पान:निवडक अंतर्नाद.pdf/३८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

समजले, की अतिरिक्त धान्य निर्माण करता येते. मग खूप लोक शेती न करता, कलाकुसर, हुनर, व्यवस्थापन, वितरण या गोष्टींचा अभ्यास करून नव्या कल्पक रचना निर्माण करतात. या देशातील तयार वस्तू जगभर जातात. जगभराची संपत्ती म्हणजे सोने इकडे येते. जगातील सर्वात ज्वालाग्रही गोष्ट आहे, हे जगातील विचारवंतांनी मान्य केले. दुसरे आणि पहिले महायुद्ध प्रामुख्याने तेलासाठी झाले, तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होईल हा विचार पुढे आला. इस्राएल-पॅलेस्टाइन युद्धाचे खरे कारण गाझापट्टीतील पाणी आहे, असे सांगणारे पुढे आले. या लांबच्या गोष्टी राहू द्या, एकाच देशातील एकाच सांस्कृतिक बंधनात असलेले भाषक विभाग असे पाण्यासाठी युद्धपातळीवर येतील किंवा एकभाषक विभागातील खेडी पाण्यासाठी युद्धे खेळतील हे विचारवंतांच्या लक्षात आले. त्यावेळी आणखी एक गोष्ट लक्षात आली. याचा व्यत्यासही खरा आहे. ज्या देशांकडे विपुल प्रमाणात पाणी आहे आणि त्याचे ज्यांनी कल्पकतेने नियोजन केलेय, ते देश नकळत या जगात एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात समृद्ध संपन्न, समर्थ देश म्हणून प्रस्थापित होतील. अतिरिक्त अन्नधान्य निर्माण करावयाचे असेल, तर लहरी पावसावर आणि बेभरवशाच्या नद्यांवर अवलंबून राहून चालणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पाण्याचे विलक्षण नियोजन या देशाने अनेक शतके केले. जलवास्तू निर्माण करण्याची आणि त्या वास्तूच्या व्यवस्थापनाची एक सजग परंपरा या देशात आहे. दोन हजार वर्षांपूर्वी समुद्राशी झुंजत, दोन लाख एकर जमिनीला पाणी देणारा कावेरीपक्कम (ग्रँड एनीकेट) या देशात निर्माण झाला. दहाव्या शतकात आंध्रप्रदेशात अनंतराज सागराची निर्मिती झाली. फिरोजशहा तुघलकने १३५० मध्ये पश्चिम यमुना कालव्याची निर्मिती केली. त्यानंतर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे १५७० मध्ये शहेनशाह अकबरनी त्याला एक उपकालवा खणून सबंध हिसार जिल्हा बागायती बनविला, शालीमार बागेत पाणी खेळविण्यासाठी शहाजहानने रावी नदीला १८० किलोमीटर लांबीचा कालवा बनवला. अजंठा व वेरूळ निर्माण करणाऱ्या राष्ट्रकूटांनी नांदेडजवळ विलक्षण बळकट असा कंधारचा भूईकोट किल्ला बनविला महत्त्वाचे म्हणजे पाणलोट क्षेत्राचा विकास करून या किल्ल्याच्या आत व बाहेर बारा महिने मुबलक पाणी देणारे तलाव निर्माण केले. आंबेजोगाईजवळच्या धारूरच्या किल्ल्यात व पण पुढे जाण्यापूर्वी या देशात आपण पाणीप्रश्न किती बेफिकीर वृत्तीने हाताळत होतो हे लक्षात घ्यावयास हवे. १९४७ ते १९८८ या ४१ वर्षांत ज्या गतीने नर्मदा प्रकल्पाने प्रवास केला ती गती, तो वेग जर आपण पाहिला तर किल्ल्याबाहेर असेच तलाव त्यांनी निर्माण केलेत. पुण्यश्लोक त्यामानाने 'ससा आणि कासव' या गोष्टीतील कासवालाही अहिल्याबाईंनी केवळ मंदिरे आणि घाट बनविले नाहीत तर धुळ्याजवळच्या साक्री येथे, भारतात फार पूर्वी अस्तित्वात असलेल्या पण विस्मृतीत गेलेल्या फड पद्धतीचे