पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोहिणी हट्टंगडी ( कस्तुरबा ), रोशन सेठ (नेहरू), सईद जाफ्री (सरदार पटेल), आयन चार्लसन (चार्ली अॅण्ड्रयज), डॉ. श्रीराम लागू (गोपाल कृष्ण गोखले) वगैरे बरेच कलावंत मूळचे रंगभूमीवरचेच. आपला नाट्य-कलावंतांवरच अधिक विश्वास असल्याचंही अॅटनबरोंनी सांगितलं. आधीचा काहीच परिचय नसताना केवळ पार्टीतल्या एकाच भेटीवर आपण जिनांसारख्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी योग्य आहोत, हे त्यांना कसं काय कळलं, याचं पदमसींना नेहमीच नवल वाटे. अखेर एकदा त्यांनी अॅटनबरोंनाच त्याविषयी विचारलं. त्यावर ते म्हणाले, की आपल्याकडे एक 'सिक्स्थ सेन्स' ('सहावी जाण' ) आहे. हवा तसा माणूस दिसला, की ती टक्कन जागी होते! त्यांच्या म्हणण्यात चांगलंच तथ्य होतं. रोहिणी हट्टंगडी आणि जेराल्डिन जेम्स (मीराबेन) यांच्या बाबतीतही तसंच झालं होतं. त्यांना पाहताच अॅटनबरोंच्या या सहाव्या जाणेनंच कौल देऊन त्यांच्या निवडीवर तात्काळ शिक्कामोर्तब करून टाकलं होतं. बेन किंग्जलेची पूर्वतयारी 'गांधी' या भूमिकेच्या पूर्वतयारीसाठी बेन किंग्जलेला देण्यात आलेली गांधीजींविषयीची सर्व पुस्तकं त्यानी अगदी बारकाईनं पुनः पुन्हा वाचून त्यांचा नीट अभ्यास केला होता. गांधीजींचं ज्या ज्या स्थळी महत्त्वपूर्ण वास्तव्य होतं, त्यांना त्यानं आवर्जून भेट दिली होती. बेनची उंची साधारणत: गांधीजींशी मिळतीजुळती असली तरी त्याची देहयष्टी मात्र किरकोळ नव्हती, हे मान्यच करायला हवं. परंतु आहारतज्ज्ञांनी सुचवलेल्या मर्यादित आणि शाकाहारी अन्नावरच राहून त्यानं चित्रीकरणास आरंभ होईपर्यंत निर्धारपूर्वक आपलं वजन सुमारे सतरा पौंडांनी घटवलं. गांधीजींच्या सहज शारीरिक हालचाली तंतोतंत साध्य व्हाव्यात म्हणून बेन नित्यनेमानं रोज सायंकाळी नव्वद मिनिटं योगसाधना करी. एका खास शिक्षकाच्या मदतीनं तो दोन तहांच्या चरख्यांवर सूत कातायला शिकला. अल्पावधीतच त्यानं त्यात प्रावीण्यही मिळवलं. हॉटेलमधील त्याची खोली म्हणजे जणू एक पवित्र स्मृतिस्थळच होऊन गेलं होतं. एका संपूर्ण भिंतीवर हालचालींतल्या ( इन ॲक्शन) गांधीजींची मोठमोठाली छायाचित्रं (ब्लो अप्स) लावलेली होती. दुसऱ्या भिंतीवर त्यांच्या विविध भावमुद्रांचं दर्शन घडवणारी तशीच मोठाली छायाचित्रं होती, खोलीतल्या खुर्च्या काढून टाकण्यात आल्या होत्या. त्यांच्याऐवजी जमिनीवर पेंढा भरलेल्या गाद्या आणि लोड-तक्के ठेवण्यात आले होते. बेन एका खाटेवर झोपत असे. चित्रीकरणपूर्व तयारीची लगीनघाई चित्रपटात एकूण १८९ दृश्यं होती. त्यासाठी ८७ दृश्यांसाठी सेट्सची आवश्यकता होती. त्यातले १९ मोठ्या प्रमाणात उभारावे लागणारे होते. आणि सर्वांत मोठा होता तो आश्रमाचा. 