीर, विणकर, रिक्षावाले आणि छोट्यामोठ्या कारखान्यांत काम करणारा असंघटित मजूर हे भारतातल्या मुसलमानांचे प्रातिनिधिक चित्र आहे. दलितांना मिळणाऱ्या सोयीसवलतीही त्यांना नाहीत. बहुसंख्याक समाज त्यांच्याकडे संशयाने पाहतो. संशयातून दुरावा तयार होतो आणि त्यातून पुन्हा संशय - अशा दुष्टचक्रामुळे दोन समाजांत एक अक्राळविक्राळ दरी सतत रुंदावते आहे. दलितांची परिस्थितीही काही फार वेगळी नाही. हिंदू समाजापासूनची त्यांची फारकत काही बाबतीत थोडी कमी, तर काही बाबतीत पुष्कळ जास्त गावच्या वतनदार महाराला चावडीसमोर कमरेत वाकून जावे लागे; पण तोच मुसलमान बनला तर जोडे घालून थेट चावडीपर्यंत जाऊ शके, मीनाक्षीपुरमचा हाच धडा आहे. इस्लामने त्याच्या आश्रयाला आलेल्यांना काही प्रमाणात सन्मान दिला. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे बुद्धाला शरण गेलेल्यांना तशा सन्मानाचे भाग्यही मिळाले नाही. दलितांत फारसे कुणी मोठे व्यापारी, कारखानदारही नाहीत. समाजाचे नेतृत्व राजकीय सत्तेच्या काही दलालांकडे आणि राखीव जागेच्या धोरणाचा फायदा मिळालेल्या काही भाग्यवान नोकरदारांकडे मुस्लिम नेतृत्वाप्रमाणेच दलित नेतृत्वालासुद्धा चिंता आहे ती दलितत्व संपवण्याची नाही, तर आपले नेतृत्व टिकवण्याची. अंधश्रद्धा ही नेहमीच भोवतालच्या वास्तवाशी निगडित असते. अनिश्चितता आणि अज्ञान यांतून ती जन्माला येते. हे वास्तव बदलल्याशिवाय, केवळ आंदोलन करून ती दूर होईल असे समजणे, हीच मोठी अंधश्रद्धा आहे. आजपर्यंत शेतकरी संघटनेमध्ये मला जो अनुभव आला त्यावरून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, की या देशातील सामान्य माणसाच्या मनामध्ये कुठेही जातीयवाद नाही, भाषावाद नाही, धर्मवाद नाही. हे सर्व क्षुद्रवाद केवळ स्वार्थी राजकारण्यांनी जोपासून ठेवले आहेत. सर्वसामान्य माणसे अर्थवादाच्या पायावर आवाज उठवू लागली, की ही मंडळी क्षुद्रवादाची भुतावळ उठवून त्यांना अर्थवादापासून दूर नेतात. देशातली गरिबी हटली, देशातील सर्व घटकांचा विकास होत राहिला तर यांपैकी एकही भांडण होणार नाही. आपल्या देशातले एखादे राज्य म्हणते, की आम्हांला फुटून जायचे आहे अमेरिकेतले एखादे संस्थान असे म्हणते का? मुळीच नाही. तिथेसुद्धा अनेक धर्मांची, पंथांची माणसे आहेत; अनेक राज्यांची आहेत, पण तिथे असे कुणी म्हणत नाही. उलट, अमेरिकेतील संस्थान असणे ही प्रतिष्ठेची, सन्मानाची गोष्ट समजली जाते. अशी भावना आपल्याकडे निर्माणच होऊ शकली नाही, कारण आम्ही गरिबी हटवू शकलो नाही. मी हिंदू घरात जन्मलो, ब्राह्मण घरात जन्मलो. आयुष्यातील पहिली अठरा-वीस वर्षे सगळे धर्माचार केले, स्नानसंध्यादी विधी केले, पाठांतरही केले. आज मी यांतले काहीही करत नाही. निवडक अंतर्नाद ३५३