पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यांची प्रॅक्टिस होती. बेनचं मूळ नाव कृष्ण भानजी, पुढे ब्रिटिश रंगभूमीवर काम करू लागताच त्यानं ते बदललं होतं. अॅटनबरोंनी रंगभूमीवरील त्याच्या काही भूमिका पाहिल्या होत्या. परंतु त्याची जोरदार शिफारस केली होती, ती त्यांचा मुलगा मायकेल यानं. इंग्लंडमध्ये तेव्हा रंगभूमीवर कार्यरत असलेल्या नटांमध्ये तो त्याला अग्रगण्य वाटत होता. परंतु बेनच्या गुणवत्तेखेरीज आणखीही एक गोष्ट अॅटनबरोंना उपकारक वाटली, बेनचे वडील भारतीय असल्यानं गांधीजी म्हणून पडद्यावर तो अधिक स्वीकारार्ह वाटू शकत होता. त्यामुळे त्याची स्क्रीनटेस्ट घेण्याचं त्यांनी मनाशी पक्कं केलं. आणि ती टेस्ट पाहून सारेच आश्चर्यानं (तसेच आनंदानं ) अवाक होऊन गेले. पडद्यावर आपल्याला एखाद्या अनुबोधपयतील खऱ्याखुऱ्या गांधीजींचंच दर्शन घडतंय असाच साऱ्यांना भास झाला. कल्पनेपलीकडे विश्वासार्ह गांधीजींच्याप्रमाणेच बेनच्याही डोळ्यांत तेच दुसऱ्याला खिळवून टाकणारे संमोहक भाव होते. तो धोतरही असं नेसला होता, की तो त्याचा जणू रोजचाच पेहराव असावा, असं वाटत होतं. गांधीजींची भूमिका प्रत्ययकारी वठविण्यास या पृथ्वीतलावर केवळ बेन हाच एकमात्र कलावंत, यावर साऱ्यांचंच एकमत झालं आणि एक मोठाच यक्षप्रश्न सुटला. आणि कस्तुरबाही ! गांधीजींप्रमाणेच त्यांच्या पत्नी कस्तुरबा हीही चित्रपटातली महत्त्वपूर्ण भूमिका पात्र योजनाकार डॉली ठाकोर हिनं अॅटनबरोंना अनेक हिंदी चित्रपट दाखवले; हिंदी, मराठी, गुजराती नाटकं दाखवली; त्यांतल्या अनेक नट्यांशी प्रत्यक्षात भेटीही घडवून आणल्या. त्यांतल्या स्मिता पाटीलनं ते चांगलेच प्रभावित झाले. तिच्या ठायी उत्तम बुद्धिमत्ता आणि प्रतिभा असल्याचं त्यांना प्रथमदर्शनीच जाणवलं, परंतु त्यांना ती सुंदर म्हणजे फारच सुंदर वाटली. त्यांनी भक्ती बर्वेचं एक नाटक पाहिलं आणि स्क्रीन- टेस्टसाठी लंडनला येण्याची तिची तयारी आहे काय, असं तिला विचारलं. परंतु तरीही अजून आपल्याला यथायोग्य 'कस्तुरबा' सापडली आहे, असं काही त्यांच्या मनाला आतून वाटत नव्हतं. ... पुढच्या तयारीसाठी लंडनला परतण्याच्या बेतात ते असताना एका दुपारी डॉलीचा त्यांना फोन आला. आपलं लंडन- प्रयाण एकदोन दिवसांनी पुढं ढकलता येणं त्यांना शक्य आहे काय, असं ती विचारत होती. कारण कस्तुरबांच्या भूमिकेसाठी तिला आणखी काही कलावती गवसल्या होत्या. अॅटनबरो या संदर्भातल्या आपल्या आठवणीला उजाळा ●देताना आत्मवृत्तात लिहितात - "त्यांतल्या पाचजणींना ती (डॉली) मुंबई विमानतळाजवळील हॉटेलमधल्या माझ्या खोलीत घेऊन आली, तो प्रसंग मला आठवतो. त्यांतल्या एका मुलीचं नाव होतं, रोहिणी हट्टंगडी, ती दारातून आत आली, तत्क्षणी आपल्या काळजाचा एक ठोका चुकल्यासारखं मला वाटलं. कस्तुरबांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या