पान:निवडक अंतर्नाद.pdf/३९६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोडून गेलेली. दुसरी केलेली माझ्या सोबत वकील आहे म्हटल्यावर तो त्याचेच दु:ख सांगत बसला... आता काय करावे? अर्ज द्यायला बापही तयार नाही. तो म्हणाला, 'ती आहे पहिल्या नवऱ्याची, मी कसा अर्ज देऊ?' शेवटी तिचा एक मामा औरंगाबादला असतो, त्याच्याशी बापाने संपर्क केला व कायदेशीर प्रकरणातून सुटका केली. मामा आला व मायाला घेऊन गेला. त्याला फोन केला, तर शाळेत घालतो म्हणाला... मला सुटल्यासारखे झाले. किमान माझ्या डोळ्यासमोरून प्रश्न गायब झाला होता. हे फसवे समाधान तरी आहे. मी गावात रोज दबकत फिरतो... पुन्हा माया दिसू नये म्हणून .... आज माया दिसली नाही या समाधानात घरी येतो, पण ती पुन्ह्य कधीतरी दिसणारच आहे.. हे माहीतच होते. आम्ही गाफिल राहिलो पण तिथून काही महिन्यांतच गुपचुप तिला इथे आणले आणि पुन्हा जागरण गोंधळ, रात्रीचे लोक येणे सुरू झाले... तिच्या आजीला, मामाला पैशांची चटक लागली होती. ती इथे आल्याची माहिती चार महिन्यांनी मिळाली, हे पुन्हा लक्षात आले, तेव्हा खूप उशीर झाला होता... १३ वर्षांची ती आता पाच महिन्यांची गरोदर होती.... अॅबॉर्शन करण्याचा घाबरून प्रयत्न करतील आणि मग आरोपी सापडणार नाही तेव्हा तिला नैसर्गिक रीतीने बाळंत होऊ द्यावे, असे ठरवले. तेव्हा बाळंत होताच पोलिसांना कल्पना दिली. पोलीस सतत बंदोबस्त आणि इतर कामे सांगत राहिले. पण पाठपुरावा व ती तिथे आहे याची खात्री करत राहिलो. बाळंत झाल्यावर तिला खूपच रक्तस्त्राव झाला, त्यांची झोपडी रस्त्याच्या खूपच आत होती. तिचे नातेवाईक तिला पाठकुळी घेऊन येत होते. शेवटी एक दिवस सतत पाठपुरावा करून पोलिसांच्यामार्फत तिला ताब्यात घेतले... आम्ही सगळे तिच्या खोपटावर गेलो, तेव्हा ती झोपडीत आत बसली होती. तिच्या आजीने नेहमीप्रमाणे आरडाओरडा केला. तिला वाटले की आपली नात शाळेत जात नाही म्हणूनच पोलीस आले आहेत. सर्वांना पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी कोणतेच पुरावे नाहीत, म्हणून टाळाटाळ केली, पण आम्ही पत्रकारांची मदत घेतली आणि सर्व चॅनलवर बातम्या लागल्या. दिवसभर ठळक बातमी झाली आणि लगेच गुन्ह्य दाखल झाला... माजी आमदार विवेक पंडित येऊन गेले. तेव्हा खूप मोठा सामाजिक प्रश्न यात गुंतलेला असल्याचे लक्षात आले. मुरळी आता महाराष्ट्रात शिल्लक नाहीत असा शासनाचा दावा आहे. तो दावा खोय असल्याचे आमच्या या प्रकरणाने उघड झाले. पण प्रकरण इतके गाजूनही शेवटपर्यंत मुख्य आरोपींना अटक झाली नाही. फक्त तिची आजी व जे गोंधळाच्या कार्यक्रमांना न्यायचे ते वाघ्या-मुरळी यांनाच पकडले गेले. पुढे तिला व तिच्या मुलीला जवळच्या महिला आश्रमात ठेवले. तिथे सतत भेटायला जावे लागायचे, कारण ती खूप त्रास द्यायची. एकदा तिथून पळून जायचा तिने प्रयत्न केला. सर्वोदय