पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आमच्या झोपायच्या खोलीत खिडकीमागे तारेच्या कुंपणाबाहेर एका मोठ्या काटेरी झुडपाखालच्या बिळात एक सात- आठ फुटी धामण जवळपास महिनाभर वास्तव्याला होती. कधी तोंडाजवळचा दोन- तीन फूट भाग बाहेर काढून ऊन खात बसलेली, कधी बिळात हळूहळू शिरताना, तर कधी बाहेर येताना तिला पाहणं हा माझा त्या दिवसांतला खेळच झाला होता. शाळेत जाताना तिला पाहून जाणं, शाळेतून आल्याबरोबर ती आली आहे का, बिळाबाहेर निघते आहे का पाहणं, असं तेव्हा चालायचं. एकदा फिरायला बाहेर निघाल्यावर नेहमीच्या मार्गाने न जाता तिनं आमच्या बगीच्याच्या कुंपणाकडे मोर्चा वळवला. तेव्हा ओरडून, पाय आपटून तिला तिच्या इराद्यापासून परावृत्त करून, परतपावली फिरायला लावण्यात माझी व आईची दमछाक झाली. त्या दिवशीच्या आमच्या तशा वागण्याने अपमानित होऊन, तिनं तिचं ते राहतं घर जे सोडलं ते कायमचं. समोरच्या गोडाऊनच्या उंच कैच्यावरून फिरणाऱ्या, अगदी नेहमी हमखास दिसणाऱ्या अशाच आठ दहा फुटी धामणी, एकदा दोन तासापर्यंत चाललेला साप-सर्पिणीचा लाग, अशा अनेक गोष्टी तेव्हा पाहायला मिळाल्या. विंचू व त्याहीपेक्षा काळ्याभोर इंगळ्याही तिथं खूप, अगढ़ी जिथे तिथे निघायच्या. संडासाच्या कडीवर विंचू व कड़ी उघडल्याबरोबर टुणकन उडी मारून आपल्या हातावर एकदा तर माझ्या मावसबहिणीला पाळण्यात ठेवायला गेलो, तर पाळण्यातल्या गादीवर पंजाभर मोठी काळीशार इंगळी!.... असे अनेक प्रसंग तेव्हा आलेत. पावसाळा सुरू झाला, की आम्ही मित्र शिकारीला बाहेर पडावं, तसे इंगळ्या पकडायला बाहेर पडायचो. बांबूच्या कमचीला दोरा बांधून त्याच्या टोकाला फास करायचो व जिनात कापसाच्या गंजीसाठी अंथरून ठेवलेल्या मोठ्या गोल गोट्यांपैकी एक एक उचलत जायचो; कुठे ना कुठे खाली इंगळी दिसायची, मग तिच्यासमोर काठी ठोकायची, म्हणजे ती आक्रमक होऊन नांगी वर उचलत असे. तिने तसं केलं, की हलकेच फास तिच्या नांगीत अडकवून कमची वर उचलायची म्हणजे ती फासात अडकत असे. मग अशी जिवंत इंगळी झाडाला त्याच दोराने लटकवून ठेवायची व तिच्याशी खेळायचं. कधी तिची नांगी तुटून ती खाली पडली तर सगळ्यांनी धूम ठोकायची, असे खेळ तेव्हा चालायचे. हे घर सोडल्यावर मात्र सापांशी माझा संबंध सुटला. नागपूरसारख्या शहरात आल्यावर तर गारुड्यांकडचे कचकडी पाळीव साप बघण्याचंच नशिबात आलं. कधीमधी रात्रीच्या ड्रायव्हिंगमध्ये रस्त्यावर येऊ पाहणारं, तर कधी गावी नदीवर पोहायला गेल्यावर काठावर दिसणारं असं दुर्मीळ सर्पदर्शनच मग आयुष्यात आलं. एका नागपंचमीला बत्तीस शिराळ्यात गेलो होतो. तेव्हा मात्र पोट भरून व तेही तेजस्वी, चपळ साप व नाग पाहायला मिळाले. कल्याणेश्वर शिवमंदिराची जागा विकत घेतल्यावर तिथे ठाण मांडून मंदिराला चरस, गांजावाल्या साधूंचा अड्डा करून बसलेल्या पुजाऱ्याला मी | हुसकावून लावलं, तेव्हा बदला म्हणून एक आठ फुटी जाडजूड व तोंड उघडल्यावर मूठभर जबडा होणारा नाग त्याने लपून एका रात्री आमच्या बंगल्याच्या