पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तेलुगू, गुजराती सर्वांचाच समावेश होता. एवढेच काय, फ्रेंच आणि क्रिओल लोकही तिथले नागरिक आहेत. मला फक्त 'मराठी' लेबल चिकटणे माझ्या कामाच्या दृष्टीने अयोग्य ठरले असते. त्या मराठी लोकांना मी ते सांगितले आणि त्यांना ते पटले. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात मला 'मराठी उपउच्चायुक्त' असे संबोधणे ते यळू लागले. महाराष्ट्र फक्त मराठी माणसांचा, असा आग्रह धरणाऱ्या प्रत्येकाने मॉरिशसमधल्या मराठी माणसांची शिस्त, एकजूट, मराठी प्रेम आणि अभिमान पाहावा. हे सर्व सांभाळत असताना इतर देशवासीयांकडून त्यांनी मिळवलेली प्रशंसा अभ्यासण्यासारखी आहे. काळाच्या तडाख्यात सापडलेला मराठी माणूस आता थोड्याफार प्रमाणात जगभर भेटतो. त्याने आपली मराठी, भारतीय, आणि जागतिक अस्मिता यांचा कधी खुशीने, तर कधी पर्याय नाही म्हणून स्वीकार केला आहे. स्वतःचा असा शोध घेणाऱ्या या नव्या मराठी माणसांच्या मानसिक, शारीरिक, मानसशास्त्रीय व सांस्कृतिक संघर्षाचे फार मनोज्ञ दर्शन अपर्णा वेलणकरांच्या व नीलिमा बोरवणकरांच्या पुस्तकांत घडते. माणसाचे मूळ आणि आकाशाकडे होणारा त्याचा विस्तार या दोन्ही गोष्टींत परस्पर विरोधी काही नाही; पण झाडालासुद्धा स्वतःचे स्थान बनवताना हवा, पाणी, प्रकाश यांचा शोध घ्यावा लागतो आणि वादळ, महापूर यांसारख्या नैसर्गिक घटकांशी संघर्ष करत उभे राहावे लागते. मानवी अस्मितेचे थोडेफार असेच आहे. मराठी अस्मितेचे किंवा मराठीपणाचे मूळ व अवकाश कुठे आहे? महाराष्ट्राची भूमी जिचे ऐसपैस स्वरूप जाऊन, ती भाषावार प्रांतरचनेनंतर 'महाराष्ट्र राज्य या नावाने ओळखली जाऊ लागली. संतपरंपरा - जिने भाषा व विचार समृद्ध केले. तुकाराम, रामदास हे आध्यात्मिक नेतृत्व, तर शिवाजी ही राजकीय प्रेरणा संस्कृती, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी शिवाजीमहाराजांनी रणशिंग फुंकले. 'महा राष्ट्र' या दोन शब्दांमागे अधिक विशाल, पुरोगामी आणि चांगल्या प्रदेशाची संकल्पना आहे. विजापूरची आदिलशाही आणि उत्तरेच्या मुगलांपासून 'मराठी' मुलूख स्वतंत्र करण्याची जिद्द महाराजांकडे होती. स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतातील एक राज्य म्हणून मराठी संस्कृती, भाषा आणि मराठी माणूस यांच्या प्रगतीची इच्छा हेच 'मराठीपण' म्हणता येईल. १७व्या शतकातील मराठी 'राष्ट्रवाद' आणि २१व्या शतकातील 'मराठीपण' यांच्यातील कालसापेक्ष फरक जाणीवपूर्वक समजून घेतला नाही आणि काळाप्रमाणे योग्य पाऊल उचलले नाही, तर संकुचित प्रादेशिक व भाषिक अट्टहासापायी स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारून महाराष्ट्राचे नुकसान केल्याचा दोष महाराष्ट्राच्या आजच्या नेतृत्वावर आल्याशिवाय राहणार नाही. टिळकांनी काळाची पावले ओळखून मराठी अभिमानाला राष्ट्रप्रेमात आणि राष्ट्रीय चळवळीत बदलवून टाकले. शिवाजींच्या काळात आपण विरुद्ध ते' अशी फारकत शक्य