पान:निवडक अंतर्नाद.pdf/३६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुळात आदर्श, सुखी, शांतिपूर्ण समाज ही कल्पनाच हास्यास्पद आहे. मनुष्यप्राणी संपूर्ण सुखी होऊच शकत नाही. कधी काळी तो असा सुखी झाला, तर त्या कारणानेच तो दुःखी होईल, विरोधविकासवादाच्या जनकालासुद्धा परिपूर्ण समाजाचे स्वप्न रंगावावेसे वाटले, याचे आश्चर्य वाटते. समाज एका दोषास्पद अवस्थेतून दुसऱ्या दोषास्पद अवस्थेकडे जातो. जुने दोष समाजविकासाच्या आड येतात, तेव्हा त्यांना दूर केले जाते. या प्रयत्नांना वाचा हवी असते, ती वाचा पुरवण्याचे काम तत्कालीन पैगंबराकडे जाते. मग प्रश्न निर्माण होतो तो हा, की परिवर्तनात थोर व्यक्तींनी नेमकी काय भूमिका बजावली ? 'पैगंबरा' च्या विचारांच्या आधारे समाजपरिवर्तन घडून येते, ही कल्पना पूर्णपणे भ्रामक आहे. रूसो, वॉल्टेअर यांच्या विचारांनी फ्रेंच राज्यक्रांती घडली नाही, मार्क्समुळे रशियन क्रांती घडली नाही, गांधीवादामुळे भारतातील स्वातंत्र्यचळवळ उभी राहिली नाही. समाज स्वतःच परिवर्तनाची दिशा ठरवत असतो, मार्गक्रमण करीत असतो. मार्गक्रमांचे समर्थन करणारा सोयीस्कर विचार आसपासच्या विचार मंडीत शोधला जातो, आवश्यक तर उत्खनन करून काढला जातो. वाळवंटातील भटक्या टोळ्यांना इस्लामप्रसाराचे तत्त्वज्ञान सोयीस्कर होते. सर्व युरोपखंडात एकेकाळी प्रभुत्व असलेल्या, पण औद्योगिक विकासात मागे पडलेल्या रशियाला समाजवादी औद्योगिकीकरणाचा विचार रुचणारा होता. इंग्रजांना हटवून त्यांची जागा पटकावू पाहणाऱ्या हिंदुस्थानातील नव्या व्यापारी, पांढरपेशा, कारखानदार वर्गाला गांधी तत्त्वज्ञान सोयीस्कर होते. त्या त्या वेळच्या आर्थिक गरजांनी स्वतःसाठी तत्त्वज्ञान निवडले, तत्त्वज्ञान्यांनी आर्थिक व्यवस्थेला गती दिली नाही. रशियात मार्क्सवादाचा पराभव झाला, हे म्हणणे चूक आहे. गांधीवादही भारतात हरला नाही. मुळात या विचारांचा प्रयोग रशियात, भारतात झाला हे म्हणणे चूक आहे. या देशांत जे घडले त्याला मार्क्सवाद वा गांधीवाद अशी एक सोयीस्कर पाटी लावण्यात आली आहे. 'सुभाष केशकर्तनालय' चा सुभाषचंद्र बोसांशी जितका संबंध तितकाच या देशांतील घटनांचा मार्क्सशी वा गांधींशी संबंध, कल्पना मनात दृढ झालेली. त्या कामगारवर्गाला क्रांतीसाठी उद्युक्त करावयाचे तर त्यांच्याच शोषणाच्या पायावर अर्थशास्त्र उभारावयास पाहिजे. त्याला वर्गजाणिवेसारखी (Class consciousness), तादात्म्यासारखी (non-alienation) मार्क्सच्या जडवादात अजिबात न सामावणारी कल्पनाही तयार करावी लागली. कोणत्याही व्यवस्थेच्या उत्पत्ती स्थिती लयाची मीमांसा करणाऱ्या मार्क्सलाच वर्गविहीन परिपूर्ण समाजाच्या स्वप्नांची भाकडकथा तयार करावी लागली. ती प्रत्यक्षात येण्याचा काहीच संभव नव्हता. इतिहासाला मार्क्सवर इतकी मेहेरनजर करण्याची काहीच आवश्यकता नव्हती, अगदी शरीरशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा