पान:निवडक अंतर्नाद.pdf/४००

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रुजू होण्याच्या आधीपासून विभागात चालू होती. दरवर्षी या चर्चासत्रासाठी प्रारंभी एक विषय निश्चित केला जायचा आणि प्रत्येकाने त्या विषयांतर्गंत आपल्या भाषेच्या संदर्भात एक निबंध सादर करायचा व त्या निबंधावर सर्वांनी चर्चा करायची अशी प्रथा होती. दर गुरुवारी हे चर्चासत्र व्हायचे. प्रत्येक आठवड्यास एक निबंध असा वर्षभर हा कार्यक्रम चालायचा विभागातील सर्व प्राध्यापकांना आणि विभागात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या चर्चासत्रात सहभाग घेणे अनिवार्य असायचे. हा असा उपक्रम दिल्ली विद्यापीठात फक्त आमच्या विभागात वर्षानुवर्षे चालत आलेला होता आणि अन्य विभागांतील प्राध्यापकांना त्याचे साश्चर्य कौतुक वाटे मी विभागप्रमुख झाल्यावर गुरुवार प्रमाणे मंगळवारीही चर्चासत्र सुरू केले आणि वर्षभरासाठी गुरुवारच्या चर्चासत्राचा एक व मंगळवारच्या चर्चासत्राचा एक असे दोन विषय ठरवून प्रत्येकाने दोन्ही चर्चासत्रांसाठी एकेक निबंध लिहावा, अशी प्रथा पाडली. या विभागीय चर्चासत्रांसाठी तीस वर्षांमधे आम्ही दोघांनी (मी व माझी पत्नी डॉ. ललिता यांनी) प्रत्येकी पंचेचाळीस निबंध लिहिले, हे सगळे मराठी साहित्याशी संबंधित होते. या निबंधांच्या द्वारे आणि तदनुषंगिक चर्चेच्या माध्यमातून मराठी साहित्याची पृथगात्म वैशिष्ट्ये सर्वांना परिच गेली. उपस्थित होते. तमिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल असे लांबून लांबून निबंधवाचक आले होते. शिवाय आपापल्या भाषांच्या संदर्भात विभागातील पाच प्राध्यापकांनी निबंध वाचले. सावरकरांच्या कवितेवर डॉ. ललिता मिरजकरांनी निबंध वाचला, चर्चा रंगल्या दोन दिवस दणदणीत कार्यक्रम झाला. वृत्तपत्रांमध्ये सचित्र वार्ता आल्या. दिल्ली विद्यापीठामध्ये आमचा विभाग कोणाच्या खिजगणतीत नव्हता, तो एकदम प्रकाशझोतात आला. यानंतर असेच प्रायोजकत्व मिळवून 'कन्नड संत कवयित्रींच्या विशेष संदर्भात भारतीय भक्तिकाव्यातील कवयित्रींचे योगदान', 'असमीया भाषावैज्ञानिक काकती यांच्या विशेष संदर्भात भारतीय कोशवाङ्मय आणि भाषाविज्ञान' वगैरे राष्ट्रीय चर्चासत्रे मी घेतली ही प्रथा पुढे चालूच राहिली. प्रायोजकांना ज्यामध्ये विशेष रुची असेल, त्यावर एक संपूर्ण सत्र ठेवायचे, अन्य भारतीय भाषांतील तत्सदृश कार्यावर एक सत्र ठेवायचे आणि संपूर्ण चर्चासत्राचा विषय त्या विशिष्ट संदर्भात भारतीय साहित्याचा वेध असा ठेवायचा, असे तंत्र मी अवलंबिले आणि रूढ केले. त्याचा प्रारंभ मराठीतील सावरकरांच्या साहित्यापासून झाला हे विशेष! मी जेव्हा विभागप्रमुख झालो, तेव्हा विभागामध्ये वर्षातून एकदा राष्ट्रीय चर्चासत्र घेण्याची नवीन प्रथा सुरू केली. विद्यापीठाकडून याकरिता काहीही आर्थिक साहाय्य उपलब्ध होत नसे. (आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून राष्ट्रीय चर्चासत्रासाठी अनुदान मिळते, पण त्या काळी