पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दांडीयात्रा... मिठाचा सत्याग्रह. गांधीजी (बेन किंग्जले) झपझप चालले असताना त्यांना आदरपूर्वक प्रणाम कसा करावा, याचं गावकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवताना दिग्दर्शक अॅटनबरो शक्यतेबद्दल आनंद व्यक्त केला. अॅटनबरोंना गांधीजींविषयी कितपत माहिती आहे, असं त्यांनी विचारलं. त्यावर आपण गांधीजींची 'माय एक्स्पेरिमेंट्स विथ टूथ' आणि 'सत्याग्रह इन साउथ आफ्रिका' ही दोन पुस्तकं, डी. जी. तेंडुलकरांच्या 'महात्मा'चे सर्व खंड, तसंच लुई फिशर यांचं पुस्तक वाचल्याचं अॅटनबरोंनी सांगितलं. नेहरूंनी अगदी अल्पावकाशातच साया औपचारिकतेला फाटा देऊन, अॅटनबरोंवरचं दडपण काढून टाकून, त्यांना त्यांच्या प्रकल्पाविषयी मोकळेपणानं बोलण्यास उत्तेजन दिलं. बोलता बोलता त्यांनी 'नाइन अवर्स टु राम' या सत्यापलाप करणाऱ्या चित्रपटाचा विषय काढून त्याविषयी आपली तीव्र नापसंती व्यक्त केली. अॅटनबरोंनीही तो पाहिलेला असल्यानं तेही पंडितजींशी सहमत झाले. तारखांची अचूकता आणि घटनाक्रम यांना पंडितजी विशेष महत्त्व देत नव्हते. गांधीजींच्या जीवनाचं वस्तुनिष्ठ, सत्याधिष्ठित चित्रण त्यांना महत्त्वाचं वाटत होतं; चित्रपटात गांधी- चरित्राचा आत्मा मुळीच हरवता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष होता. संकल्पित चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं काय असतील, असं त्यांनी विचारलं. अॅटनबरोंनी मग गांधी- चरित्रातील कोणकोणत्या ठळक आणि नाट्यपूर्ण घटना आपण घेणार, ते उत्साहानं, रंगवून सांगण्यास सुरुवात केली, तसे पंडितजी आणखीनच खुलत गेले; नकळतच त्या घटनांतले आपलेही स्वानुभवाचे तपशील उत्साहानं सांगू लागले. अॅटनबरोंचं मध्येच घड्याळाकडे लक्ष गेलं आणि त्यांना चांगलाच धक्का बसला. कारण आता नऊ वाजले होते. भेटीची तीस मिनिटांची वेळ संपली होती. ते निघण्यासाठी चुळबुळ करू लागले. नेहरूंच्या ते लक्षात येताच कपाळाला आठ्या घालत त्यांनी विचारलं - "काय झालं ? कुठं जायची घाई झालीए तुम्हांला ?" "नाही सर, " कसनुसा चेहरा करत अॅटनबरो म्हणाले, "पण नऊ वाजले आहेत. " "हो हो,” नेहरू म्हणाले. "पण आपलं काम अजून कुठं आटोपलंय? बसा, खाली बसा!" ते मग खुर्चीतून उठून कपाटाकडे गेले; त्यातून त्यांनी एक लठ्ठ अल्बम बाहेर काढला; तो त्यांनी उघडून खाली कार्पेटवर ठेवला. मग हातागुडघ्यांवर रांगत्या अवस्थेत विसावत त्याची पानं उलटत, एक एक फोटो अॅटनबरोंना दाखवत, ते स्मरणरंजनात जात त्या त्या संदर्भातील आठवणींना उजाळा देऊ लागले. अॅटनबरोही रांगत्या अवस्थेत विसावत आतुरतेनं त्यांचं भाष्य ऐकत फोटो पाहू लागले. (नेहरूंचं त्या वेळचं ते स्मृतिकोशात जपलेलं भाष्य पुढे 'गांधी' ची पटकथा बांधताना त्यांच्या फारच उपयोगास आलं.) • तेवढ्यात दारावर टकटक झाली आणि सचिव खन्ना आत आले. पंतप्रधान त्यांच्या खुर्चीत नसल्याचं पाहून त्यांना धक्का बसला, पण त्याहूनही मोठा धक्का त्यांना बसला, तो कार्पेटवरील निवडक अंतर्नाद •४२३