'गांधी' चित्रपटातील भारतीय कलाकार मराठी : रोहिणी हट्टंगडी (कस्तुरबा ), श्रीराम लागू (प्रो. गोखले), प्रभाकर पाटणकर (प्रकाश), मोहन आगाशे ( तय्यब महम्मदांचा मित्र), सुनीला प्रधान (मोतीलाल नेहरूंची पत्नी), मनोहर पितळे (शुक्ल), नाना पळशीकर (खेडूत), सुधीर दळवी (पोलीस कमिशनर), विनय आपटे आणि सुझस पळशीकर (कलकत्ता स्ट्रीटवरील तरुण). महत्त्वाच्या भूमिकांतले अन्य : सईद जाफ्री (सरदार पटेल), अॅलेक पदमसी (महम्मद अली जिना), अमरीश पुरी (खान), रोशन सेठ (पं. नेहरू), ओम पुरी (नरहरी), वीरेंद्र रझदान ( मौलाना आझाद), हर्ष नायर (नथूराम गोडसे), विजय कश्यप (आपटे), निगम प्रकाश (करकरे), सुप्रिया पाठक (मनू), नीना गुप्ता (आभा), अनंग देसाई (कृपलानी), आलोकनाथ (तय्यब महम्मद), जलाल आगा आणि मोती • मलकान (ट्रेनच्या छपरावरील प्रवासी), हबीब तन्वीर (भारतीय बॅरिस्टर), पंकज मोहन ( महादेवभाई देसाई), पंकज कपूर (प्यारेलाल), सरोजिनी नायडू (तरला मेहता), दिलीप ताहील (झिया), दिलशेर सिंग (अब्दुल गफार खान), इपिंदर पुरी (सुशीला नायर), सुदर्शन सेठी (मोतीलाल नेहरू), राज चतुर्वेदी ( हरीलाल गांधी), अवपार झिा (मणिलाल गांधी). 'गांधी' चे भारतीय तंत्रज्ञ : रवि शंकर (संगीत); राणी दुबे (सह-निर्माती); गोविंद निहलानी (सेकंड युनिट डायरेक्टर/कॅमेरामन); सुरेश जिंदाल (असोशिएट प्रोड्युसर); कमल स्वरूप (साहाय्यक दिग्दर्शक); भानू अथय्या ( वेशभूषाकार); सिना कौल ( भारतीय कपडेपट सल्लागार); राम येडेकर (कला दिग्दर्शक); निस्सार अल्लाना, अमल अल्लाना आणि अरुणा हरप्रसाद (सेट ड्रेसर्स); ए. के. बीर (सेकंड कॅमेरा ऑपरेटर); शमा हबिबुल्ला (प्रॉडक्शन मॅनेजर); देवी दत्त (युनिट मॅनेजर); डॉली ठाकोर (प्रसिद्धी / भारतीय पात्रयोजना ). भारतात उभारण्यात आलेला सर्वांत महत्त्वाचा सेट म्हणजे हा साबरमती आश्रम, 'अशोक' हॉटेलपासून साधारणतः चाळीस मिनिटांच्या वाहन- अंतरावर असलेल्या यमुना नदीच्या तीरावर अनेक एकर जागेवर तो होता. गांधीजींनी करून ठेवलेल्या वर्णनानुसार तो हुबेहूब दिसावा, यासाठी प्रॉडक्शन डिझायनर स्टुअर्ट क्रेग यानं परिश्रमांची पराकाष्ठा केली. सुमारे सहा महिने आधीच तोरण्यात आल्यामुळे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळेपर्यंत ऊनपाऊस झेलल्यानं नवटपणाच्या उरल्यासुरल्या खुणा पुसल्या जाऊन तो बऱ्यापैकी जुना आणि वापरात असल्यासारखा दिसू लागला होता. याच ऊनपावसामुळे निवडक अंतर्नाद •४३१