ती सोय नव्हती. ) तथापि विशिष्ट विषयाशी भावनिक जवळीक असणाऱ्या संस्थांकडून आणि व्यक्तींकडून चर्चासत्रासाठी प्रायोजक म्हणून आर्थिक साहाय्य मिळविणे कठीण नाही, असे माझ्या लक्षात आले. त्याप्रमाणे 'सावरकर प्रतिष्ठान' आणि 'विश्व हिंदू परिषद' यांच्याकडून आर्थिक साहाय्य मिळवून 'सावरकरांच्या विशेष संदर्भात भारतीय साहित्यातील देशभक्तीची मूल्ये' ('Patriotic elements in Indian Literature with special reference to Savarkar) या विषयावर मी विभागातर्फे पहिले राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले. उद्घाटनाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून देवदत्त दाभोलकर, उद्घाटक म्हणून के. ज. पुरोहित यांना बोलावले. स्वागताध्यक्ष म्हणून वसंत साठे स्वेच्छेने सहभागी झाले. एक उद्घाटन सत्र, एक सत्र खास सावरकरांच्या साहित्यावर आणि एक सत्र अन्य भारतीय भाषांमधील साहित्यातील देशभक्तीच्या मूल्यांविषयी असा तीन सत्रांचा भव्य कार्यक्रम झाला. के. ज. पुरोहितांचे उद्घाटनाचे भाषण अप्रतिम झाले. सावरकरांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचे त्यांनी सुरेख विश्लेषण केले. दीडशे श्रोते माझ्या मार्गदर्शनाखाली दिल्ली विद्यापीठात एकूण दहा पीएच. डी. चे प्रबंध आणि पाच एम. फिल. च्या प्रबंधिका झाल्या. पीएच. डी. च्या दहा प्रबंधांपैकी मराठीचे दोन आणि बाकीचे तौलनिक भारतीय साहित्याचे होते. एक पंजाबीमधील होता. तौलनिक भारतीय साहित्याच्या प्रबंधासाठी विषय देताना त्याचा मराठी साहित्याशी काहीतरी संबंध असावा असा माझा कयक्ष असायचा. एका •एम. फिल. साठी विद्यार्थिनीने "रत्नाकर मतकरींचे 'आरण्यक' आणि धर्मवीर आमची मराठी मित्रमंडळी आमच्या घरी आल्यावर आमची मुले सहजशुद्ध मराठीत वार्तालाप करताना पाहून त्यांना साश्चर्य कौतुक वाटायचे व ते ती बोलून दाखवायची; पण हा प्रयोग आपल्या मुलांच्या बाबतीत करावा असे त्यांना कधी वाटले नाही! भारतींचे 'अंधायुग' या नाटकांचा तुलनात्मक अभ्यास असा विषय प्रबंधिकेकरिता घेतला होता. तिला मार्गदर्शन करताना रत्नाकर मतकरींच्या 'आरण्यक' चे मी हिंदीमध्ये भाषांतरच करून टाकले. बरेच दिवस ते माझ्या संग्रही होते. ते प्रसिद्ध करण्याचा मानस होता, पण सवड होत नव्हती. मग 'आरण्यक'चे हिंदी भाषांतर प्रसिद्ध झाल्याचे मला समजले आणि माझे हस्तलिखित कुठेतरी हरवून गेले. वर जी मराठी विषयाची दुर्दशा वर्णन केलेली आहे, त्याचे मूळ शालेय जीवनातच आहे. दिल्लीमध्ये चार-पाच लाख मराठीभाषक राहात असतील पण या तिथे राहणाऱ्या मराठी लोकांच्या मुलांचा मराठीशी संबंध तुटत चालला आहे. त्यांचे आईवडीलच त्यांच्याशी कौतुकाने इंग्लिश किंवा हिंदीमधून बोलतात, मग त्यांचा मराठीशी संबंध राहणार कसा? आपले मूल सफाईदार इंग्लिशमध्ये वा हिंदीमध्ये बोलते, त्याला मराठी नीट येत नाही, ही बाब आईवडिलांना चिंतेची न वाटता उलट कौतुकाचीच वाटत असेल, तर त्याला कोण काय करणार? आमची मराठी निवडक अंतर्नाद ३९९