पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डोंगराच्या पायथ्याशी जाऊन ते राहायला लागले. एक दिवस बघायला गेलो, तर थक्कच झालो. दूर डोंगराच्या पोटाला झोपडी, एकटीच झोपडी, नजरेच्या टप्प्यात काहीसुद्धा दिसेना, दाट झाडी, शेती कसायला ना बैल ना नांगर केवळ हातची जमीन अतिक्रमणात जाऊ नये म्हणून राहिलेले. तिथे लाइट नाही की पाणी नाही. जवळच्या एका खेड्यात शाळा होती. मायाला तिथे तरी पाठवा म्हणत राहिलो. पण एकटी कशी जाणार, म्हणत यळत राहिले... पुन्हा माझी गरज लागलीच, एक दिवस सकाळीच फोन कुठूनतरी दुकानातून लावलेला. रडक्या आवाजात सांगत होते... 'सर, आपली शेळी वाघाने खाल्ली हो...' मी माझा फोटोग्राफर मित्र गोरख घोडकेला घेऊन गेलो. त्या वातावरणात भीतीच वाटत होती. झाडांच्या मधोमध शेळी पडलेली. घरातला माणूस गेल्यावर बसावे तसे रडवेले चेहेरे करून सारे बसलेले... आम्ही फोटो काढला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेतले. वनअधिकाऱ्यांची माणसे पाठवली आणि ३००० रुपये मिळतील असे प्रकरण केले... भांडवलावर मी पुन्हा दडपण आणले आणि त्याला मायाला शाळेत पाठवायला तयार केले. माया पुन्हा त्या जवळच्या खेड्यात जायला लागली. त्या कौतुकाने तिच्या स्वागताचा कार्यक्रम केला. ती शाळेत जायला लागली. मी पुन्हा निर्धास्त झालो. अनेक दिवस पुन्हा भेट नाही. एकदा खूप दिवसांनी मायाचे वडील रस्त्यात भेटले. मी विचारले, 'शेळीचा चेक मिळाला का... > तो म्हणाला, 'चेक मिळाला पण पैसे मिळाले नाहीत...' मला कळेनाच. म्हटले, 'म्हणजे?' तो म्हणाला, 'वनखात्यात चेक आला, पण ते म्हणाले पैसे जमा करायला बँकेत खातं उघडा. बँकेत गेलो तर ते म्हणाले, • रेशनकार्ड पुरावा म्हणून आणा किंवा रहिवासी दाखला... आता जवळ काहीच नाही. तुम्ही दिलेलं कार्ड तेव्हाच हरवलं, तलाठी रहिवासी दाखला देत नाही. त्यामुळे बँकेचं खातं उघडता आलं नाही. यात सहा महिने संपले आणि चेक आता बाद झाला...' मला काही सुचेनाच. शेळी मारल्यावर फोटोग्राफर नेऊन, वनखात्याची माणसे पाठवून, कसेतरी प्रकरण केले आणि त्याचा शेवट हा असा झाला... पुन्हा चेक मिळायला पुन्हा अर्ज करा असे उत्तर आले. पुन्हा पाठपुरावा सुरू... दरम्यान माया पुन्हा शाळेबाहेर शेवटी मीच आता शिक्षक म्हणून शाळेबाहेर आलो, म्हटले, चला आता, मीच बघतो कशी शाळेत बसत नाही ते. त्या शाळेकडून दाखला मागवला. तिच्या आईबापाला आता मीच शिक्षक आहे हे पटवले. प्रत्यक्ष शिक्षक म्हणून तिला आता सातव्यांदा शाळेत दाखल केले आणि आता माझ्याकडून । जातेय कुठे या गुर्मीत राहिलो. वर्गात माया यायला लागली. वयाने कमी पण अनुभवाने मोठी. जागरण गोंधळाची कामे करून नजर उघडी झालेली माया त्या लह्यन पोरींमध्ये रमेना... एक दिवस काही पोरींना