पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अजि म्या ब्रह्म पाहिले! मधु मंगेश कर्णिक हे महापूजेचे निमंत्रण सर्वस्वी अनपेक्षित होते. श्री विठ्ठलाची महापूजा ही दरवर्षी फक्त मुख्यमंत्री करतात, एवढे माहीत होते. दूरदर्शनवर तिची दृश्ये पाहिली होती. पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा आपण करणार? विश्वासच बसेना. देव, धर्म आणि यांवरील श्रद्धा यांमुळे माणसाच्या जगण्याला मोठा आधार मिळतो, असे मानणारा मोठा वर्ग समाजामध्ये असतो आणि तो जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळतो. व्यक्तिशः मी या वर्गामध्ये मोडतो का, याचा मी अनेकदा विचार करतो. कारण या बाबतीत माझी नेहमी द्विधा मनःस्थिती असते. माझ्या घरी बालपणापासून मी श्रद्धाळू वातावरणात वाढलो. माझे वडील कितपत धार्मिक वृत्तीचे होते, ते मला माहीत नाही, कारण ते मी अगदी असतानाच हे जग सोडून गेले. पण ते श्रावणात गावकऱ्यांना जमवून त्यांना पोथी वाचून दाखवत, हे मला अंधूक आठवते. माझे आजोबा विवेकानंदांच्या शिकवणीच्या प्रभावाने, त्यांचा शोध घेत परागंदा झाले. आई पूर्णपणे आस्तिक आणि श्रद्धाळू. तिच्या भाविकपणाला तोड नसे. तिचे उपासतापास, व्रतवैकल्ये कधी चुकली नाहीत. एकादशी, संकष्टी, सोमवार, शनिवार हे उपवास ती न चुकता करी. इतके असूनही तिच्या नशिबाची दुःखे आणि अपेष्टा नाहीशी झाली नव्हती. स्वतः मी अजाण वयात जगाचे टक्केटोणपे खात वाढलो. जग स्वार्थी मतलबी असते, निष्ठुर असते, याचा मी आईवडिलांचे छत्र हरपल्यापासून कोवळ्या वयात अनुभव घेतला आणि तो अनुभव दिवसेंदिवस गडदच होत गेला, नंतरच्या जाणत्या आयुष्यातही जगाचा कोरडेपणा, खोटेपणा आणि अधर्म खूप पाहिला. त्यामुळे देव माणसांना सद्बुद्धी देतो, हे फारसे पटले नाही. धर्म ही पारंपरिक संकल्पना मानली तर 'माझा धर्म हिंदू आहे, एवढे सांगण्यापुरताच तो धर्म उरला, पण यापलीकडे 'कर्तव्य' म्हणून एक धर्म आहे, 'माणुसकी' म्हणून एक धर्म आहे आणि 'सदाचरण' हाही एक धर्म आहे, हे मनात स्वानुभवाने पक्के बिंबत राहिले. प्रार्थनेचे म्हणून एक अंगभूत पावित्र्य व सामर्थ्य असते, प्रार्थनेमुळे मनाला शांती मिळते, हे मनाला पटलेले आहे. पण त्याला जोडून कर्मकांड नको, याबद्दल मनात संदेह नाही. तरीही हिंदू धर्माची भगवी पताका खांद्यावर घेऊन माणसे वेड्याबापड्यासारखी, उपाशीतापाशी वणवण फिरताना पाहिली, स्वामी विवेकानंदांचे विचार वाचले, विनोबांची गीताप्रवचने ४२ • निवडक अंतर्नाद वाचली, माझ्या आजोबांनी लिहिलेले 'हिंदुधर्म' हे चिमुकले पुस्तक वाचले, की आपण हिंदू आहोत, याबद्दल अभिमान, आनंद आणि समाधान वाटते, कोणतेही देऊळ समोर दिसले की आपोआप त जुळत नसले, तरी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, आळंदीची श्री माउलींची समाधी, नेवाशाचा पैस, देहूचे तुकाराममंदिर, रामदासांची शिवथर घळ, रायगडावरील श्री शिवछत्रपतींचे सिंहासन आणि समाधी, रत्नागिरीचे सावरकरांचे आणि लोकमान्यांचे स्मारक, मालगुंडचे केशवसुत स्मारक ही सारी मंदिरे वाटतात आणि नकळत त जोडले जातात, मस्तक नम्र होते आणि अंत:करणात एका अनामिक आनंदाचा झरा उचंबळून येतो. ही श्रद्धा काही जन्मजात नव्हे, ती अंधश्रद्धाही नव्हे. जेव्हा श्रद्धेची- अंधश्रद्धेची काहुरे मनात निपजतात, तेव्हा सजग मन एकच पाहते. या ठिकाणी कर्तव्य, माणुसकी आणि सदाचरण या धर्मांचे पालन होते आहे का? जर हे धर्मपालन तेथे श्रद्धापूर्वक, मन:पूर्वक होत असेल तर तेथे श्रद्धा- अश्रद्धा-अंधश्रद्धा यांचा पट फिटतो. काहूर नाहीसे होते आणि मनात एक नितळ चांदणे पसरू लागते. या श्रद्धा - अंधश्रद्धेतून लाभणाऱ्या चिदानंदाचे एक अलीकडेच प्रत्ययाला आलेले उदाहरण येथे नमूद करतो. गेल्या जुलै महिन्यामध्ये एका सकाळीच करूळच्या माझ्या घरी अनपेक्षितपणे एक फोन आला. फोन पंढरपूरहून आलेला होता व तो राजश्री दत्तोपंत बाळासाहेब बडवे, शिंदे सरकार या नावे आला होता. भरदार आवाजात दत्तोपंत मला सांगत होते, “आपल्या उभयतांच्या हातून श्री विठ्ठलाची महापूजा करविण्याचा निर्णय समस्त बडवे समाजाने घेतलेला आहे! आपण श्रावण शुद्ध सप्तमी रोजी दिनांक एक ऑगस्टला पंढरपुरी ही श्री विठ्ठल पूजा यथासांग करावी अशी आम्हां सर्वांची विनंती आहे.' हे महापूजेचे निमंत्रण सर्वस्वी अनपेक्षित होते. श्री विठ्ठलाची महापूजा ही दरवर्षी फक्त मुख्यमंत्री करतात, एवढे माहीत होते. दूरदर्शनवर तिची दृश्ये पाहिली होती. पंढरीच्या पांडुरंगाची महापूजा आपण करणार? विश्वासच बसेना. त्याआधी एकदा की दोनदा पंढरपुरी जाण्याचा नि विठ्ठलाचे