पान:निवडक अंतर्नाद.pdf/४११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असते. तोच जगाचा इतिहास आहे मग त्या महासत्ता 'उजव्या विचारसरणीची भांडवलशाही असो, कम्युनिस्ट असोत की कट्टर धर्मवादी असोत. त्यांच्या मूळच्या विचारांचा अतिरेक झाला की मग त्यांचे 'वाद' होतात आणि मग जगाला आपल्या वादात गुंडाळून घ्यायच्या मोहिमेवर ते निघतात. जे रशियाने अफगाणिस्तानच्या बाबतीत केले, तेच अमेरिकेने व्हिएटनामच्या बाबतीत केले होते. दुसरे महायुद्ध संपले आणि एकापाठोपाठ एक वसाहतवाद्यांच्या गुलामीतून एक एक देश स्वतंत्र होऊ लागला. हिंदुस्थानची फाळणी झाली तरी इंग्रजांचे राज्य संपले, भारत स्वतंत्र झाला. व्हिएटनामवरची फ्रेंचांची सत्ता घसरणीला लागली. १९४६ सालापासून व्हिएटनाममधील कम्युनिस्टांनी व्हिएटकाँगनी आघाडी उघडली घातपाताचे प्रकार सुरू झाले. व्हिएटकाँगला चीनची मदत अर्थात होतीच. उत्तर व्हिएटनाममधले वातावरण बिघडतच चालले. दक्षिण व्हिएटनाममधल्या लोकांना वाटले, हे युद्धच सुरू झालेय की काय? व्हिएटकॉन्ग आमच्या जिवावरच उठलेत. आपली कुटुंबे, घरे, शेती, नोकऱ्या यांच्याबद्दलच्या काळज्या वाढतच गेल्या दक्षिणेकडून आरंभापासूनच कम्युनिस्टांना व्हिएटकॉन्गना विरोधच होता, कारण त्यांच्यामुळे आपल्या जगण्यावर कित्येक बंधने येतील, आपले हक्क गमावून बसावे लागेल यांची त्यांना खात्री वाटत होती. त्यामुळे त्यांचे बळ वाढू नये म्हणून अमेरिका त्यांना मदत करण्यास उत्सुक होतीच, अमेरिकेने १९५० सालापासूनच फ्रेचांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली, म्हणजे त्यांना व्हिएटनामची 'काळजी' घेण्यास मदत होईल. १९५४मध्ये जिनिव्हामध्ये शांती परिषद भरली, उत्तर व्हिएटनाम आणि दक्षिण व्हिएटनाम हे दोन वेगवेगळे घटक आहेत, त्यांच्यामध्ये मूलभूत मतभेद आहेत ही गोष्ट त्या परिषदेमध्ये अधोरेखित झाली. या परिषदेपाठोपाठच उत्तर व्हिएटनामचे नेते, व्हिएटकॉन्गचे नेते हो चि मिन्ह यांना दक्षिण व्हिएटनामवर हल्ला करून आपले वर्चस्व स्थापन करायचे होते. पण चीनने त्यांना आवर घातला. युद्धामुळे परिस्थिती चिघळत जाईल, त्यापेक्षा सार्वत्रिक निवडणुका घ्याव्यात. निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर झाला, पण हो चि मिन्हच्या मनातील इच्छा लोकांना समजलीच होती. फ्रेंच तर निघून गेलेच होते. या निवडणुकीनंतर सत्ता व्हिएटकॉन्ग काबीज करणार, मग ते आमच्या जिवावरच उठतील ही भीती उत्तरेतील लोकांना भेडसावत होती. म्हणून दहा लाख लोक दक्षिणेकडे स्थलांतरित झाले. त्यामध्ये अनेक ख्रिस्ती होतेच. इतर बौद्धधर्मीय होते. त्यांना सुखरूपपणाने जमिनीवरून येणे धोक्याचे होते. त्यांना समुद्रमार्गाने हलविण्यासाठी अमेरिकेने आपला जहाजांचा ताफाच पाठवला. एकदा पोचल्यावर स्थायिक होता यावे म्हणून नऊ कोटी डॉलर्स पाठवले. तेव्हापासूनच म्हणजे १९५५ पासून अमेरिका व्हिएटनाममध्ये गुंततच गेली. त्यांच्या सुरक्षिततेसाठी