तिला त्रास ३९४ निवडक अंतर्नाद दिला तेव्हा तिने जिवंत उंदराची पिल्ले शाळेत आणली आणि त्या पोरींच्या दप्तरात टाकली. सगळ्या वर्गात हलकल्लोळ. वर्ग सोडून मुली रडत बाहेर आणि जिवंत उंदराची पिल्ले बघायला उरलेली शाळा थेट वर्गात... त्या मुलींचे पालक भांडायला शाळेत... आणि सगळ्यांच्या दृष्टीने माया खलनायिका झाली. पुन्हा काही दिवस शाळेबाहेर. तिला मात्र जिवंत उंदराची पिल्ले वर्गात आणण्यात काहीच गैर वाटले नव्हते.... जिवंत माशांशी लहानपणी खेळणारी ती... पण मध्यमवर्गीय पालकांनी खूप कांगावा केला. कशीतरी तिला पुन्हा बसवली... पुन्हा तेच. तिची आजी आता वेगळी राहत होती. ती तिला घेऊन गेली... पुन्हा आजीकडे मनधरणी सुरू केली. आजी तिला कधी कामाला पाठवायची, तर कधी नाचायला. ती मुरळी म्हणून वाघे आता त्यांच्या घरी येत. तिचे भावविश्वच बदलले. आजीचे दारू प्यायचे प्रमाण वाढले. आजी, मामा दारू प्यायचे आणि माया रस्त्यावर त्यांच्यासोबत बसलेली दिसायची, कुणाशी बोलायचे? कुणाला समजावून सांगायचे? आता माया जीन-पँट, टी शर्टमध्ये दिसू लागली. तिच्याबाबत काही वाईटसाईटही लोक बोलायला लागले. तिचा गैरवापरही होतोय असे कुणी बोलले की कसेनुसे व्हायचे. माझ्या मुलाबरोबर लहानपणी खेळायला येणारी माया समोर दिसायची. एकदा पुलावर भेटली, सगळे नाते विसरून मला फाडफाड बोलली, म्हणाली, 'मला नाही शिकायचं, माझा खंडोबा माझं बघून घेईल, तुम्ही मला पुन्हा शाळेचं बोलायचं नाही,' असं म्हणून गेली... शेवटचा पर्याय कायद्याचा होता. पोलीस स्टेशनला अर्ज दिला, लहान मुलीचा मुरळी म्हणून गैरवापर होतो आहे. ते म्हणाले, प्रत्यक्ष जागरण गोंधळ सुरू असताना आम्हांला सांगा, आम्ही तिथं येऊन तिला ताब्यात घेऊ. मी गप्पच झालो. आता घरात शुभकार्य असताना कोण आम्हांला कळवणार आणि म्हणणार, की या पोलीस घेऊन आणि बंद पाडा आमचा कार्यक्रम... अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांनी सापळा लावायचे ठरविले. एक मधला मार्ग निघाला मित्र वसंत मनकर व गजेसर वकील. ते म्हणाले तिच्या आईने अर्ज दिला, तर तिची मालकी आईकडे येऊ शकते. कायद्याने हे घडेल. तिचा गैरवापर तर टळेल. रात्रीच्या वेळी वीटभट्टीवर गेलो. आई मासे विकत होती. समोर गि-हाइके. तिला कायदा समजावून सांगितला म्हणालो, फक्त सही करा. मुलगी घरात... तिचे उत्तर ऐकून पायच गळाले... ती म्हणाली, 'कशाला तिला इथं आणता माझ्या बाकीच्या पोरी बिघडवायला... ती अचकट विचकट बोलते. शिव्या देते. राहू द्या तिला तिकडेच, ' खूप संतापलो. गर्दी जमा झाली. म्हटले, दारूसाठी तिची • आजी तिला विकून यकील तिला काहीच फिकीर नव्हती... एक आई अशी बोलू शकते हेच मला पटत नव्हते. तिच्या काकाशी बोललो, तर तो दारूच्या नशेत, त्याची पहिली बायको त्याला