पान:निवडक अंतर्नाद.pdf/४०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'शांततेचं शहर काबूल!' अनेक फलकांवर हात उंचावलेल्या लेनिनचे फोटो झळकत होते! त्याच वेळी कॅसेट्सवरची अफगाणांची गाणी ऐकता आली. अफगाण सैनिकांचीच गाणी होती ती. लपवून ऐकता आली. 'सूर्य मावळतोय, बॉम्बसारखा दिसतो, क्षितिजावरचा सूर्य' 'कुणाला हवंय ते वैभव, मला फक्त जिवंत राहायचंय,' 'मारतो आम्ही माणसांना का? माणसं मारतात आम्हाला, का?' एक गाणे तर असे होते, 'माझ्या प्रिय रशिया, का केलास विश्वासघात माझा?' ही गाणी ऐकून स्वेटलाना चक्रावून गेल्या. अफगाणांची मनःस्थिती त्यांना कळली. ती त्यांना सांगितले गेले होते त्यापेक्षा वेगळीच होती. डिसेंबर १९७९ ते फेब्रुवारी १९८९ या दहा वर्षांत रशियाने अफगाणिस्तानात एकूण दहा लाखांचे सैन्य पाठवले होते. त्यापैकी रशियन सरकारच्या आकडेवारीनुसार पन्नास हजार मृत्यू पावले होते. त्यापेक्षा कितीतरी अधिक नाहीसेच झाले होते. कारण त्यांच्या शवपेट्या परत आल्याच नव्हत्या किंवा ते स्वतः ही परत आले नव्हते. अफगाणिस्तानातील आभाळाला भिडणाऱ्या पर्वतांवर आणि त्यांच्यामधल्या खोलखोल दऱ्यांमधे कुठे कुठे मरून पडले असतील. नाहीतर उत्तर अफगाणिस्तानामधल्या वाळवंटात वाट चुकून गेले असतील आणि आपल्या जीप्स, रणगाड्यांसह जिवंत गाडले गेले असतील. ती वाळवंटे तशीच आहेत. ज्यांचे हात-पाय तुटलेत, दृष्टी गेली, बहिरेपणा आलाय, आवाज बंद पडलेत, मानसिक आजार झालेत अशांची संख्या तर मोजलीच गेली नाही. पायदळ, वैमानिकांबरोबर डॉक्टर्स, नर्सेस, स्वयंपाकिणी, मोलकरणी पाठवल्या होत्या. काही वेश्यांनादेखील पाठवले होते. सैनिकांची 'ती' गरज भागवण्यासाठी! जे सैनिक पाठवले गेले होते, ते बहुतेक सगळेच अगदी सर्वसामान्यांमधलेच होते. जेमतेम शिक्षण झालेले, तर पुष्कळसे विद्यार्थीच होते. ज्यांचे वडील, काका, मामा सैन्यातील होते त्यांच्यापैकी मोजकेच कोणी होते. श्रीमंत, उच्चभ्रू सरकारी नोकरदार, विचारवंत, लेखक, कलावंत, वकील, कम्युनिस्ट पक्षाचे लहानमोठे नेते, अशा सारख्यांच्या मुलांना मात्र पाठवले नव्हतेच. त्यांच्यापैकी बहुतेकांना अफगाणिस्तान हा देश कसा आहे, कुठे आहे हेदेखील माहीत नव्हते. अफगाणिस्तानात पाठवताना त्यांना सांगितलं गेले होते की तुम्हाला तिकडे पाठवीत आहोत ते 'आपल्या मातृभूमीची प्रतिष्ठा जपण्यासाठी.' आपल्यावर आंतरराष्ट्रीय जबाबदारी आहे ती निभावण्यासाठी तुम्हाला तिकडे जायचं आहे. अशा सांगण्यामुळे त्या तरुणांच्या मनात स्फुरण आले होते. त्याचबरोबर असेही सांगितले गेले होते की अफगाणिस्तान हा देश अत्यंत गरीब आहे, मागासलेला आहे. तिथे जाऊन आपल्याला हॉस्पिटल्स बांधायची आहेत, शाळा, कॉलेजेस सुरू करायची आहेत, आधुनिक शिक्षण द्यायचे आहे, नवे उद्योग सुरू करायचेत. तिथल्या श्रीमंतांनी, राजकर्त्यांनी जमीनदारांनी गरिबांवर केलेले अत्याचार दूर ४०६ निवडक अंतर्नाद करायचेत. त्यांना सुस्थितीत आणायचे आहे. अमेरिकेसारख्या भांडवलशाहीच्या विळख्यातून