पुनरुज्जीवन केले. फड पद्धती हा पाण्याच्या व्यवस्थापनातील मैलाचा दगड आहे. जलवास्तू राजा निर्माण करतो. मात्र त्याचे व्यवस्थापन व वितरण गावकरी ठरवतात. कोणत्या गावाने कोणती पिके या वर्षी घ्यावीत, आवर्ती पद्धतीने म्हणजे 'रोटेशनल सिस्टिम' प्रमाणे कोणती शेते यावर्षी उत्पादन न घेता मोकळी ठेवायची हे सर्व गावकऱ्यांनी ठरवायचे. आजही साक्री येथे फड पद्धत अस्तित्वात आहे. आपल्या देशातील जलवास्तूंचा आणि व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन सरकारने १८७० साली एस. विल्यम हा त्यांचा इंजिनिअर भारतात पाठविला होता आणि त्याच्या अहवालाच्या प्रती अमेरिकेत रहस्यकथेसारख्या खपल्या होत्या. स्वतःच्या गतीचा गर्व वाटेल! देश स्वतंत्र झाला, त्यावेळी सरदार पटेलांनी सांगितले, 'नर्मदा प्रकल्प लगेच पुरा व्हावयास हवा, तो पुरा झाल्यावर हा देश अन्नधान्य आयात करणार नाही, तर निर्यात करेल.' मात्र पटेलांचे मोठेपण हे की केंद्रीय मंत्रिमंडळापुढे हा प्रश्न आला, त्यावेळी पटेलांनी आग्रहाने भाकरा नानगलचा आग्रह धरला. ते म्हणाले, 'हा आपला सीमावर्ती भाग आहे. हा समृद्ध झाला, तर सीमेपलीकडे कळेल, सर्वधर्मसमभाव मानणारी लोकशाही कोणता चमत्कार करते ते.' आपला आज विश्वासही बसत नाही, की या देशात एकवेळ असे नेते होते, जे अमेठी आणि बारामती सोडून साऱ्या देशाचा विचार करायचे आणि या देशाचा जलद विकास ही त्यांची बांधिलकी होती. भाकरा नानगल मार्गी लागले. थकलेभागले पटेल काळाच्या पडद्याआड गेले. ४७ ते ६१ अशी १४ वर्षे उलटली आणि ५ एप्रिल १९६१ रोजी पंडीतजींनी सरदार सरोवराची कोनशिला बसविली. ६४ साली थकलेभागले पंडीतजी काळाच्या पडद्याआड गेले. त्यानंतर ६१ ते ६९ अशी आठ वर्षे गेली आणि १९६९ मध्ये आपण नर्मदा आयोगाची स्थापना केली. रामस्वामी, अन्सारी आणि सिन्हा ही फार ताकदीची तीन माणसे या आयोगाची सदस्य होती. आयोगाने चक्क दहा वर्षे घेतली आणि १९७९ मध्ये आयोगाचा अहवाल बाहेर आला. आयोगाने दहा वर्षे घ्यावयास नको होती. मात्र दहा वर्षांत त्यांनी केलेले काम विलक्षण आहे. आजही जगभर कोणताही प्रकल्प बनविताना निवडक अंतर्नाद ३८७ पण ही समृद्ध परंपरा बरोबर असलेला आपला देश विसाव्या शतकाच्या मध्यावर अर्धपोटी देश म्हणून प्रसिद्ध झाला. अमेरिकेचे क्षेत्रफळ आहे आपल्या तिप्पट, पण निसर्गाने अमेरिकेला आणि आपल्याला सारखीच जलसंपदा दिली आहे. मात्र अमेरिकेत त्यांच्या ८५ टक्के जलसंपदेचा उपयोग केलाय. आपण फक्त १५ टक्के केलाय. अमेरिकेतील ८७ टक्के शेती सिंचनाखाली आहे. आपणाकडे फक्त १७ टक्के! पाणी हा आपल्या प्रगतीचा पासवर्ड होता. तो आपण विसरलोय हे आपल्या लक्षात यायला लागले होते. १९८५ साली आणखी एक गोष्ट घडली. पाणी ही आजच्या म्हणजे आपल्या देशाने पाण्याचे नीट नियोजन केले नाही, तर हा आपला देश यादवी युद्धात सापडेल आणि पाण्याचे योग्य नियोजन केले, तर आपण महासत्ता बनू हे आपल्या लक्षात आले आणि नेमका त्याचवेळी म्हणजे १९८८ साली नर्मदा प्रकल्प ऐरणीवर आला, नर्मदेच्या खोऱ्यात दोन समृद्ध पंजाब निर्माण करू अशी प्रतिज्ञा करून तो उभा होता.