पान:निवडक अंतर्नाद.pdf/३७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लक्षात घेऊ या. महाराष्ट्र हा आता जवळ जवळ बारा कोटी मराठी लोकांचा प्रचंड असा एक भाषक गट आहे. त्यामुळे जगात मराठी भाषक गटाचा संख्यानिहाय क्रमांक पंधरावा आहे. ही जेवढी आपल्या संख्येच्या दृष्टीने जमेची बाजू आहे, तेवढीच ही आपल्या अस्मितेच्या व आपल्या अस्तित्वाच्या दृष्टीनेही जमेची बाजू आहे. तंत्रज्ञानाला स्थानिक व जागतिक बाजारपेठेची भाषा कळते. म्हणजे आपण जसं आपल्याकडे 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणतो, तसं तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक जगाकडे 'वसुधैव मार्केटम्' या दृष्टीने पाहतात. त्यामुळे जर मराठी भाषकांचा एवढा मोठा समूह मराठीची कास धरणार असेल व संगणक, मोबाइल फोन, टॅब्लेट व तत्सम तंत्रज्ञानांचा वापर करून मराठीतून दैनंदिन व इतर व्यवहार करण्यासाठी आग्रही असेल, व त्यामुळे तशा तंत्रज्ञानासाठी एक मोठी बाजारपेठ निर्माण होत असेल, तर तंत्रज्ञान देणाऱ्या कंपन्या मराठी भाषेचा वापर तंत्रज्ञानातून सुलभ करण्यासाठी वाट्टेल ते रायला तयार होतील, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही सौदी अरेबियामध्ये 'एमकेसीएल' चे अनेक प्रकल्प राबवतो. सौदी अरेबियाची लोकसंख्या ही अडीच कोटींपेक्षा कमी आहे पण सौदी अरेबियाच्या कुठल्याही मॉलमध्ये तुम्ही गेलात तर प्रथमदर्शनी इंग्रजीत चालणारा कम्प्यूटर सहसा दृष्टीस पडत नाही, कारण त्याला मागणीच नाही. कारण कुठल्याही अरब ग्राहकाला उजवी कडून डावीकडे जाणाऱ्या अरेबिक लिपीमधलाच संगणक हवा असतो. म्हणजे मायक्रोसॉफ्टलासुद्धा जर सौदी अरेबियामध्ये सॉफ्टवेअर विकायचं असेल, तर सगळंच्या सगळं अरेबिक भाषेमध्ये करावं लागतं. त्यांच्या चौपटीपेक्षा जास्त लोकसंख्या असून आपल्याला मात्र हे भाग्य लाभलेलं नाही! याचं कारण आम्ही असा दृढनिश्चय केलेला नाही, की आम्ही जे काही संगणकावर करू, मोबाइल फोनवर करू ते मराठी भाषेमध्येच करू. जर आम्ही तसा दृढ निर्धार केला, तर मात्र जगातल्या कुठल्याही मोठ्या कॉर्पोरेट हाउसला आमच्यासमोर हात जोडून त्यांचं तंत्रज्ञान मराठी भाषेमध्ये देणं भाग पडेल; आणि एवढंच नाही तर ते त्यासाठी उत्सुक असतील, तंत्रज्ञानाला बाजारपेठेची भाषा बरोबर कळते हे महत्त्वाचं तत्त्व लक्षात घ्यायला हवं. कंपनीही तत्काळ मराठीच्या सेवेला उपस्थित झाली. आज ज्या प्रमाणात आपण हे करायला पाहिजे त्या प्रमाणात मात्र आपण ते करत नाहीये, ही गोष्ट जरी खरी असली, तरीसुद्धा आज निरनिराळ्या ब्लॉग्जच्या माध्यमातून विविध देशांतली हजारो मराठी माणसं एकमेकांना भेटत आहेत. म्हणजे मराठीच्या अस्तित्वाचा प्रश्न तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेपेक्षा जास्त आपल्या मानसिकतेचा आहे तुम्ही गुगल अॅडव्हान्स सर्चमध्ये गेलात आणि 'भाषा मराठी वर क्लिक केलं, की मराठीतले सगळे सर्च रिझल्ट्स तुमच्यापुढे हात जोडून उभे राहतात. ज्यावेळेला हजारो मराठी लोकांनी मराठीमधून ब्लॉग्ज वापरायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली, आपली पोर्टल्स मराठीतून तयार करायला सुरुवात केली, आपल्या वेबसाइट्स मराठीतून तयार करायला सुरुवात केली, त्यावेळेला हे परिवर्तन घडलं. कारण आमचं पोर्टल मराठीत आहे आणि गुगलमधून ते सर्च होत नसेल तर तो गुगलला कमीपणा आहे; आमच्या पोर्टलला नाही. त्याच्यामुळे गुगलसारखी महाकाय ३७८ निवडक अंतर्नाद मराठीच्या अस्तित्वाला असलेल्या इंग्रजीच्या आव्हानाचा विचार करताना म्हणूनच तंत्रज्ञानाच्या प्रभावाला दोष देत बसणं योग्य होणार नाही. याचा तंत्रज्ञानाच्यापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. 'आम्ही इंग्रजीचं मांडलिकत्व का स्वीकारलं आहे?' या प्रश्नाचं मूलभूत स्वरूप फारसं तंत्रवैज्ञानिक नसून सामाजिक आहे •मराठीची आजची चिंतनीय स्थिती का निर्माण झाली ते बघू या. आम्ही ज्यावेळेला 'मराठी' ही प्रमाणभाषा, शासकीय भाषा, इत्यादी करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आम्ही सर्वसामान्य लोक दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या (लोकप्रयुक्त) साध्या सोप्या मराठी भाषेतील शब्दांपेक्षा संस्कृतप्रचुर किंवा संस्कृतोद्भव अशा अपरिचित, दुर्बोध व उच्चारायला अवघड शब्दांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली. हा एक दुर्दैवी पायंडा आमच्या समाजात पडला. महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेपुढे ठेवण्यात आलेल्या (शासकीय) 'मराठी' भाषेतील प्रस्तावाचं 'मराठीत भाषांतर' करून सदस्यांना द्यावं, असं आपल्या मिश्किल शैलीत अधिकाऱ्यांना सुचवलं होतं! आज जो मराठीच्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न आहे, तो खरा मराठीतील आशयाचा प्रश्न आहे; त्याच्या अभिव्यक्तीसाठी अनुरूप असं तंत्रज्ञान इंग्रजीप्रमाणेच मराठीलाही सहज उपलब्ध होत आहे. ह्या नव्या शासकीय मराठी भाषेची निर्मिती करत असताना आव असा आणला गेला, की आम्ही बहुजनांपर्यंत त्यांच्या भाषेत शासन नेत आहोत. प्रत्यक्ष झालं असं, की त्या बुरख्याखाली आम्ही आमची प्रमाणभाषा व तिच्यातून चालणारं शासन लोकांपासून अधिक दूर नेलं. काही वेळेला तर लोकांना इंग्रजी बरी, पण ही मराठी नको, असं वाटावं अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली. हे करत असताना त्याच्यामागे काही छुपी प्रेरणा होती का ? आम्हांला आमच्या सर्वसामान्य जनतेला मुख्य प्रवाहामध्ये खरोखर आणायचं होतं का ? भारताचा इतिहास जर तुम्ही बघितलात तर त्यात एकात्मतेसबंधी, समतेसंबंधी जिवापाड अशी कन्सर्न (आच) ही फार क्वचित आपल्याला बघायला मिळते. काही थोड्या अभिजनांनी प्रचंड मोठ्या संख्येच्या बहुजनांवर सतत सत्ता गाजवणं याच वास्तवाने आमचा पूर्ण इतिहास बरबटलेला आहे. त्यामुळे बहुजनांना समजणाऱ्या भाषेत जर आम्ही आर्थिक, राजकीय, सामाजिक व्यवहार केले, तर ते लोक ही शिडी चढून लवकर वर येतील, याची आमच्या मनात असलेली भीती हे त्यामागचे मुख्य कारण आहे. असं मी म्हणण्याचं कारण असं, की जर तुम्ही जपानचा इतिहास बघितला, चीनचा, रशियाचा, कोरियाचा,