आवारात सोडला होता. पण शेरू नावाच्या अल्सेशियन कुत्र्याच्या सजगतेमुळे आम्ही वाचलो, बांधलेला असतानाही भुंकून भुंकून त्याने त्या नागाला समोर जाण्यापासून थांबवून एकाच जागी खिळवून ठेवलं. रात्री बारा वाजता आम्ही बाहेरून जेवून परतताना कंपाउंडचं गेट उघडायला माझी पत्नी मनीषा खाली उतरली, तेव्हा गाडीच्या लाईटमध्ये दूर पोर्चमध्ये काहीतरी हलताना मला दिसलं. बारकाईने पाहिलं तेव्हा तो नाग असल्याचं लक्षात आलं. मी लगेच ओरडून मनीषाला पुढे जाण्यापासून थांबवलं. बाजूच्या 'पर्णकुटी' मधून फोन करून घरी दार उघडू नये म्हणून सांगितलं व शेरूला बाजूला नेऊन 'पर्णकुटी' च्या चौकीदाराच्या साहाय्याने त्या नागाचा समाचार घेतला. इतक्या दिवसांच्या सर्वांच्या विरहाचं उट्टं या सर्पराजांनी असा जीवघेणा प्रसंग आणून एका भेटीतच काढलं. लहानपणी इंगळीसारखेच फास करून सरडे पकडायचे, मग तंबाखू मळून त्यांच्या तोंडात टाकायची, वरून पाणी पाजायचं म्हणजे त्याला नशा येऊन तो कसा नाचतो ते पाहायचं, आठवीत असताना बेडकी पकडून नगरवालांच्या गाडीतलं डिस्टिल्ड वॉटर टाकून तिचं डिसेक्शन करायचं असे काहीबाही खेळ माझे चालायचे. अशाच बेडक्या किंवा त्यांची पिल्लं पकडून दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून मुठीतून मित्रांच्या हाती ठेवायची व त्यांची होणारी तारांबळ पाहायची, अशीही मजा मी करत असे. 'मृग' नक्षत्राला सुरुवात झाली की 'गोसावी' नावाचे लाल रंगाचे रेशमी किडे निघायचे. ते पकडून पाळायचे. मग त्यांच्यासाठी 'ब्रुक बाँड'चा लाल डबा आणायचा, त्यात वाळू भरायची, गवत टाकायचं. मग कुणाचा गोसावी बंदच राहतो, कुणाचा चालू लागतो व कुणाचा किती पळतो हे तासन्तास बघत बसायचं. हिवाळ्यात बाभळीच्या वनात जाऊन निरनिराळ्या रंगाचे 'सोनपाखरू' नावाचे अतिशय सुरेख दिसणारे मोठे भुंगे पकडायचे, त्यांना दोरा बांधून पतंगासारखं उडवायचं व आपण दोऱ्याचं दुसरं टोक धरून त्यांच्याखालून धावायचं असे अनेक खेळ त्या वेळी अवतीभवतीच्या प्राणिजगताने मला दिलेत. भाऊबहीण नसल्याने घरी एकटाच असल्यामुळे येणारा माझा एकटेपणा अशा रीतीने आजूबाजूच्या निसर्गाने हाताळला. जिनातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांपैकी बहुतेक कुत्र्यांची माहेरपणं व बाळंतपणं मी करीत असे. प्रत्येक वेळेस त्यातल्या एखाद्या पिल्लाच्या मोहात मी पडायचो व ते पाळायचो. दोन-तीन महिन्यांनी मग आई त्याला सोडायला लावी. त्यातली पाळलेली, मी 'गोबुली' नाव ठेवलेली, पांढरी स्वच्छ गावरानी कुत्री व काळ्यापांढऱ्या पट्ट्यांची मांजर, या दोन माझ्या खास आवडत्या. ही मांजर विहिरीत पडली तेव्हा स्वतः विहिरीत उतरून मी तिला बाहेर काढलं, नंतर 'मांजरीची जात कशी बेइमान, गळा धरून ते माणसाला कसं मारतं व तिने घाबरून तुझाच गळा पकडला असता तर?' असं जिनातल्या भैय्याने आईला सांगितलं, त्या वेळी आई घाबरूनच गेली होती. पण त्या मांजरीचाही माझ्यावर अतिशय जीव होता. तीच मांजर एकदा विषारी काही निवडक अंतर्नाद ३७