पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दिल्ली. सप्टेंबर १९६४. श्रीमती इंदिरा गांधी यांना जेराल्ड हॅन्लीचं स्क्रिप्ट दाखवताना रिचर्ड अॅटनबरो आणि मोतीलाल कोठारी (इंदिराजींची तीन महिन्यांपूर्वी माहिती आणि प्रसारण खात्याच्या मंत्री म्हणून नियुक्ती झाली होती) अशी त्याची संभावना केली. अॅटनबरोंचा एजंट जॉन रेडवे यानंही चित्रपट दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात असा अवघड प्रचंड विषय घेऊ नये, असा व्यावहारिक सल्ला दिला. शिवाय अशा प्रकल्पास लागणाऱ्या प्रचंड भांडवलाच्या उभारणीसाठी कोणतीही वितरणसंस्था वा वित्तसंस्था पुढे येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच, असंही बजावलं. उमेद वाढावी, असं काहीही न बोलता प्रत्येक जण अनेक समस्यांचाच बागुलबुवा उभे करत होता. अॅटनबरो आणि कोठारी यांच्या भेटीत या साऱ्याचा ऊहापोह झाला. कार्यारंभ करण्यापूर्वी एक गोष्ट मात्र निश्चितच आवश्यक होती. भारत सरकारची मान्यता, पसंती, ती मिळाल्याशिवाय या प्रकल्पाला हात घालता येणं शक्य नव्हतं. या बाबतीत लॉर्ड लुई माउंटबॅटन यांची मदत घ्यायचं अॅटनबरोंनी ठरवलं. लॉर्डसाहेबांच्या युद्धकालीन नौदल कारकिर्दीवर आधारलेल्या 'इन विच वुई सर्व्ह या चित्रपटात अॅटनबरोंनी भूमिका करून आपल्या रुपेरी कारकिर्दीचा प्रारंभ केला होता. त्या निमित्तानं दोघांची ओळख झाली होती, माउंटबॅटन हे स्वातंत्र्यपूर्व भारताचे शेवटचे व्हाइसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे ते निकटवर्ती स्नेही अॅटनबरो १९६३मध्ये त्यांना भेटायला गेले असता त्यांनी त्यांची विनंती तात्काळ मान्य केली. कर्मधर्मसंयोगानं अगदी लवकरच ते भारतात जाऊन पंडित नेहरूंची भेट घेणार होते. त्या वेळी अॅटनबरोंच्या गांधी प्रकल्पात मध्यस्थ होण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. आणि नंतर त्यांनी ते यशस्वीपणे पारही पाडलं, परिणामी, एकूण प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी, चर्चा करण्यासाठी भारतात येऊन आपल्याला प्रत्यक्षच भेटावं, असं पंडितजींचं अॅटनबरोंना आमंत्रण आलं. ४२२ निवडक अंतर्नाद गेल्या कित्येक वर्षांपासून हृदयविकारग्रस्त असलेले मोतीलाल कोठारी दुर्दैवानं त्याच सुमारास आजारी पडल्यानं अॅटनबरो एकटेच भारतात दिल्लीस गेले. पंडितजींनी माउंटबॅटन यांच्या शब्दाखातर जरी आपल्याला भेटीचं आमंत्रण दिलं असलं तरी प्रत्यक्ष भेटीत ते आपल्यासारख्या अनोळखी व्यक्तीशी कसे काय वागतील; त्यांच्या कामांच्या प्रचंड व्यापातून आपल्या या प्रकल्पात कितपत स्वारस्य दाखवतील, वगैरे शंकांचं एकच काहूर अॅटनबरोंच्या मनात त्यांच्या भेटीस जाताना माजलं होतं. साउथ ब्लॉक येथील पंतप्रधानांच्या कार्यालयात अॅटनबरो मे महिन्यातल्या एका सकाळी ठरलेल्या वेळेच्या पंधरा मिनिटं आधीच जाऊन पोहोचले. पंडितजींचे खाजगी सचिव एस. पी. खन्ना यांनी त्यांचं स्वागत केलं आणि थांबायला सांगितलं, मग ते त्यांना हलकेच म्हणाले, " पंतप्रधानांचा आजचा दिवस भेटी आणि कार्यक्रम यांनी भरगच्च भरलेला आहे. तरीही तुम्हांला भेटीसाठी तीस मिनिटं इतका अवधी दिलेला आहे. तेव्हा कृपया तुम्ही तेवढ्या मुदतीतच भेट आवरण्याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती आहे.” अॅटनबरोंनी लागलीच मान डोलावून त्यांना निश्चित राहण्याचं आश्वासन दिलं आणि भेटीची वेळ होताच... ठीक साडेआठ वाजता पंतप्रधानांच्या दालनात प्रवेश केला. अगा जे नवल वर्तले... नेहरूंनी त्यांचं मनःपूर्वक स्वागत केलं. लॉर्ड माउंटबॅटन यांचं आणि आपलं प्रकल्पाबाबत बोलणं झालं असल्याचं सांगून त्यांनी गांधीजींच्या जीवनावर चित्रपट होण्याच्या