पान:निवडक अंतर्नाद.pdf/४२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सेटवर जनरल डायरच्या भूमिकेतील एडवर्ड फॉक्स वाला चित्रीकरणापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना देताना दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो पुनश्च 'गांधी' ओम! अॅटनबरो 'गांधी' प्रकल्पातून जरी बाजूस झाले असले आणि त्यांच्यामागे इतर व्याप असले त्यांच्या मनातून मात्र 'गांधी' हा विषय जात नव्हता. कोठारींच्या निधनानंतर आणि 'यंग विन्स्टन' प्रदर्शित झाल्यावर ते आणि रॉबर्ट बोल्ट यांची एक भेट झाली. त्या वेळच्या बोलण्यातून असं समजलं, की इतः पर लीन याला 'गांधी' चित्रपटाच्या दिग्दर्शनात काहीच स्वारस्य उरलं नव्हतं, पण बोल्ट मात्र हा चित्रपट होण्याची शक्यता असेल तर अजूनही पटकथा लिहिण्यास तयार होता. मग त्याचं दिग्दर्शन अॅटनबरो यांनी केलं तरी आता त्याची हरकत नव्हती. अॅटनबरोंच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. बोल्टबरोबर त्यांच्या भेटी, चर्चा सुरू झाल्या. आत्तापर्यंत त्यांच्यापाशी २००हून अधिक संदर्भग्रंथ जमा झाले होते. ते त्यांनी बोल्टला दिले. 'गांधी'ला आठ ऑस्कर्स (१९८२) १. सर्वोत्कृष्ट चित्रपट

'गांधी' (इण्डो- ब्रिटिश

फिल्म्स, कोलंबिया, निर्माता : रिचर्ड अॅटनबरो ). बेन किंग्जले (भूमिका: गांधी). २. सर्वोत्कृष्ट अभिनेता ३. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ४. सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा: ५. सर्वोत्कृष्ट छायांकन ६. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन सजावट ७. सर्वोत्कृष्ट संकलन ८. सर्वोत्कृष्ट वेशभूषा ४२८ निवडक अंतर्नाद

रिचर्ड अॅटनबरो.

जॉन ब्रायली,

बिली विल्यम्स आणि

रॉनी टेलर, स्टुअर्ट क्रेग आणि बॉब लेंग; मायकेल सीर्टन,

जॉन ब्लूम.
जॉन मोलो आणि

भानू अथय्या, त्यांनी आता नव्या हुरुपानं कंबर कसली; महत्वाच्या संबंधित व्यक्तींच्या भेटीगाठी ते घेऊ लागले; भांडवलाच्या उभारणीसाठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज निर्माते, प्रमुख चित्रपट वितरक, भारतीय संस्थानिक इत्यादींचे उंबरठे झिजवू लागले. कधी त्यांची उमेद वाढत होती, तर कधी ते निराशेच्या खोल गर्तेत कोसळत होते. पण हार मानायला मात्र ते मुळीच तयार नव्हते, त्यातच ते अनेक प्रतिष्ठित भारतीयांच्या विरोधालाही तोंड देत होते. एक इंग्रज रुपेरी पडद्यावर राष्ट्रपित्याच्या जीवनचरित्राला कसा काय न्याय देऊ शकेल, असा या विरोधकांचा सवाल होता. अशा एकूण आशानिराशेच्या खेळात वर्षं उलटत असतानाच आणखी एक वाईट बातमी येऊन थडकली. रॉबर्ट बोल्ट भयंकर • आजारी पडला आणि आणखी काही काळ तरी आपण स्क्रिप्ट लिहिण्यास असमर्थ असल्याचं त्यानं कळवलं. या समस्येवर आता काय तोडगा काढावा, अशा विचारात अॅटनबरो पडले असताना अचानक त्यांना बऱ्याच वर्षांपूर्वीच्या एका गोष्टीची आठवण झाली. त्या वेळी त्यांना एक चित्रपट दिग्दर्शित करण्याची अनावर इच्छा झाली होती. आणि याचं कारण, त्यांनी वाचलेलं त्या चित्रपटाचं अत्युत्कृष्ट स्क्रिप्ट! अर्थात त्या वेळी तो योग हुकला. ते स्क्रिप्ट लिहिलं होतं, जॉन ब्रायली नामक एका अमेरिकन लेखकानं. अॅटनबरोंनी ब्रायलीशी संपर्क साधला निर्णय घेण्यापूर्वी या विराट कामाविषयी साधकबाधक विचार करण्यासाठी त्यानं पंधरवड्याच्या अवधी घेतला. मग इतक्या वर्षांत अनेकांचे ह्यत लागून बदलत बदलत गेलेल्या स्क्रिप्टच्या ढाच्याच्या मूळ चौकटीत राहून नवीन स्वतंत्र स्क्रिप्ट लिहायचं त्यानं मान्य केलं. एका गोष्टीबाबत मात्र तो आणि अॅटनबरो या दोघांचंही एकमत झालं. एक म्हणजे, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं हे काही आपल्याला दाखवायचं नाही, तसंच चित्रपटाला कोणत्याही प्रकारे एखाद्या रुक्ष राजकीय प्रबंधाचं स्वरूपही येऊ द्यायचं नाही; आपल्याला सांगायची आहे, ती खरोखरच असाधारण, अलौकिक अशा माणसाची कहाणी... त्याचे दोष, त्याच्या उणिवा, त्याचा विकास आणि त्याची महानता... सारं सारं! चित्रपयचं नावसुद्धा कोणत्याही विशेषण- उपपदाशिवाय नुसतं 'गांधी' एवढंच ठेवायचं. अखेर काम मार्गी लागलं दरम्यान भारतात इंदिरा गांधी पराभूत होऊन मोरारजी देसाई पंतप्रधानपदी आले होते. त्यामुळे आधीच्या सरकारनं 'गांधी' प्रकल्पाबाबत जी आश्वासनं दिली होती, ती नव्या सरकारलाही मान्य आहेत का, याची एकवार खातरजमा करून घ्यायचं ठरलं. अॅटनबरो राणी दुबे यांच्यासह ऑगस्ट १९७८ मध्ये भारतात आले. दुबे या इंग्लंडस्थित भारतीय होत्या. त्या सुरुवातीपासूनच या प्रकल्पाबाबत अॅटनबरोंच्या संपर्कात होत्या, त्यांना जमेल तितकी मदत करत होत्या. पुढे त्या 'गांधी' चित्रपटाच्या सहनिर्मात्या झाल्या, नवी दिल्लीत बऱ्याच वजनदार लोकांशी त्यांच्या ओळखी होत्या. नव्या पंतप्रधानांनीही आधीच्या आश्वासनांवर शिक्कामोर्तब केलं. तेवढ्यात साऱ्या जगाला हादरवून टाकणारी एक बातमी