पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोरणं तासन्तास पाह्यत बसणं, काजवे पकडून आगपेटीत ठेवून रात्री त्यांच्या लाईटची गंमत पाहाणं, असे अनेक प्रकार करायला मला लहानपणी आवडायचं. हरीण व मोर पाळणं आणि यवतमाळच्या झपाटे आजोबांसारखं वाघाचं पिल्लू पाळणं, या माझ्या इच्छा मात्र अपुऱ्या राहिल्यात; जशा श्रीमंतांच्या मुलांसारखी पायडल दाबत चालण्याची छोटी मोटर व एका पायाने ढकलत चालवायची स्कूटर, या खेळांच्या राहिल्यात. मोठेपणी मोर पाळायची इच्छा पूर्ण होण्याची संधी आली, पण ती पिलं जगू शकली नाहीत म्हणून ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. बाजारगावच्या शेतात अचानक सापडलेला रंग बदलवणारा सरडा 'चॅमेलीऑन' मात्र अनपेक्षितपणे काही दिवस पाळता आला. बिल्डर बनल्यावर माझ्या पहिल्याच प्लॅट कन्स्ट्रक्शन स्कीममध्ये – 'भूप' अपार्टमेंट्समध्ये तिसऱ्या मजल्यावर मी स्वत:साठी फ्लॅट ठेवला होता. या फ्लॅटच्या हॉलची एक पूर्ण मोठी लांब बाजू मी काचेची केली होती. या काचेला लागूनच दोन आंब्याची व एक कडुलिंबाचं अशी तीन झाडं होती. या झाडांच्या अगदी शेंड्याच्या पातळीला हा माझा फ्लॅट असल्याने अगढ़ी पक्ष्यासारखं वर, पक्ष्यांच्या शेजारी आपण राहतो आहोत, असं तिथे वाटायचं. पक्ष्यांची घरटी अगदी शेजारी अशी दिसायची. इथे ग्रीलही मी मुद्दाम लावली नव्हती, त्यामुळे फांद्यांच्या शेंड्याही मोठ्या मोठ्या काचांच्या उघड्या खिडक्यांतून आत डोकवायच्या. हात लांबवून फलं तोडता यायची. - लग्नाआधीचे हे दिवस असल्याने मी एकटाच तेव्हा तिथे राहत असे. मी कामाला बाहेर गेल्यावर कुणाचा वावरही तिथे नसे, त्यामुळे झाडावरचे पक्षी, पोपट मुक्तपणे उघड्या खिडक्यांतून आत येऊन डायनिंग टेबलवरची शितं खात, किंवा फ्लोअर सिटींगच्या गादीवर हुंदडत. नंतर नंतर मी फारसा धोकादायक नाही व शेजारधर्म पाळणारा आहे, हे कळून येऊन त्यांची भीड चेपली व मी घरात असतानाही हॉलमध्ये मुक्तपणे ते वावरू लागले. नवेगावबांधला सैबेरियातले पक्षी स्थलांतरित व्हायचे, त्याच्या सुरुवातीच्या व नंतरच्या काळात या झाडांवर विविध प्रकारचे पक्षी दिसायचे. त्यातला एक पक्षी तर पुढील वर्षी परतताना याच झाडावर मुक्काम ठोकायचा ते पुढे पाच-सहा महिन्यांपर्यंत गळ्याभोवती पट्टा व कपाळावर लाल टिळा असलेला हा अतिशय देखणा असा हिरवा पक्षी असे. बहुधा हा सुतार जातीच्या प्रकारांपैकी कुठला तरी पक्षी असावा. कारण हा सतत उलटा होऊन झाड कोरीत असायचा व एकलकोंडा असा राहायचा. त्याची ही भीड नंतर चेपून तो डायनिंग टेबल व बैठकीच्या गादीवर यायला लागला होता. आणि दरवर्षी बहुधा हाच पक्षी परतीच्या प्रवासात इथे मुक्काम करीत असावा. कारण दुसऱ्या वर्षी पहिल्याच दिवसापासून तो डायनिंग टेबलवर यायला लागला होता. एकदा खाली राहणाऱ्या डॉ. गंधेच्या उदयने लेन्सने डायनिंग टेबलवरचे