अमेरिकेने दक्षिणेकडे सोळा हजार सैनिक पाठवले. तेव्हापासून उत्तरेकडून होणारे ४१० निवडक अंतर्नाद हल्ले वाढत गेले. अमेरिकेकडून येणाऱ्या सैनिकांची संख्या वाढत गेली. काही काळानंतर सैनिकांना परत जावे लागायचे, त्यांची जागा घ्यायला नवे सैनिक पाठवले जायचे. एकूण संख्या दहा लाखापर्यंत पोचली. रशियन सैनिकांप्रमाणेच अमेरिकेच्या सैनिकांत सर्वाधिक होती ती अगदी सर्वसामान्यांची मुले. शिक्षणात कमी असलेली. सैनिकी शिक्षण घेतलेलेदेखील कमीच. श्रीमंत, उच्चभ्रू, सरकारात उच्च पदावरचे, विचारवंत, कलावंत वर्गातील मुले अगदीच कमी कृष्णवर्णीयांची संख्या तर अधिकच होती. त्यापैकी बहुतेकांची वये होती ती विशीच्या आतबाहेरचीच, त्यांना सांगितले होते, आपल्याला व्हिएटनामी लोकांना कम्युनिस्टांच्यापासून वाचवायचे आहे हे कारण बहुतेकांना पटले होते, तरीदेखील अनेकांना वाटले होतेच की आपण त्यांच्या भानगडीत पडूच नये. तरी अमेरिकेने आपल्या सैन्याला पाठवणे सुरूच ठेवले. दक्षिण व्हिएटनाममधील कडोविकडीच्या युद्धाचे स्वरूप होते ते गनिमी काव्याचेच तेथील घनदाट जंगलामुळेच नंतर अमेरिकेने हवाई हल्ले करायला सुरुवात केली. मृत्यूचे तांडव सुरू झाले. दूरचित्रवाणीवरून तिथल्या युद्धाची दृश्ये दाखवली जात होती. ती वस्तुस्थिती पाहून अमेरिकेचे लोक हादरून गेले. आमची मुले अपंग होताहेत, मरताहेत या दुःखाने लोकांचा या युद्धाला विरोध वाढत चालला. सरकारवर त्यांची दडपणे वाढत चालली. एक तर युद्धात कामाला येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आर्थिक बोजा वाढत होता. जे सैनिक परत यायचे त्यांची अवस्था केविलवाणी झाली. लष्करी विमानाचे पायलट जॉन चेशियार यांनी म्हटले होते, 'आम्हाला सांगितलं होतं, तुम्ही युद्धावरून परत याल तेव्हा तुमचे स्वागतच होईल, पण परत आल्यावर आम्हाला धिक्कारच सहन करावा लागला होता. आम्हाला पाहून लोक तिरस्कारानं थुंकायचे, काहींच्या अंगावर तर कचरा फेकला होता. अमेरिकेने रासायनिक शस्त्रे वापरायला सुरुवात केली. त्यामुळे एका लहान मुलीच्या अंगावरचे कपडे जळून गेले. ती मुलगी आक्रोश करीत पळत होती. हे दृश्य वृत्तपत्रांमधून, दूरचित्रवाणीवरून जगभर पोचले आणि युद्धाचं चित्रच बदलायला सुरुवात झाली. ' माघारी १९७५ च्या मे महिन्यापासून अमेरिकेने आपल्या सैन्याला आणण्याची सुरुवात केली. ज्या दक्षिण व्हिएटनाममधील लोकांना अमेरिकेचे सैन्य परत गेल्यानंतर आपले राहणे सुरक्षित नसणारच असे वाटले होते, त्या लोकांना अमेरिकेत जायचे होते. त्या हजारो लोकांना त्यांच्या कुटुंबीयांसह अमेरिकेने आपल्याबरोबर घेऊन जायला सुरुवात केली. अनेक विमानाने गेले, परंतु बहुतेक लोक जहाजातून निघाले होते. त्यांच्यापैकी कितीतरी जहाजांवर व्हिएटकॉन्गने हवाई हल्ले करून त्या जहाजांना, त्यातील माणसांसह जलसमाधी दिली होती. व्हिएटनाममधील युद्धात मानवी नुकसान किती झालेय त्याची मोजदाद अमेरिकेने केली. ती प्रसिद्ध केली. अमेरिकेने