पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

SAREE इंग्लंडहून परतल्यावर गांधीजी (बेन किंग्जले) भारतीय नेत्यांशी आश्रमात चर्चा करताना. त्यांच्यासोबत प्यारेलाल नायर (पंकज मोहन), महंमद अली जिना (अलेक पदमसी), पटेल (सईद जाफ्री), आझाद (वीरेंद्र राझदान), कृपलानी (अनंग देसाई), नेहरू (रोशन सेठ) सारखी आडवी येणारी गोष्ट एकच, आणि ती म्हणजे चित्रपट- दिग्दर्शनाची आपली कोरी पाटी. त्यामुळे प्रकल्पात पैसे गुंतवण्यास फारसे कुणी उत्सुक नव्हते. आता, बॉक्स ऑफिसवर नाव असलेले नट या चित्रपटात असते तर गोष्ट वेगळी होऊ शकली असती. पण तिथंही पुन्हा तीच कोऱ्या पाटीचीच मेख! एका अननुभवी दिग्दर्शकाबरोबर एक अत्यंत गुंतागुंतीची आणि परिश्रम घ्यावयास लावणारी प्रमुख भूमिका करण्याचं नामवंत नट यळत होते. पटकथा : जमेचि ना, घडेचि ना! १९६५ मध्ये 'गांधी' प्रकल्पाकरिता पात्र योजना ही तशी दुय्यमच गोष्ट होती. आद्य महत्त्वाचं होतं ते, पटकथालेखनासाठी पुरेसे पैसे उभे करणं, कारण ती तयार झाल्याशिवाय काहीच करता येणं शक्य नव्हतं. आणि या पटकथेसाठी परिश्रमांना पार नव्हता, नायक महान होता. कालपट फारच व्यापक होता. पात्रांची संख्या मोठी होती. काय घ्यायचं, काय टाळायचं, याचा निर्णय घेणं कसोटी पाहणारं होतं. एका ऐतिहासिक महामानवाच्या जीवनातील घटनाप्रधान अशी ७९ वर्षं पडद्यावरील तीनच काय पण चार तासांच्या अवधीत सामावणं हे शिवधनुष्य पेलण्याहूनही खडतर होतं. एव्हाना अॅटनबरोंनी आपलं घरदार गहाण टाकून कर्ज काढलं ४२६ निवडक अंतर्नाद होतं. ते पैसे, तसंच तोवर गोळा केलेलं भांडवल, या प्रकल्पात गुंतलं होतं. मोतीलाल कोठारी यांनी भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि प्रकल्पासाठी स्वत:ला पूर्णवेळ वाहून घेतलं. हाती घेतलेलं काम चालू ठेवण्यासाठी तसंच आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी अॅटनबरोंना पैसे मिळवण्याची निकड होती. त्याकरिता त्यांनी १९६५-६६च्या दरम्यान तीन अमेरिकन चित्रपटांत भूमिका केल्या. पटकथेचं काम ज्याच्यावर सोपवलं होतं, तो जेराल्ड हॅन्ली यानं काही पटकथा लिहिल्या होत्या. महत्त्वाचं म्हणजे भारताविषयीचं त्याचं ज्ञान उत्तम होतं. तो अभ्यासू आणि कष्टाळू होता. अॅटनबरोंशी त्याच्या वारंवार चर्चा होत होत्या. गांधीजींविषयीच्या मिळतील त्या संदर्भग्रंथांची त्यानं पारायणं केली होती; परिश्रमपूर्वक टिपणं काढली होती. अखेर त्याची पटकथा तयार झाली. पण तिच्यावर चित्रपट काढायचा तर तो तब्बल पाच तासांचा झाला असता, पाच तासांचा ऐवज तीन तासांत कसा काय बसवायचा? कापून कापून ती कितीशी आटोपशीर करता येणार होती ? हॅन्लीनं पटकथेचा दुसरा खर्डा लिहिण्याचं मान्य केलं पण त्यासाठी चार महिन्यांची मुदत मागितली. पुन्हा त्यासाठी आणखी पैशांची तरतूद करणं भाग पडलं. तेवढ्यात अॅटनबरोंकडे एक चित्रपट चालून आला, म्हणून बरं,