पान:निवडक अंतर्नाद.pdf/३६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे लढे कशासाठी? सर्वोत्तम (मोहन) ठाकूर त्यावेळी भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या स्वतःच्या कामाकरिता संगणक आणला व तो त्यांच्या कामगार संघटनेशी विचारविनिमय न करता. जगात सुरू झालेली संगणक क्रांती भारतात येण्यापासून रोखून धरायला हा मानाचा प्रश्न कारणीभूत झाला. भारताची इभ्रत नेत्यांच्या वैयक्तिक इभ्रतीपेक्षा कमी मानली गेली. तसं पाहिलं तर आजकाल लढे सुरू करायला काहीही कारण चालतं. कोणीही उठावं आणि एखादा छोटा मोठा मुद्दा घेऊन लढा पुकारावा, असे हे दिवस आलेत. आणि त्या लढ्यासाठी खराखुरा महत्त्वाचा मुद्दा पाहिजेच असंही नाही. आपलं स्वत:चं महत्त्व कमी होतंय म्हणून, स्वतःचं पुनर्वसन करून पुढारीपण टिकवण्याच्या सुप्त उद्देशानेसुद्धा लढे पुकारले जातात. मोर्च्यात अनुयायी काय, कशालाही मिळतात. आमच्या जमिनी घेतल्या म्हणून सेझ (SEZ) कल्पनेच्या विरोधात लढा देतानासुद्धा "जमिनीची किंमत सतत वाढतच जाणार आहे, त्यामुळे आज जमीन न विकून काहीच बिघडत नाही, याची शेतकऱ्यांना जाण आहे' ही भाषा बोलली जाते. हे शेतकऱ्यांना पटवलं जातं, आज ना उद्या जमिनी विकायची तयारी असली, तर मग ला कशाच्या विरुद्ध ? लढ्यात भाग घेणाऱ्यांना, मिरवणुकीत सामील होणाऱ्यांना लढ्याचे पुढारी खऱ्या उद्दिष्टांची कल्पना तरी देतात काय? त्यांना स्वतःला तरी त्याची कल्पना असते काय? हे प्रश्न अनुत्तरित राहतात. रोज रोज नवीन नवीन लढे उभे राहत आहेत. जनघडी वारंवार विस्कळीत होत आहे आणि जनता अधिकाधिक आक्रमक बनून प्रचंड प्रमाणात मोडतोड जाळपोळ, मारामाच्या करताना स्वतःला विजयी मानत आहे. या गोष्टी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आपल्या या असल्या 'लढ्याच्या' कृतीने आपलं उद्दिष्ट खरोखरच प्राप्त होणार आहे, या सर्वदूर पसरलेल्या अंधश्रद्धेचं निर्मूलन होणं जरुरीचं नाही काय? अगतिक होऊन ही विध्वंसक लाट प्रेक्षक म्हणून नुसती पाहत बसायच्याऐवजी, या गोष्टी कशा कमी करता येतील याचा विचार करून, तशी कृती करायला आतातरी पावलं उचलली पाहिजेत. या साऱ्याचा विचार करण्यापूर्वी माझ्या माहितीची दोन-तीन प्रत्यक्ष उदाहरणे पाहायला हरकत नाही. आमच्या रत्नागिरीत तीस- पस्तीस वर्षांपूर्वी गोव्याच्या चौगुल्यांनी 'नर्मदा सिमेंट' हा कारखाना सुरू केला. हा कारखाना सुरू होणार हे समजल्याबरोबर त्यावेळी कोकणच्या उदरनिर्वाहाचं एकमेव साधन असलेल्या आंबा, काजू वगैरेंचे छोटे मोठे, अशिक्षित आणि सुशिक्षित बागाईतदार आंदोलन ३६४ निवडक अंतर्नाद करायला उठले. सिमेंट कारखान्याच्या धुरांड्यातून येणारी गरम वाफ व राख यांमुळे सर्व बागाईतींचंच नुकसान होईल आणि आमचं एकमेव उत्पन्नाचं साधन (मनी ऑर्डरी सोडून) कायमचं नष्ट होईल, ही त्यांची वरवर अगदी रास्त वाटणारी भीती होती. रत्नागिरीची जनता ही रस्त्यावर येऊन आपले प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करणारी म्हणून कधीच ओळखली जात नव्हती. आणि त्यावेळी एकूण वातावरणसुद्धा तेवढं तापत नव्हतं. अशा परिस्थितीत हा नर्मदा सिमेंट कारखाना त्यावेळी उभा राहिला. नंतर काही वर्षांनी तो लार्सन अँड टूब्रोने विकत घेतला आणि त्याचा विस्तार केला. आता हा कारखाना बिर्लाच्या अल्ट्रा- टेक सिमेंटचा एक भाग आहे. पण या पस्तीस वर्षांत आंबा, काजू व इतर कलमांचं उत्पन्न कमी झालेलं नाही. कारखाना आणि बागायती या दोन्ही गोष्टी गुण्यागोविंदाने आणि उत्पन्नात वाढ होऊन चालू आहेत. काही थोड्या कलमांचं नुकसान झालं असेल, पण ते नर्मदा सिमेंटच्या कारखान्याने नाही, कारण बाकी कलमं जोमाने वाढत आहेत. वास्तविक पाहता, नर्मदा सिमेंटचा गुजरातेत जाफराबाद येथे सिमेंट उत्पादनाचा मोठा प्रकल्प आहे त्या कारखान्यात जे 'क्लिंकर' तयार करत, ते या रत्नागिरीच्या नर्मदा सिमेंट कारखान्यात येणार होतं - या कारखान्यात संपूर्ण बंदिस्त यंत्रसामग्रीत दळून त्याचं सिमेंटमध्ये रूपांतर करण्याकरता. या प्रक्रियेत जी थोडीफार राख उडे ती कारखान्याच्या आवारातच पडे पण मुळात गरम वाफ व प्रचंड प्रमाणात बाहेर फेकली जाणारी राख या दोन्ही गोष्टी अतिशयोक्तिपूर्ण अथवा काल्पनिक होत्या. पण या काल्पनिक भीतीत वावरणाऱ्या स्थानिक निदर्शकांना तोंड देण्याचा मन:स्ताप मात्र नर्मदाच्या चौगुल्यांना विनाकारण सहन करावा लागला. नर्मदा सिमेंटच्या उभारणीला विरोध करण्याकरता केलेल्या या निदर्शनांचा त्यांच्या पुढाऱ्यांना वैयक्तिक असा काहीच उपयोग झाला नाही. पण 'येणार येणार' म्हणून त्यावेळी खूप चर्चा होत असलेले किर्लोस्कर व बायर यांचे प्रकल्प मात्र या दोन्ही उद्योग समुदायांनी रत्नागिरीऐवजी अन्यत्र सुरू करण्याचे ठरवले. हे