होती. आता 'मराठी विरुद्ध बिहारी' किंवा 'मराठी विरुद्ध दाक्षिणात्य अशा घोषणा आकर्षक व काही जणांचे रक्त पेटवणाऱ्या असल्या, तरी त्यांचा प्राण मर्यादित आहे. शिवाय, मराठी अस्मिता टिकवण्याच्या इतर हजार संवैधानिक वाटा असताना, प्रागतिक महाराष्ट्राविषयी संपूर्ण भारतात नकारात्मक प्रतिमा पैदा करणाऱ्या जातीय, प्रांतीय आणि धार्मिक संघटना या महाराष्ट्राच्या दृष्टीने धोक्याच्या आहेत, हे जाणणे आवश्यक आहे शिवाय, अशा संकुचित नेतृत्वाचे फक्त मनसुबेच बदलत नाहीत, तर राजकीय सोयीप्रमाणे ते कधी 'मराठी' कधी हिंदू तर कधी कधी भारतीयही असतात. अशा सगळ्या नेत्यांची मुले इंग्रजी माध्यमात तर शिकतातच, पण त्यांतल्या अनेकांची कायमची पाश्चात्त्य देशांत जाऊन राहण्याची इच्छा असते. पण हे समजण्यासाठी अस्मितेची संकल्पना समजावून घेतली पाहिजे. कारण मराठी अस्मिता ही मराठीची सक्ती, बिहारी लोकांना विरोध, शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा यांच्या पलीकडे जाणारी आहे. पहिली गोष्ट, 'मराठीपण' राखण्यासाठी सतत 'आम्ही विरुद्ध ते' या न्यायाने सतत कोणीतरी शत्रू असण्याची आवश्यकता नाही. सतत संघर्ष हाही काही अस्मितेचा स्थायिभाव नव्हे. शिवाय, सामूहिक अस्मिता असते, पण त्याहून महत्वाची असते वैयक्तिक अस्मिता, त्यात स्त्री किंवा पुरुष, हिंदू किंवा मुस्लिम, कौटुंबिक वारसा, वैचारिक वारसा (गांधीवादी की मार्क्सवादी ?) वगैरे गोष्टी येतातच. मराठीपणाची एक थेट सरळसोट शिवाजी किंवा संभाजी, ज्ञानेश्वर किंवा रामदास अशी संकल्पना आजच्या काळात संभवत नाही. महाविद्यालय असो वा क्रीडामंडळे, सामाजिक संस्थासुद्धा अस्मितेत फार मोठी भूमिका बजावतात. पुस्तके, प्राध्यापक आणि फुल्यांसारखे समाजसुधारक अस्मिता घडवतात. शेक्सपिअरवर प्रेम करणाऱ्या आणि मिल्टनवर जीव ओवाळून यकणाऱ्या प्राध्यापकांना पाहून आपण त्यांच्या मराठीपणाच्या सच्चेपणाविषयी शंका घेत नाही. विवाहसंस्था, मैत्री, एवढेच काय, एखाद्याशी व्यावसायिक किंवा वैचारिक शत्रुत्व ही माणसाची ओळख बदलून टाकते. आजच्या काळात मराठी माणसाच्या नावावर संघर्ष करणाऱ्या अ, ब, क नेत्यांपेक्षा मराठी तरुण पिढीला बिल गेट्स, बराक ओबामा किंवा कॅटरिना कैफ आवडण्याची शक्यता जास्त आहे. याचे कारण, माणसाला त्याच्या संकुचित ओळखीपेक्षा काही विशाल, मनोवेधक, दूरस्थ अशा गोष्टींविषयी खोल आकर्षण असते. आज अण्णा हजारे मराठी माणसाला आवडतात ही गोष्ट खरी आहे, पण ते संपूर्ण देशाला एक परिवर्तनवादी नेतृत्वाची खूण वाटतात, याचे श्रेय त्यांच्या मराठीपणाइतकेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि चारित्र्याला जाते, कारण अस्मितेपेक्षा मूल्ये व चारित्र्य महत्त्वाचे आहे शिवाय, मराठीपण सांभाळत माणसाला नोकरी, देशान्तर, शिक्षण, विवाह यांच्याबाबतीत तडजोड शक्य आहे, पण शिवाजी, संभाजी किंवा अन्य मराठी श्रद्धास्थानांबाबत तडजोड शक्य नाही, अशी समावेशकता व असमावेशकता एकाच वेळी निवडक अंतर्नाद ३७१