पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आक्रोशांचे अवकाश प्रतिभा रानडे सत्ताधीश कोणीही असोत - भांडवलशाहीचे, साम्यवादी, कट्टर धर्मवादी असोत - सगळेच आपापल्या राजकीय, आर्थिक सत्तेसाठी बळी देतात तो सर्वसामान्यांनाच. मग ते सैनिक असोत वा नागरिक असोत. सध्या चर्चेत असलेल्या अफगाणिस्तानच्या काही आठवणी. त्या देशात काही वर्षे वास्तव्य केलेल्या लेखिकेने जागवलेल्या. अफगाणिस्तान सोडून अडतीस वर्षे होऊन गेलीत. पण त्या देशाशी जुळलेले नाते अजूनही मला तोडता आलेले नाही. कारण जीव गुंतला होता तो त्या अत्यंत अस्वस्थ काळात होरपळून निघणाऱ्या अफगाणांच्या सुखदु:खांमध्ये अजूनही त्यांच्या सुखदुःखांच्या बातम्याच मला ते नाते तोडू देत नाहीत. काही अफगाणांनादेखील माझ्याशी नाते तोडवत नाही. काही महिन्यांपूर्वीच शाह मोहम्मद रईस यांचा फोन आला होता. त्यांना मला भेटण्यासाठी माझ्या घरी यायचेय. १९७६ ते १९८० या चार वर्षांच्या वास्तव्यातील माझ्या आठवणी ऐकायच्यात. आमच्या बंगल्याच्या छपरावर पडलेल्या शेल्स, आम्ही काढलेले फोटो त्यांना पाहायचेत. त्यांनी माझ्याशी फोनवर बोलण्याचे कारण माझा धाकटा मुलगा सौमित्र, तेव्हा तो १२ वर्षांचाच होता. अफगाणिस्तानबद्दल लिहिताना एक जुनी आठवण सांगायला हवी. माझे पती फिरोझ (ऊर्फ मुकुंदा) यांच्या नोकरीमुळे आम्ही इथे आलो असतानाची. इथे यायचे ठरले तेव्हाच मनाने ठरवून टाकले होते, की संधी मिळाली की बादशहाखान यांना भेटायचे. हातात बंदुका घेऊनच जन्माला येणाऱ्या पठाणांना त्यांनी अहिंसेची दीक्षा दिली होती. मुस्लिम लीगच्या राजकारणाला स्वत:पासून चार हात दूर ठेवणाऱ्या याच गफारखानांच्या 'लाल शर्टवाल्यांच्या जीवावरच काँग्रेस स्वतःचे निधर्मी राजकारण करत होती. माझ्या देहाचे तुकडे होतील, मगच देशाची फाळणी होईल असे म्हणणाऱ्या महात्मा गांधींसकट सगळेजण वेळ आली तेव्हा बादशहाखान यांना विसरून गेले. परस्परच ब्रिटिशांशी समझोता करून मोकळे झाले. या आणि अशा कित्येक गोष्टींमुळे बादशहाखान यांच्या नावाभोवती अद्भुततेचे वलय आलेले आहे. म्हणूनच त्यांना पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती. पण इथे आल्यावर लक्षात आले, की त्यांना भेटणे फारच कठीण आहे. पाकिस्तानी नागरिक असूनही पाकिस्तानशी शत्रुत्व असल्यामुळे बादशहाखान अफगाणिस्तानातच राहत. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल फारच गुप्तता पाळली जाई. ते कधी काबूलला असत तर कधी जलालाबादला असत. इथे यांना खूपच मान असे. साधारणपणे त्यांना इथे 'बाबा'च म्हटले जाई. शिवाय मुकुंदा केंद्रसरकारचा अधिकारी आम्ही त्यांना भेटायला गेलो तर त्याचा काय अर्थ लावला जाईल कुणास ठाऊक? 'बादशहाखान यांना भेटण्याचा तुमचा एवढा आग्रह कशाला?' अधिकारावर असलेल्या एकाची ही वृत्ती आणि सल्लादेखील. त्यामुळे बादशहाखान यांना भेटणे होतच नव्हते. पुण्याचे श्री. हरिभाऊ जोशी आणि मुंबई सकाळ' चे श्री. माधव गडकरी बादशहाखान यांना भेटायला काबूलला आले. जोशींचे वय ऐंशी, पूर्णपणे शाकाहारी, पथ्याचे खाणारे, ते इथल्या हॉटेलमध्ये कसे राहतील? ओळख नसली तरी आपली मराठी माणसेच आहेत, हॉटेलमध्ये कुठे राहतील, असा विचार करून, एअरपोर्टवरून त्यांचा फोन आला तेव्हा मुकुंदाला सांगून त्यांना आमच्या घरीच राहायला बोलावले. ते आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी इथे 'पश्तूनिस्तान डे' साजरा झाला. पश्तुनिस्तान चौकामध्ये आम्हीही सगळे गेलो. तिथे भाषणे वगैरे झाली. त्या दिवशी शंभर- दीडशे पठाण मुद्दामहून दूरवरून आले होते. 'पश्तुनिस्तान झालेच पाहिजे', 'पठाणांना न्याय मिळालाच पाहिजे' म्हणून जोरजोरात भाषणे झाली. भुट्टो फाशी गेले त्याअगोदर ते इथे आले होते, तेव्हा विमानतळावरून अर्ग पॅलेसवर जाताना, त्यांनी या मुख्य राजमार्गाने जाण्याचे नाकारले होते. त्यांची गाडी वळसे घेऊन दुसऱ्याच रस्त्याने गेली होती. त्याचे कारण, या चौकाला पश्तुनिस्तानचे नाव आहे हे होते आणि दरवर्षी 'पश्तुनिस्तान डे' साजरा करणाऱ्या अफगाण सरकारने त्या वेळी भूट्टोंच्या म्हणण्याला मान तुकवली होती! जाहीरशहा काय, दाऊदखान काय किंवा तराकीचे नवीन क्रांतिकारी सरकार काय, पश्तुनिस्तानच्या बाबतीत सगळ्यांचे धोरण एकच होते. बरीच खटपट केल्यानंतर बादशहाखान यांचा ठावठिकाणा मिळाला. जोशी आणि गडकरी यांचे जलालाबादला जाण्याचे ठरले. त्यांच्याबरोबर जाण्याची माझी फार इच्छा होती. कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही याची खात्रीच होती मला. पण आपल्या अॅबॅसडरसाहेबांची तशी इच्छा नव्हती. जोशी यांचीही इच्छा नव्हती. त्यांचे म्हणणे होते की, ते स्वतः बऱ्याच वर्षांनी निवडक अंतर्नाद ४०३