पान:निवडक अंतर्नाद.pdf/३५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश्वाच्या उत्पत्तीसाठी, जीवमात्राच्या उत्क्रांतीसाठी आणि मनुष्यसमाजाच्या विकासासाठी कोणी परमेश्वरी शक्ती असण्याची मला शक्यताही दिसत नाही आणि आवश्यकताही वाटत नाही. माझ्यासारखा माणूस कोणत्याही धर्मात चालण्यासारखा नाही. प्रत्येक धर्माची एक पोथी असते, एक प्रेषित असतो आणि त्याने मांडलेली आचारविचारांची एक नैतिकता असते. ज्या काळात पोथी लिहिली गेली तो काळ सगळा बदलला तरी प्रेषितांचे उत्तराधिकारी त्याच आचरणनियमांचा आग्रह धरतात, यहुदी, ख्रिस्ती, मुसलमान, गांधीवादी, मार्क्सवादी हे असे बांधीव धर्म आहेत. त्यांच्यात माझ्यासारख्या यात्रिकाला जागा नाही. हिंदुबहुसंख्य देशात मुसलमान राष्ट्राध्यक्ष, शीख पंतप्रधान आणि रोमन कॅथॉलिक महिला राज्यकर्त्या पक्षाची अध्यक्षा हे फक्त हिंदू बहुसंख्य देशातच संभवते. असे उदाहरण जगात इतरत्र कोठेही दिसणार नाही. आज हिंदुत्वाचा झेंडा घेऊन नाचणारे खरे म्हटले तर हिंदुत्वाला छोटे करू पाहत आहेत, निव्वळ बंदिस्त धर्माचे स्वरूप देऊ पाहत आहेत. पण, माझ्यासारखा यात्रिक हिंदू राहू शकतो. नरबळींनी चामुंडा मातेला प्रसन्न करू पाहणाऱ्या अघोर भक्तांपासून श्वासोच्छ्वासात जंतू तर मरत नाहीत ना अशी चिंता बाळगणाऱ्या साधूंपर्यंत कोणीही हिंदू असू शकतो. कारण, हजारो वर्षे हिंदू हा शब्द एका खुल्या प्रयोगशाळेचे नाव आहे. हिंदू हा बंधने घालणारा बांधीव धर्म नाही. हिंदू ही एक संस्कृती आहे. ३५४ निवडक अंतर्नाद बरेच हिंदुत्ववादी स्वदेशीच्या प्रचारासाठी काम करीत असतात, वस्तुस्थिती अशी आहे, की आपण जर परदेशी मालावर बंदी घातली तर जगातील इतर देश हिंदुस्थानाशी एकतर्फी व्यापार थोडाच चालू देणार आहेत? आपण बंधने लादली तर तेही लादतील आणि थोड्याच काळात हिंदुस्थानचा आंतरराष्ट्रीय व्यापार संपुष्टात येईल. मग प्रश्न असा उभा राहतो, की जगाला आपली गरज जास्त, की आपल्याला जगाची गरज जास्त? हिंदुस्थानकडून एक पैशाचाही माल न घेतल्याने जगाचे काहीही बिघडणार नाही. पण, परदेशांशी संबंध तोडल्यास तीन महिने ल रेटणे हिंदुस्थानी उद्योगधंद्यांना अशक्य होईल. कोणी म्हणते, पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी आली आणि देशावर अंमल बसवून गेली; नव्या बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच करतील. डॉन क्विक्झोटप्रमाणे मनाने मध्यम युगात वावरणारी ही माणसे आपले स्वातंत्र्य नकली आहे, तकलादू आहे. विलायती सत्तांचे सामर्थ्य इतके मोठे आहे, की लष्करी सत्ता मिळवण्याचे त्यांनी मनात आणले, तर २४ तासांत लाल किल्ल्यावर त्यांचा झेंडा फडकू शकतो. 'पाश्चिमात्यांना वसाहती नकोशा झाल्या म्हणून केवळ आपण स्वतंत्र आहोत ही दुःखद जाणीव स्वदेशी वाल्यांना नाही. ते आपले त्यांच्याच गुर्मीत राहतात. आजच्या अवस्थेतील हिंदुस्थान चालवण्यासाठी टेंडर काढले तरी ते भरण्यासाठी साय जगात कोणीही पुढे येणार नाही; पैसा आणि रक्त खर्चून हिंदुस्थानवर सत्ता गाजवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वतःची सोय पाहत राहणे, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅचवर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची त्यांची आत्ममग्न प्रवृत्ती हे सगळे विचारात घेता, अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मी स्वतःला महात्मा फुल्यांचा पाईंक समजतो. इतिहासाचा अर्थ सलगपणे, सुसूत्रपणे लावण्याचे पहिले काम महात्मा फुल्यांनी केले. अगदी विष्णूच्या मत्स्यावतारापासून ते वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडापर्यंत, 'शूद्रांची गुलामगिरी' ह्या एकसूत्रात त्यांनी सर्व घटना गुंफून दाखवल्या राष्ट्रवादी आघाडीची पर्वा न करता त्यांनी मोगलांना शूद्रांच्या मुक्तीचे श्रेय दिले आणि राष्ट्रवाद्यांच्या महापुरुषांवर कडाकड आसूड ओढले. महात्मा जोतिबा फुल्यांच्या इतिहासमांडणीला संशोधनाचा वा कागदोपत्री साधनांचा आधार नव्हता. अशा तऱ्हेचा पुरावा पाच हजार वर्षांचा इतिहास लिहिणायला मिळवणे शक्यही नव्हते.