नावाच्या एका जुन्या गांधीवादी संस्थेतल्या त्या महिला कर्मचाऱ्यांचे विलक्षण कौतुक वाटते. इतक्या अल्प मानधनात त्या बिचाऱ्या प्रत्येक मुलीची काळजी घेतात. हिने इतका त्रास दिला, पण त्या सारे सहन करायच्या. एकदा मायाने तिच्याच लहान मुलीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्या संस्थेने तिला जीव लावला. पुण्याच्या एका देशपांडे नावाच्या गृहस्थांनी तिच्यासाठी ५००० रुपये पाठविले. हळूहळू केस उभी राहिली. माया आजीला भेटायला व्याकूळ झाली होती. आपली आजी आपल्यामुळे तुरुंगात आहे याचे तिला खूप दुःख व्हायचे. याचा फायदा तिच्या वकिलाने उचलला. त्याने तिला आजीला सोडविण्यासाठी कशी साक्ष द्यायची हे पढविले आणि ती तसेच बोलली. 'माझ्यावर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केला, आजीचा काही दोष नाही,' असे म्हणाली. ती असे बोलल्यावर केसच संपली आणि सर्व आरोपी निर्दोष सुटले. मुख्य आरोपी तर फरार होता. आमचा पराभव झाला... आणि तो जिच्यासाठी इतके केले तिनेच आजीच्या प्रेमापायी केला. मी स्वतः हा एक माझ्या धडपडीचा आठ वर्षे लढून झालेला पराभव मानत होतो. माझ्या पराभवातून एक विषण्णता मनात दाटली होती. स्त्री शिक्षणाची आकडेवारी सतत सांगताना, सावित्रीबाईंचा वारसा सांगताना एका वंचित मुलीला शाळेपर्यंत आणणे... तिला अत्याचारापासून वाचविणे किती कठीण आहे, हे मी गेली सात वर्षे अनुभवत होतो. एक हताशा आणि निराशा नक्कीच मनात आहे.. की आपण पाच वेगवेगळ्या शाळांमध्ये दाखल करूनसुद्धा तिला शिकवू शकलो नाही... पाठपुरावा करूनसुद्धा तिला या अत्याचारातून वाचवू शकलो नाही. आकडेवारीत साक्षरता शिक्षण मोजताना जेव्हा असे एक एक उदाहरण आपण तपासतो, तेव्हा लक्षात येते की हे आव्हान किती थकविणारे आहे शिक्षणावर लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष एका एका समस्येला भिडणे किती कठीण आहे ही जाणीव या प्रकरणाने करून दिली. (पुढे लेखकाने पाठवलेला वाढीव मजकूर) कोर्टाच्या केसचा निकाल लागला. आजी सुटली. त्यामुळे माया खूष होती. पण ती काही केल्या शिकायला तयार झाली नाही. आम्ही निराश झालो. या सगळ्या धडपडीतून शेवटी तिने शिकावे हाच प्रयत्न होता पण तोही फसला, ती मुरळी झाली नाही एवढेच फक्त समाधान. पण हेही समाधान टिकले नाही. माया १८ वर्षांची झाली. अठरा वय झाले की अशा संस्थेत राहणाऱ्या मुलामुलींना त्यांची इच्छा विचारली जाते व त्यानुसार कार्यवाही केली जाते. ज्या संस्थेत ती होती त्यांनी आम्हाला बोलावून घेतले. मी व एक मित्र तिथे गेलो. ती समोर बसली. ते १८ वयानंतरही तिला सांभाळायला तयार होते. मी तिला सुचवले की नगरला स्नेहालय ही प्रसिद्ध संस्था आहे या संस्थेत जर ती गेली, तर मुलीचे चांगले शिक्षण होईल. संस्था तिचे लग्न करून देईल. मी हे बोललो आणि नंतर तिचे जे बोलणे ऐकले तो क्षण मी निवडक अंतर्नाद ३९५