त्याचे क्लोज-अप्सही घेतले होते. त्यानेही अगदी डौलदारपणे ते फोटो सेशन दिलं होतं. आताही बंगल्यात माझी खोली दुसऱ्या मजल्यावर असल्याने आजूबाजूच्या झाडांच्या मध्यभागापर्यंत येते. इथेही दोन गुलमोहोराची मोठ्ठी व एक कडुलिंबाचं झाड माझ्या खोलीच्या खिडकीला व समोरच्या गच्चीला लागून आहेत. त्यामुळे आजही माझ्या खोलीत चिमण्यांची व कवड्यांची उन्हाळ्यात राहण्याची, बाळंतपणाची, खाली पडलेली पिल्लं पुन्हा उचलून घरट्यात ठेवण्याची जबाबदारी मी घेत असतो. 'भूप'च्या फ्लॅटमध्ये चहा, साखरेशिवाय माझ्या घरात धान्याचा एक कणही नसायचा. आणि तरीही तिथे एक उंदीर माझ्यासोबत सतत मुक्कामाला राहायचा. मी त्याला काहीच त्रास देत नसल्यामुळे तो न घाबरता खेळकरपणे माझ्या अवतीभोवती हुंदडत असे. रात्री मी झोपल्यावर माझ्या पायाची बोटं कुरतडत असे. रात्री दोन-तीनदा तरी तो असं करून मला उठवत असे. थकलेला असलो व मोठ्याने रागावलो तर आवाजामुळे त्याला कदाचित कळत असे व त्या रात्री त्यानंतर मग मला तो त्रास देत नसे. माझ्या फ्लॅटमध्ये अन्नाचा कणही नसताना हा जगत कसा असेल, असा मला तेव्हा नेहमी प्रश्न पडायचा. त्या अर्थी पोट भरायला खालच्या कुठल्यातरी फ्लॅटमध्ये जाऊनयेऊन मुक्कामाला मात्र निष्ठेने हा माझ्या सोबतीला राहात असतो, असं वाटायला लागलं. एकदा बाल्कनीत मित्रांशी गप्पा मारत असताना तो माझ्या अवतीभवती येऊन खेळत होता. आम्ही खात असलेले दाणे त्याच्या पुढ्यात टाकून माझ्या एका बिल्डर मित्रानेही त्याला खेळवलं व मग मी मग मी नको नको म्हणत असतानाही अचानक एका बेसावध क्षणी काठीने त्याला पाणी जाण्याच्या छिद्रातून खाली ढकललं. अंधारात तिसऱ्या मजल्यावरून तो खाली कुठे पडला, जगला की नाही, काही कळलं नाही, पण त्यानंतर तो फ्लॅटमध्ये मात्र कधीच आला नाही. वेळीच ठामपणे त्या मित्राला अडवलं नाही, याबद्दल माझ्या मनात अजूनही तीव्र हळहळ आहे सुदैवाने ड्रायव्हिंगमध्ये माझ्या हातून आजपर्यंत एक अपवाद वगळता एकही प्राणी मेलेला नाही. बेडूक, सरडा वगैरे जरी अचानक रस्त्यावर आले तरी त्यांना दोन्ही चाकांच्यामध्ये घेऊन मी वाचवायचा प्रयत्न करत असतो. अपवाद फक्त एक. एकदा रात्री अकरा वाजता तोतलाडोहाच्या जंगलात जात असताना अचानक बाजूच्या झाडीतून एका सशाने नेमकी माझ्या जिप्सीच्या समोरच्या डाव्या चाकावरच उडी घेतली व तो तसाच मागे फेकला गेला. ब्रेक दाबून मी गाडी थांबवली. मागे चालत येऊन पाहिलं तर तो एका ठिकाणी जखमी होऊन रक्तबंबाळ झाला होता. पण डोळे उघडत होता. त्याला उचलून गाडीत आणलं, पाणी पाजलं व बाजूच्या सीटसमोरच्या मॅटींगवर ठेवून तोतलाडोहाच्या दवाखान्यात काही उपचार करता येतील, म्हणून निघालो. गाडी चालवताना मध्येमध्ये वाकून, त्याला हात लावून धग आहे का ते मी पाहत असे. तेव्हा तोही माझ्या हाताला बिलगून आधार घेत असे. मध्येच एकदा निवडक अंतर्नाद ३९