पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'गांधी' च्या सेटवर रोहिणी हट्टंगडी ( कस्तुरबा ) यांना साहाय्य करताना दिग्दर्शक अॅटनबरो पटकथा दिल्लीला पाठवण्यात आली. यथावकाश माहिती आणि प्रसारण मंत्रालयातून पत्र आलं. सोबत गांधी- चरित्रकार तेंडुलकर यांची पटकथेवरील अभिप्रायाची सविस्तर टिपणंही होती. त्यांनी वस्तुस्थितीच्या संदर्भातल्या बऱ्याच चुका निदर्शनास आणल्या होत्या. त्या अर्थातच सुधारता येण्यासारख्याच होत्या. १९६४च्या एप्रिल अखेरीस हॅन्लीचं दुसरं स्क्रिप्ट तयार झालं. पण तेसुद्धा बरंच मोठं झालं होतं, हॅन्लीनं खूप अभ्यास केला होता; खूप परिश्रम घेतले होते, हे कितीही खरं असलं तरी त्याचं दुसरंही स्क्रिप्ट जमलं नव्हतं, ही वस्तुस्थिती होती. त्यानंतर हॅन्लीच्या मदतीला दुसरा एखादा अधिक अनुभवी पटकथाकार देण्याचे प्रयत्न झाले. पण ते काही जमले नाहीत. स्वतंत्रपणे पटकथा लिहिण्याचे काहींकडून प्रयत्न झाले. तेही फसले. हेचि फल काय... अखेर, चित्रेतिहासातील एक मानदंड ठरलेल्या 'लॉरेन्स ऑफ अरेबिया' या चित्रपटाचा पटकथाकार, ख्यातनाम नाटककार रॉबर्ट बोल्ट हा 'गांधी' चित्रपटाची नवी पटकथा लिहिण्यास तयार झाला. (अगदी सुरुवातीलाच त्याला विचारलं असता मात्र त्यानं नकार दिला होता.) पण त्याची एक अट होती. 'लॉरेन्स' साठी ज्याच्याबरोबर त्यानं काम केलं होतं ते ख्यातकीर्त दिग्दर्शक डेव्हिड लीन हाच त्याला 'गांधी' याही चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून हवा होता. मोतीलाल कोठारींचा हृदयविकार त्यांना अधिकाधिक त्रासदायक होत चालला होता. 'गांधी' चित्रपट पाहायला आपण जिवंत तरी राहू काय, अशी शंका त्यांना अलीकडे सारखी भेडसावू लागली होती. बोल्ट आणि लीन ही ख्यातनाम युती 'गांधी' चित्रपटासाठी प्रसिद्धी आणि बॉक्स ऑफिस या दृष्टीनं • चांगलीच लाभदायक ठरेल; आपल्या सर्वच समस्या सुटतील, असं अगदी निकराला आलेल्या कोठारींना तीव्रतेनं वाटू लागलं. त्यांनी अॅटनबरोंना पत्र लिहिलं. त्यात त्यांनी सर्व हकिगत कळवून आपला मनोदय व्यक्त केला आणि 'गांधी' चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा जो काही हक्क असेल तो सोडून देण्याची अॅटनबरोंना विनंती केली. इतकंच नव्हे तर त्या बदल्यात जणू सांत्वनार्थ त्यांना गांधीजींची भूमिका देण्याचीही तयारी दर्शविली. पत्र वाचून अॅटनबरो एकदम सुत्र होऊन गेले. कोठारींची दुसरी सूचना शारीरिक स्वरूपाचा विचार करता त्यांनी लागलीच निकालात काढली, पण मुख्य विनंतीला मात्र त्यांनी काळजावर दगड ठेवून मान दिला. इतकी वर्ष जो प्रकल्प साकारण्यासाठी तहानभूक हरपून आपण तनमनधनानिशी झटत होतो, तो सोडून देताना त्यांच्या जिवाला काय यातना झाल्या असतील, याची कल्पनाच केलेली बरी! पण बोल्ट हा ख्यातकीर्त यशस्वी नाटककार, पटकथाकार होता. आणि 'गांधी' करिता डेव्हिड लीनसारखा दुसरा दिग्दर्शकच असू शकत नाही, हे अॅटनबरोंनाही मनोमन पटत होतं, प्रकल्पात भावनात्मक दृष्ट्या ते कितीही गुंतलेले असले, तरी या नव्या पुनर्रचनेत त्यांना आपोआपच गौणत्व आलं, परंतु इथं दिग्दर्शकाच्या खुर्चीतून उठून बाजूस होणं भाग पडलं असलं, तरी अनपेक्षितपणे दिग्दर्शनाची दुसरी एक संधी त्यांच्याकडे स्वत:हून चालत आली. 'ओह! वॉट अ लव्हली वॉर' हा तो चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच प्रेक्षक आणि समीक्षकांनी त्यांच्यावर प्रशंसेची उधळण केली. प्रतिष्ठेच्या 'गोल्डन ग्लोब' सह एकूण १६ अॅवॉर्ड्स या चित्रपटानं पटकावली. दोनच वर्षांत त्यांना आणखी एक चित्रपट दिग्दर्शनासाठी मिळाला. या चित्रपटाचं नाव 'यंग विन्स्टन', माजी ब्रिटिश पंतप्रधान, गांधीजींचे कट्टर विरोधक चर्चिल यांच्या संस्कारक्षम वयातील जीवनावर तो आधारित होता. या चित्रपटानंही अॅटनबरोंना 'गोल्डन ग्लोब' मिळवून दिलं. इकडे 'गांधी' च्या कामास आरंभ करण्यापूर्वी आपण एक 'लहानशी' फिल्म झटकन उरकून घेतो, असं बोल्ट आणि लीन यांनी कोठारींना सांगितलं. त्या फिल्मचं नाव 'रायन्स डॉटर', ती पुरी होईपर्यंत वाट पाहण्याखेरीज कोठारींच्या ह्यतात दुसरं काहीच नव्हतं. फिल्म पूर्ण होण्यास तीन वर्षं लागली. आणि रॉबर्ट बोल्टनं स्क्रिप्टची पहिली ओळ लिहिण्याच्या आतच, १७ जानेवारी १९७१ रोजी मोतीलाल कोठारी यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला, निवडक अंतर्नाद ४२७