उभारणीसाठी माझ्या दृष्टीनं अत्यावश्यक, पायाभूत असलेले ४३० निवडक अंतर्नाद गुणधर्म तिच्या ठायी असल्याचं मला लागलीच जाणवून गेलं.” त्याच रात्री त्यांनी तिचं एक नाटक ('रथचक्र) पाहिलं. त्यातला तिचा परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांचा डबल रोल पाहून ते थक्कच झाले. एकीकडे, पुरुषाला मोहवश करणारी एक नखरेल तरुणी तर दुसरीकडे, पार दुसऱ्या टोकाची ऐंशी वर्षांची वडीलधारी वृद्धा, अॅटनबरो कमालीचे प्रभावित होऊन गेले. रोहिणीविषयी त्यांच्या मनात फक्त दोनच शंका होत्या. ती कितपत सफाईदार इंग्रजी बोलू शकेल? आणि दुसरं म्हणजे ती रंगमंचावर वाटली तशीच पडद्यावरही प्रभावी वाटेल काय ? भक्ती, स्मिता आणि रोहिणी यांच्यासह अॅटनबरो लंडनला परतले. तिघींनीही आपल्या संवादांवर कसून मेहनत घेतली. तीन दिवस खर्चून जॉन हर्ट आणि बेन किंग्जले यांच्याबरोबर त्यांच्या स्क्रीन टेस्ट्स झाल्या. त्यांतून खरी निवड स्मिता आणि रोहिणी यांच्यातूनच होणार, हे स्पष्ट झालं. अॅटनबरोंच्या मते स्मिताची टेस्ट अव्वल व्यावसायिक दर्जाची होती; अभिनय हेलावून टाकणारा होता. रोहिणीची टेस्टडी तितक्याच तोडीची होती. पण तिची खासियत म्हणजे, कस्तुरबा या व्यक्तिरेखेशी ती एक प्रकारे आंतरिक जिव्हाळ्यानं समरस झाली होती. शिवाय कुशल रंगभूषेनं ती विशीपासून सत्तरीपर्यंतच्या वयोमानात सहज स्वाभाविकपणे वावरू शकेल, असाही अॅटनबरोंना विश्वास वाटला. त्यामुळे अखेर तिचीच निवड करण्यात आली. पूर्वतयारी दरम्यान रोहिणी आणि बेन यांच्या रंगभूषा, केशभूषा या संदर्भात कसून चाचण्या घेऊन अगदी बारीकसारीक तपशील निश्चित करण्यात आले. अॅटनबरोंचे 'सिक्स्थ सेन्स' 'गांधी' मध्ये बॅ. महंमद अली जिना झाले होते, अॅलेक पदमसी, मुंबईच्या इंग्रजी रंगभूमीवरील पन्नासहून अधिक नाटकांचे निर्माते आणि दिग्दर्शक, उत्तम जाहिरातपटू तसेच 'लिंटास' या भारतातील बड्या जाहिरात कंपनीचे एकेकाळचे सर्वेसर्वा आपल्या 'अ डबल लाइफ' या आत्मचरित्रात एक संपूर्ण प्रकरण त्यांनी हा चित्रपट आणि आपले अनुभव यांवर लिहिलं आहे अॅटनबरो यांच्या सन्मानार्थ मुंबईत आयोजिलेल्या एका पार्टीत ते आणि पदमसी यांची पहिली भेट झाली. पदमसी त्यांना आधीपासूनच ओळखत होते. अॅटनबरोंविषयी त्यांना आदरही होता. अॅटनबरोही मूळचे नाटकवालेच. त्यामुळे साहजिकच त्या भेटीत दोघांच्याही त्याच विषयावर थोड्याफार गप्पा झाल्या. दुसऱ्याच दिवशी सकाळी अॅटनबरोंनी पदमसींना फोन करून त्यांना आपल्या 'गांधी' चित्रपटात 'जिनांची भूमिका कराल काय, ' असं विचारलं. या निवडीसाठी त्यांना पदमसींच्या स्क्रीन टेस्टचीही आवश्यकता वाटत नव्हती. त्यांच्या चित्रपटविषयक अननुभवाचीही अॅटबरोंना अडचण वाटत नव्हती. उलट रंगभूमीचा अनुभवच त्यांना अधिक मोलाचा वाटे 'गांधी' चित्रपयसाठी त्यांनी महत्त्वाच्या भूमिकांसाठी निवडलेले बेन किंग्जले (गांधी),