त्यांना सोडवायचे आहे. तुम्ही तिकडे गेल्यावर तुमच्या सुरक्षिततेची, खाण्यापिण्याची, औषधोपचारांची पूर्ण जबाबदारी आपलेच सरकार घेणार आहे. जी मुले विद्यार्थी होती त्यांना पगार सुरू केला जाईल, जे नोकरी करणारे होते त्यांना पगार दीडपट करणार, अशी सगळी आश्वासने त्यांना दिली गेली. कमावला, ज्यांना त्यांचा पूर्ण पगार मिळू लागला होता त्यांनी आपल्या पैशाने काबूलमधल्या दुकानातून स्वस्तात मिळणाऱ्या जपानी, अमेरिकी वस्तू, कपडे विकत घेतले आणि रशियाला आपल्या गावी परत गेल्यावर त्याच वस्तू दुप्पट तिप्पट पैशांना विकून पैसा तर अनेकांनी दुकानातील वस्तू उचलल्या', त्यांच्याकडे पैसे मागण्याची हिंमतच अफगाण दुकानदारांकडे नव्हती, तर काही सैनिकांनी अफगाणांच्या घरात शिरून घरात सापडतील त्या वस्तू पळवल्या होत्या. काही सैनिकांनी तर अफगाणांना मारल्यानंतर त्यांच्या हातातल्या वजनाने हलक्या, उत्तम प्रतीच्या मशिनगन्स, त्यांचे बूट, त्यांची गरम जाकिटे, त्यांच्या जवळचे पैसेदेखील काढून घेतले होते. ही त्यांची एक काळी बाजू झाली. दुसरी बाजू तर त्यांच्याबद्दल दया वाटणारी आहे. ज्यांनी आधी थोडेफार सैनिकी शिक्षण घेतले होते त्यांची गोष्ट वेगळी होती. पण ज्या तरुणांनी त्यांच्या आयुष्यात प्रथमच कमरेभोवती मशीगन्सच्या गोळ्यांचे वजनदार पट्टे बांधले आणि हातामध्ये जडशील कॅलिनाश्कॉव्ह मशीनगन धरली होती, त्यांची गोष्ट वेगळीच ठरली. त्यांना जेव्हा हुकूम झाले, 'शूट'... तेव्हा क्षणभरासाठी त्यांचे मन सुत्र झाले. 'शूट' म्हणजे काय ? 'मशीनगनचं बटण दाबून धरा!' हे सांगितले गेले, पण समोरच्यांवर बंदूक चालवण्याची हिंमतच होत नव्हती. या अनोळखी, काहीही संबंध नसलेल्यांना ठार मारायचे? पण त्यांना मी नाही मारले तर समोरचे लोक मला मारतील! क्षणभरासाठी मस्तकात वादळ उठले आणि दुसऱ्याच क्षणाला मशीनगन्समधून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. एका सैनिकाने स्वेटलानाला सांगितले, 'तुमच्या भोवती बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज घुमत असताना, मरण म्हणजे काय हे तुम्हाला कधी कळणारच नाही. तुमच्या शेजारीच असलेला सैनिक मरून पडलेला असतो, तो मेलाय हे माहीत असलं तरी तुम्ही त्याला हाका मारत सुटता! हे का, कसं होतं हे कसं कळणार तुम्हाला? हा अनुभव तुम्ही घेतलेलाच नाही.' दुसऱ्या एका सैनिकाने स्वेटलानाला सांगितले, 'आम्ही एका गावाला पूर्णपणानं उद्ध्वस्त केले. बायका, पुरुष, मुलांची प्रेतं सगळीकडे पडलेली दिसत होती. एका म्हातारी मात्र कशीबशी वाचली होती. तिला पकडून आमच्यासमोर आणलं तेव्हा आम्हाला बघून तिरस्कारानं ती थुंकली होती. आम्ही ते गावच उद्ध्वस्त केलं होतं. कारण त्या गावच्या कितीतरी लोकांनी त्या गावावरून उडत जाणाऱ्या आमच्या हेलिकॉप्टर्सवर तोफांचा मारा केला होता. कितीतरी हेलिकॉप्टर्स जाळूनच टाकली होती. त्यातल्या आमच्या माणसांच्या चिंधड्या उडाल्या होत्या. म्हणून आम्ही त्या गावाला उद्ध्वस्त करून टाकलं. आता या सगळ्याची