पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांधी यशवंत रांजणकर यशवंत रांजणकर यांची ‘अ - पूर्व चित्रगाथा' ही अंतर्नादमधील लेखमाला (मे १९९६ ते जुलै १९९७ ) खूप गाजली होती. गॉन विथ द विंड, द गॉडफादर, सायको, वदरिंग हाइट्स, कॅसाब्लांका, २००१ : अ स्पेस ओडेसी, लॉरेन्स ऑफ अरेबिया आणि सिटिझन केन या आठ श्रेष्ठ चित्रपटांच्या निर्मितीची ती कहाणी. त्यानंतर स्नो व्हाईट अँड द सेव्हन ड्वास (ऑगस्ट २००४) व शिंडलर्स लिस्ट (दिवाळी २००५) या चित्रपटांविषयी त्यांनी लिहिले. त्याच मालिकेतील हा गांधी चित्रपटाच्या निर्मितीविषयीचा लेख. १९६२मधला एक दिवस. रात्री झोपायला बराच उशीर झाल्यामुळे रिचर्ड अॅटनबरो दिवस बराच वर आला तरी गाढ झोपेत होते. त्यांना जाग आली, ती फोनच्या अविरत खणखणण्यानं त्यांनी रिसीव्हर उचलला. कुणा अपरिचित अशा भारतीय गृहस्थांनी तो फोन केला होता, मोतीलाल कोठारी, असं त्यांनी आपलं नाव सांगितलं. त्यांना अगदी तातडीनं अॅटनबरोंची भेट हवी हाती काम फारच महत्त्वाचं होतं. मात्र फोनवर त्यांना त्याची वाच्यता करता येत नव्हती. कामाचं स्वरूप अत्यंत गोपनीय होतं. गृहस्थाच्या स्वरातली कळकळ आणि गांभीर्यं अॅटनबरोंना जाणवलं. आणखी दोन दिवसांनी आपण सवड काढू शकू, असं त्यांनी सांगितल्यावर कोठारींनी भेटीची वेळ नि स्थळ त्यांना कळवलं. त्याच दिवशी दुपारी अॅटनबरोंचा एक मित्र आणि चित्रपट व्यवसायातला सहकारी डेनिस ओ' डेल याचा त्यांना फोन आला. त्याला त्या गूढ कोठारींविषयीच त्यांच्याशी बोलायचं होतं. कोठारी यांचं लंडन इथं वास्तव्य असून ते इंडियन हाय कमिशनच्या सेवेत होते. ते कट्टर गांधीभक्त होते. गांधीजींचं कार्य आणि तत्त्वज्ञान यांचा जगाला परिणामकारक परिचय करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर एक चित्रपट निघावा, याकरिता त्यांची केव्हापासून धडपड चालली होती. याच संदर्भात ओ डेलशी त्यांचा कुणीतरी परिचय करून दिला होता. ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील दोघा- तिघा मान्यवर दिग्दर्शकांपुढे 'गांधी' चित्रपटाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु त्यांनी त्यात स्वारस्य दाखवलं नाही. अखेर अॅटनबरोंशी या बाबतीत सूर जुळू शकतील, असं डेनिस आणि कोठारी यांना वाटलं. अॅटनबरो तेव्हा ३९ वर्षांचे होते. ब्रिटिश सिनेमाच्या नव्या प्रवाहातील ते एक अग्रणी होते. एक चतुरस्त्र नट आणि स्वतंत्र निर्माता म्हणून त्यांची कारकीर्द बहरात होती. ब्रिटिश रंगभूमीवरील आघाडीचे नट म्हणूनही ते ख्यातनाम होते. जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या 'माउसट्रॅप' या नाटकातील त्यांची डिटेक्टिव्ह सार्जंट ट्रॉटर ही महत्त्वपूर्ण भूमिका चांगलीच गाजली होती. कामांची त्यांना मुळीच ददात नव्हती. अनेक चांगले चांगले प्रस्ताव प्रत्यही त्यांच्याकडे येत होते. अशा एकूण परिस्थितीत आपण एका अनोळखी गृहस्थाशी, आपल्याला विशेष काहीच माहिती नसलेल्या विषयाच्या संदर्भात भेट घेण्यास का तयार झालो, हे मात्र अॅटनबरोंना कोडंच वाटत होतं. ही तो कोठारींची इच्छा ! • ठरल्या दिवशी ठरल्या वेळी अॅटनबरो नि कोठारी यांची ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये भेट झाली. 'गांधी' प्रस्तावावर बोलणं सुरू करण्यापूर्वी कोठारींनी थोडा वेळ घेतला. ते सारखे संशयी नजरेनं आजूबाजूला पाहत होते. बोलतानाही तोच प्रकार, एकूण हा विषय त्यांना अत्यंत गोपनीय वाटत होता. आपलं बोलणं अॅटनबरो यांच्याखेरीज अन्य कुणाच्याही कानी जाऊ नये, याची ते आटोकाट खबरदारी घेत होते. रेस्टॉरंटमध्ये बसलेल्यांपैकी कुणी सहज जरी त्यांच्याकडे पाहिलं तरी ते एकदम गप्प होत. त्यांचं बोलणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच सौम्य होतं. परंतु, 'गांधी' चित्रपट करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही, हे मात्र त्यांनी अगदी निर्धारपूर्वक सांगितलं. हे सारं खरं! पण या गृहस्थाला सिनेमातलं फारच थोडं कळत होतं. शिवाय मुळात त्याच्याकडे स्क्रिप्टही नव्हतं. आणि भांडवल तर त्याहूनही नव्हतं. व्यवसायात ओळखी थोड्याफार होत्या, इतकंच. मग कोठारींपाशी होतं तरी काय? तर गांधीजींच्या चरित्राचं एक पुस्तक आणि चित्रपटाच्या माध्यमातून गांधीजींचा साऱ्या जगाला परिचय करून देईल, असा एक मुरब्बी व्यावसायिक शोधून काढण्याचा निर्धार ! • मुळात अॅटनबरोंना भारताबद्दल फारशी माहिती नव्हती, होती, तीही शाळकरी पोराच्या भूगोलाच्या ज्ञानाइतपतच. आणि गांधीजींविषयी तर त्याहूनही कमी, गांधी हत्येच्या वार्तेनं ब्रिटिश निवडक अंतर्नाद ४१९