पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात मराठी भाषेपेक्षा मराठी मानसिकता कालानुरूप व्हायला हवी विवेक सावंत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) कसे आणि किती उपयुक्त ठरू शकते याची ही एक आगळी आणि अनुभवसिद्ध, सम्यक आणि संदर्भबहुल मांडणी मला असं वाटतं, की 'अमृताशी पैजा जिंकणारी' जी आपली मराठी भाषा आहे, त्या भाषेला आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात कालानुरूप करण्यापेक्षा, खरी गरज माहिती तंत्रज्ञानाने मराठी भाषेशी अनुरूप होत राहण्याची आहे. परंतु त्याचबरोबर आधुनिक ज्ञानयुगाच्या संदर्भात आणि ते ज्ञानयुग माहिती तंत्रज्ञानाने सक्षम केलं आहे म्हणून त्या तंत्रज्ञानाच्या संदर्भात, मराठी मानसिकता कशी कालानुरूप व्हावी, याचं मात्र आपण चिंतन करणं आवश्यक आहे. हा आपल्या मराठी समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे : "मातृभाषेचा दुरभिमान माझ्या ठिकाणी नाही, पण अभिमान मात्र अवश्य आहे इंग्रजांची सत्ता गेली, पण इंग्रजीची सत्ता वाढत्या प्रमाणात येथे फैलावत आहे. भारतातील कोणाही नागरिकाला आपल्याला इंग्रजी येत नाही याचा संकोच वाटावा, किंवा इंग्रजी येत नाही म्हणून प्रगतीचे अनेक दरवाजे त्याला बंद असावेत, ही परिस्थिती खरोखर लज्जास्पद आहे. बहुसंख्य लोकांना न कळणाऱ्या भाषेत आपले सर्व वरच्या पातळीवरील आर्थिक, राजकीय व्यवहार करू या. भाषा आणि तंत्रज्ञान यांच्यामधला संबंध हा आशय आणि त्याच्या अभिव्यक्तीच्या साधनांमधल्या संबंधासारखा आहे. आशय हा श्रेष्ठ आहे, अभिव्यक्तीची साधनं ही त्याला सहायभूत आहेत. तंत्रज्ञानाच्या इंग्रजी भाषेतील व्यापक प्रमाणातील वापरातून महाराष्ट्रातही इंग्रजीचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे मराठी भाषा नामशेष होईल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. या भीतीतून एका बाजूने समाजात तंत्रज्ञानाविषयी गैरसमजूत पसरतेय व दुसऱ्या बाजूने मराठीच्या अस्तित्वाला असलेल्या आव्हानाचं सम्यक आकलन होण्यात अडथळे निर्माण होत आहेत. मला असं वाटतं, की आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज जो मराठीच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न आहे, तो खरा मराठीतील आशयाचा प्रश्न आहे; त्याच्या ●अभिव्यक्तीसाठी अनुरूप असं तंत्रज्ञान इंग्रजी प्रमाणेच मराठीलाही सहज उपलब्ध होत आहे मार्क डेव्हिस यांनी अॅपल कंपनीचा राजीनामा देऊन युनिकोड फाउंडेशन तयार केलं. या माणसाने भाषांची आणि लिप्यांची अव्याहत सेवा करण्यासाठी आपलं सबंध जीवन समर्पित केलं आहे. होत असल्यामुळे लोकांना न कळणाऱ्या भाषेत चालणारी लोकशाही ही सुसंस्कृत जगात कोठेही नसलेली अद्भुत घटना आपण सिद्ध करत आहोत. देशातील बहुसंख्यांना न समजणाऱ्या परस्थ भाषेचा पांगुळगाडा घेऊन सामाजिक परिवर्तनाचा पर्वत आपण चढू पाहतो आहोत, भाषाविषयक समस्या सोडवणे सोपे नाही हे तर खरेच, पण अवघड प्रश्न कपाटात कोंडल्यामुळे अधिक अवघड होत जातात आणि शेवटी सर्व संभाव्य उत्तरे गमावून बसतात. हा केवळ भाषेचा प्रश्न नसून समाजाच्या अस्मितेचा आणि म्हणून अस्तित्वाचा प्रश्न आहे. समाजाच्या परिवर्तनाची वा क्रांतीची पेरणी ही स्वभाषेच्या किनाऱ्यावरच होऊ शकते, ” आता आपण या प्रश्नाचा माहिती तंत्रज्ञानाच्या बाजूने विचार जगामध्ये हजारो भाषा बोलल्या जातात व हजारो लिप्यांमधून त्या लिहिल्या जातात. युनिकोडचं तंत्रज्ञान जगापुढे आलं त्यावेळेला आपल्या हे लक्षात आलं, की या सर्व लिप्यांचं सहअस्तित्व जर संगणकावर निर्माण करायचं असेल, तर त्या सर्व लिप्यांचं कोडिफिकेशन एका कळपटामध्ये (कीबोर्डमध्ये) करायला पाहिजे. युनिकोड प्रकल्प ज्यावेळेला सुरू झाला, त्यावेळेला मार्क डेव्हिस यांनी अॅपल कंपनीचा राजीनामा देऊन युनिकोड फाउंडेशन तयार केलं. या माणसाने भाषांची आणि लिप्यांची अव्याहत सेवा करण्यासाठी आपलं सबंध जीवन समर्पित केलं आहे. त्यांनी जो प्रचंड प्रकल्प • राबवला त्यातून असं स्पष्ट झालं, की केवळ इंग्रजीच नव्हे तर जगातल्या हजारो लिप्या आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या भाषा आता संगणकांवर एकत्र नांदू शकतील व परस्परांमध्ये सहज व्यवहार करू शकतील. यासंदर्भात आपली जमेची बाजू काय आहे हे आपण थोडंसं निवडक अंतर्नाद ३७७