ही कल्पना अवास्तव आहे. अतिशोषितांमध्ये उठण्याची ताकदच नसते. शोषणाच्या अगदी सुरुवातीच्या पायरीत त्यांची प्रतिकारक्षमता खलास होते. प्रत्यक्षात 'शोषक क्रमांक एक विरूद्ध 'शोषक क्रमांक दोन आघाडी उघडतात असे दिसते. शोषितांचे नाव घेऊन ते ही आघाडी उघडतात. मार्क्सला सापडलेले सत्यकण हे स्थलकालसापेक्ष होते. अतिरिक्त मूल्याचा प्रमुख स्रोत कामगारांच्या शोषणात नाही, तिसऱ्या जगाच्या शोषणात आहे, हे मार्क्सला समजले नव्हते असे नाही. साम्राज्यवादाच्या आर्थिक परिणामांचे तपशीलवार वर्णन त्याने दिले आहे. रोझा लुक्झेंबुर्गला तिसऱ्या जगातील लुटीचे भांडवलनिर्मितीच्या प्रक्रियेतील महत्त्व उमगले होते. मार्क्सला ते स्वच्छ दिसत असले पाहिजे. पण १८४८ च्या अयशस्वी उठावाच्या अनुभवाने केवळ कामगारच क्रांती करू शकेल, ही भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे महात्माजी सरसेनापती होते. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या, निःशस्त्र, असंघटित जनांना बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध उभे करण्याचे प्रचंड काम त्यांनी घेतले. चंपारण्याच्या, बारडोलीच्या अनुभवांनंतर अस्पृश्य शेतमजुरांना, खेडुतांना चळवळीत गोवून घेतले पाहिजे हे ओळखणारा, चौरी चुरापासून 'करेंगे' या मरेंगें पर्यंत झेप घेणारा हा रणधुरंधर आंदोलनासाठी नवनव्या आघाड्या व फौजा तयार करण्याकरिता पारंपरिक नीतिकल्पना वापरत होता. त्यांतून पारंपरिक नैतिकतेवर आधारित असा समाज निर्माण होईल अशी स्वतः महात्माजींची अपेक्षा असती, तर शासनाचे नेतृत्व त्यांनी आधुनिकीकरणवादी पंडितजींकडे उघडउघड सोपविले असते किंवा नाही, याबद्दल जबरदस्त शंका घेण्यास जागा आहे. विचारवंतांनी केलेल्या स्वप्नरंजनाची परिपूर्ती न झाल्यामुळे आरामखुर्चीत बसलेल्या विद्वानांना कितीही वेदना झाल्या, तरीही काळपुरुषाला त्याची काही पर्वा वाटताना दिसत नाही. 'आपला तो बबड्या आणि लोकाचं ते कारटं या वृत्तीने महाराष्ट्राच्या इतिहासात काही आत्मकौतुकाचा भाग यावा हे समजण्यासारखे आहे. पुण्यातील पेशव्यांचा विश्रामबागवाडा पाहिला आणि त्याच्या दीडदोनशे वर्षे आधी दिल्लीश्वरांनी केलेली बांधकामे पाहिली, म्हणजे सर्व देशाच्या इतिहासात पेशव्यांचे स्थान काय होते याबद्दलची वर्णने अवास्तव असावीत हे स्पष्टच होते. छत्रसाल, सुरजमल, हैदर, टिपू यांसारख्या इतर प्रदेशांतील पुरुषांच्या कार्याच्या संदर्भात मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे याची जाणीव होते. महाराष्ट्राचा इतिहास आत्मकौतुकाने भरलेला आहे आणि अवाजवीपणे आत्मकेंद्रीही आहे पण याहीपेक्षा एक फार मोठे कोडे इतिहास वाचताना मला पडते. देवगिरीचे एवढे बलाढ्य राज्य, पण मुसलमानी फौजा • अगदी बिनधास्त गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचल्या कशा ? निवडक अंतर्नाद ३५९