पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विकाससन्मुख धोरणांची आवश्यकता सुरेश द्वादशीवार विकासाच्या वाटचालीत एकच एक विचारधारा कायम उपयुक्त ठरत नाही; ती कितीही चांगली असली तरी. बदलत्या परिस्थितीत वेगवेगळ्या विचारांची कास धरावी लागते. १. समाजवादी मनोधारणेचे कैदी जी गोष्ट फार पूर्वी करायची आणि जी करताना जनतेला विश्वासात घ्यायचे, ती उशिरा केल्याने व तिची उघड चर्चा टाळत राहिल्याने पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारला आताचा राजकीय क्षोभ ओढवून घ्यावा लागला आहे समाजवादी अर्थकारण देशाला समृद्धीच्या वाटेवर नाही, याची कल्पना १९६७ मध्येच साऱ्यांना आली. त्या वर्षी प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अर्थविषयक समितीने तयार केलेल्या दक्षिण-पूर्वेविषयीच्या अहवालात आलेली आकडेवारी याविषयी साऱ्यांचे डोळे उघडणारी होती. भारताचे सारे राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या विकासकामात प्रामाणिकपणे गुंतविले, तरी १९६७ सालची जपानची पातळी गाठायला त्याला १२७ वर्षे लागतील, असे त्या अहवालात म्हटले होते. स्कॅन्डिनेव्हिअन देशांच्या पातळीवर जायला त्याला १६७ वर्षे लागतील, असेही त्यात नोंदविले होते. अहवाल समोर होता, तो नाकारणे अवघड होते; पण त्याचा स्वीकार त्याहून कठीण होता. तो स्वीकारल्याने अगोदरची ३७ वर्षे आपण ज्या समाजवादाचा मंत्र आळवला आणि लोकांसकट स्वत:ला त्यात गुंगविले, तो फोल होता है सांगणे राजकारणाला भाग होते. ते सांगण्याची सर्वात मोठी जबाबदारी काँग्रेसवर असली, तरी इतर पक्षही त्यातून मुक्त नव्हते. 'आम्ही तुमच्याहून जास्तीचे समाजवादी आहोत', असे काँग्रेसला बजावण्याची स्पर्धा करणारे अनेक पक्ष त्या काळात देशात होते. 'स्वतंत्र' या नावाने ५०च्या दशकाच्या अखेरीस आवलेला आणि ७० च्या अखेरीस अंतर्धान पावलेला चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा एकच पक्ष काय तो समाजवादाचे वैयर्थ्य तेव्हा देशाला सांगत होता. मात्र त्या पक्षात राजे-रजवाडे आणि उद्योगपती यांचा भरणा मोठा असल्याने तो देशाला फार काळ आपला वाटला नाही आणि राजकारणाच्या तेव्हाच्या समाजवादी मनोधारणेने त्याला यशस्वीही होऊ दिले नाही, सगळे उद्योगपती आणि भांडवलदार 'चोर' आहेत, ही डावी मानसिकता राजकारणाला अर्थकारणाचा शहाणा सल्ला ऐकू देत नव्हती. 'उद्योग करणे हा सरकारचा उद्योग नव्हे, ही गोष्ट जे. आर. डी. या तेव्हाही देशाला सांगत होते. बजाज आणि बिर्ला या औद्योगिक घराण्यांचे नेतेही तसे बजावत होते. मात्र समाजवादी व साम्यवादी मनोधारणेच्या त्या काळात त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. उलट, त्यात त्या माणसांचा स्वार्थच अधिक असल्याची जाहिरात तेव्हा केली गेली. परवा मनमोहन सिंगांनी केलेल्या नव्या सुधारणांच्या घोषणेचे रतन टाटांनी स्वागत केले. यांचे आताचे वक्तव्य देशाने जेवढ्या गंभीरपणे घेतले, तेवढे त्या अगोदरच्या टाटांचे घेतले गेले नाही, ही बाबही यासंदर्भात समाजाच्या बदलत्या आर्थिक मनोधारणेची साक्ष देणारी ठरावी. डोळ्यांना स्पष्ट दिसणाऱ्या व अनुभवांनी अधोरेखित केलेल्या खऱ्या गोष्टी आपल्या जुन्या धारणांना धक्के देणाऱ्या असतील, तर त्या स्वीकारणे व्यक्तींएवढेच समाजांना व देशांनाही कठीण होते. साम्यवादाने आपला देश अर्धपोटी व अर्धनग्न ठेवला, हे दिसत असतानाही माओ त्से तुंगाने खुल्या मनाने ते कधी मान्य केले नाही. उलट भांडवली श्रीमंतीपेक्षा समाजवादी दारिद्र्य चांगले असे एक निरर्थक वाक्य तो देशाला व जगाला ऐकवीत राहिला. चीनची ती मानसिकता माओ त्से तुंगच्या अखेरपर्यंत तशीच टिकली. नावडते सत्य नाकारणे व आवडते ढोंग गोंजारणे या दुटप्पीपणाचा तो परिणाम होता. भांडवली व्यवस्था व समाजवादी कविता एकाच वेळी स्वीकारणे व आळवणे हा आपल्याही अशाच दुटप्पीपणाचा पुरावा आहे. देशाने समाजवादाची कास सोडायला सुरुवात केली, त्यालाही आता बरीच वर्षे झाली. राजीव गांधींनी ती प्रक्रिया सुरू केली, नरसिंहरावांनी पुढे नेली, वाजपेयींनी दृढ केली आणि तिला परिणामकारक वळण देण्याचे १९९१ मध्ये अर्थमंत्री म्हणून हाती घेतलेले काम २००४ ते २००९ या काळात मनमोहन सिंगांनी पूर्ण करीत आणले. या वाटचालीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि समाजव्यवस्थेवर झालेला पाहताही आला. समाजवादी पर्वातील निवडक अंतर्नाद ३७३