पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुकी संभाषणे, बोलकी नाती आशुतोष शेवाळकर “काही दिवसांपूर्वी हॉलमध्ये असाच बसलो असताना हलणारे मासे पाहून, 'अरे, इथे काहीतरी जिवंत अस्तित्व आपल्या बाजूला, आपल्या सोबतीला आहे,' अशी काहीतरी जाणीव आत लकाकून गेली व तेव्हाच या जिवंतपणाची ही गमावलेली संवेदनशीलता पुन्हा जाणवली. ' >> - माणसांइतकेच जिवाभावाचे नाते मुक्या प्राण्यांशीही कसे जोडता येते हे सांगणारा लेख. वणीला अगदी गावाबाहेर जिनींग फॅक्टरीच्या एका मोठ्या आवाराला लागून असलेल्या घरात माझं लहानपण गेलं. गावाबाहेर, आजूबाजूला जिनाचं मोठ्ठे आवार कापसाचा सीझन संपला की तेसुद्धा पूर्ण रिकामं व निर्मनुष्यही आजूबाजूला नेमकी मोजकी तीन-चारच घरं, असा तो परिसर होता. माणसांपेक्षा प्राण्यांचाच वावर कदाचित त्या काळात माझ्या अवतीभवती जास्त असावा. साप, नाग, विंचू, इंगळ्या या भीतिदायक प्राण्यांच्या जोडीनेच पोपट, भारद्वाज, सुतार व इतर विविध पक्षी, रेशमी किडे, सोनपाखरं, कुत्रे, मांजरी, चिमण्या, खारी या सगळ्यांचाच या परिसरात मुक्त वावर असायचा. पावसाळ्यात विविध आकाराचे, आवाजाचे, जातींचे किडे व भुंगेही खूप यायचे. घराच्या चारही बाजूंना पाणी साचलेल्या लहान-मोठ्या डबक्यांतून 'डरॉव डराँव' असा रात्रभर चाललेला बेडकांचा आवाज हे पावसाळ्याच्या रात्रीचं हमखास पार्श्वसंगीत असे. या बेडकांच्या मागे म्हणून पावसाळ्यात जास्ती, पण तसा बाराही महिने या आवारात सापांचाही सुळसुळाट असायचा. उन्हाळ्यात एका रात्री आम्ही असेच बाहेर झोपलो होतो. आरामखुर्चीत बाबा वाचत बसले होते. आई घरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या संडासात गेली. आत शिरून, दार लावून, दिवा लावताच तिला एका कोपऱ्यात एक मोठा डोम्या नाग असल्याचं दिसलं. तोही भेदरून दाराताच आडवा झाला. तीन बाय चारच्या संडासात दार बंद व दारात आडवा नाग, ही ओरडायला लागली. हिचं ओरडणं व भेदरणं पाहून तोही घाबरून फणा काढून फुत्कारायला लागला. तोही भेदरलेला व त्यालाही कुठे जाता येणं शक्य नव्हतं. आईने अर्धा तास जिवाच्या आकांताने ओरडूनही बाबांना काही हाक ऐकू गेली नाही. एक तर लहानपणाच्या आजारामुळे त्यांचे कान थोडे अधू व वाचनात मग्न असले, की तसंही त्यांना जगाचं कुठलंच भान राहत नाही. हिचा आवाज ऐकून बाजूच्या नगरवालांचा अल्सेशियन कुत्रा 'टिपू' मात्र संडासाकडे जायला निघाला. तिथे पोचून नखांनी ३६ निवडक अंतर्नाद दारावर ओरखडू लागला आई आणखीनच घाबरली, कारण नाग आता तिथून हलला तर अंगावरच यायचा, पण सुदैवाने नागाची प्रतिक्रिया सावधतेची झाली, अंग आखडून, फणा मागे फिरवून तो बाहेरची चाहूल घेऊ लागला. यामुळे अर्धं दार मोकळं झालं. आईनं मग जिवाची हिंमत करून, साडी वर खोचून, कडी उघडून, अर्धंच दार उघडून बाहेर उडी मारली. नगरवालांच्या भाऊराव नोकराने नंतर तो नाग मारला, तेव्हा म्हणाला की, "बाई, चावला असता तर दहा मिनिटंसुद्धा दिली नसती, इतका हा विषारी आहे.” असाच एके काळी याच संडासाच्या छतात टिन व बल्ली यांच्यामधील फटीत एक साप दोन दिवस होता. काही केल्या तिथून हलतच नव्हता. त्या दोन दिवसांत आम्ही दोन मिनिटांत संडासला जाऊन यायचो, पण तेव्हाही बाबा मात्र वाचायला नेलेलं पूर्ण करूनच, अर्ध्या तासानेच परत यायचे. एकदा पावसाळ्याच्या दिवसांत बाबा दौऱ्यावर असल्याने मी व आईच घरी होतो. मी अभ्यास करता करता लघवी लागली म्हणून बाहेर गेलो, 'दुश्मन दुश्मन, जो दोस्तों से प्यारा है...', असं काहीतरी गाणं म्हणत. मी लघवी करणार इतक्यात पाहिलं, तर एक नाग फणा काढून अगदी माझ्यासमोर एका बेडकावर लक्ष केंद्रित करून होता. दोनच सेकंदानी मला लघवी झाली असती तर ती बरोबर त्याच्या फण्यावरच पडली असती. पूर्ण ध्यान बेडकावर असल्याने त्याचंही माझ्याकडे लक्षच नव्हतं. लगेच परत पावली । ठोकली. त्या माझ्या धांदलीने त्याचंही ध्यान भंगलं व तो माझ्या मागे मागे यायला लागला. मी व आई दाराबाजूच्या खिडकीतून त्याला हाकलायचा प्रयत्न करत होतो व तो जिथे फट सापडेल, तिथून आत यायचा प्रयत्न करायचा कसाबसा त्याला बाहेर घालवला. धूम एकदा तर श्रावण महिन्यातल्या एका मुसळधार पावसाच्या दिवशी आमच्या मधल्या खोलीतल्या मागच्या खिडकीबाहेर लागूनच एका सापाने एका बेडकाला गिळलं. इंचाइंचानी त्याच्या शरीरात आत आत सरकत जाणारा बेडूक आम्ही जवळपास तासभर पाहत होतो.