पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजूबाजूच्या शेतांत लावलेली झाडं, पिकंही आता चांगली तरारली होती. दिल्ली आणि तिच्या आसपासच्या चित्रीकरणाच्या एकूण दहा आठवड्यांपैकी जास्तीत जास्त वेळ या आश्रमाच्या सेटवरच खर्ची पडला. तिथल्या एकूण वातावरणाचा माहोलच मुळी शांत, गंभीर, प्रसन्न असा होता. साऱ्या गांधी युनिटवर त्याचा लक्षणीय प्रभाव पडला होता. यामुळे आपोआपच परस्परांतील सौहार्दाची, सामंजस्याची आणि सहकार्याची भावना वाढीस लागून स्नेहबंध अधिक दृढावत गेले, असं आपलं निरीक्षण अॅटनबरो यांनी आवर्जून नोंदवून ठेवलं आहे. पुराभिलेख खात्याच्या दफ्तरखान्याचा धांडोळा घेऊन जुनी छायाचित्रं मिळवून, त्यांचा अभ्यास करून, मग १९१७ मधलं 'गाव' उभारलं गेलं. ऐतिहासिक दृष्ट्या सारं काही कालानुरूप यथातथ्य असलं पाहिजे, यावर विशेष कटाक्ष होता. त्या काळातील छपरांवरची ह्यती बनावटीची कौलं, मुलांची लाकडी घसरगुंडी, ओटीवरचा गुजराती झोपाळा स्वयंपाकघरातील भांडीकुंडी, गोठ्यातील गुरंढोरं, पिंजऱ्यातले पोपट... अगदी त्या काळातल्या खास घाटाच्या पिकदाण्यादेखील. दरम्यान सुमारे ४५,००० पौंड वजनाची तांत्रिक आणि कार्यालयीन साधनसामग्री इंग्लंडहून भारतात वाहून नेण्यासाठी एक 'बोइंग ७०७' चार्टर करण्यात आलं. चार मोठाली वाहनं ( त्यात एक जनरेटर), दोन फिरती (मोबाईल) स्वयंपाकघरं आणि एक फूड रेफ्रिजरेशन ट्रक एवढ्या गोष्टी सागरी मार्गानं पाठवण्यात आल्या. सर्व तंत्रज्ञ आणि संवाद बोलणारे १५० कलावंत, तसंच गर्दीसाठी येणारे काही रोजगारी तर काही हौशी स्वयंसेवी, अशा सहस्स्रावधी लोकांच्या पोटापाण्याच्या तरतुदीचा हा सरंजाम होता. भारतातील चित्रीकरणाची लोकेशन्स (चित्रणस्थळं) दिल्ली, मुंबई, पाटणा, अमृतसर, पुणे, उदयपूर, पोरबंदर आणि अलाहाबाद अशा निरनिराळ्या ठिकाणी पसरली होती. ती सर्व अस्सल होती. त्यांत झोपडपट्टीपासून शाही प्रासादांपर्यंत आणि माळरानांपासून नदीकिनाऱ्यांपर्यंत विविधता होती. निष्णात अशा वेचक १०२ ब्रिटिश आणि १२३ भारतीय तंत्रज्ञांचा संघ चित्रपटासाठी राबत होता. दृश्यांच्या मागणीनुसार त्यांची संख्या कमीअधिक होई. प्रवासासाठी गरजेनुसार बसेस, कार्स, ट्रेन्स, विमानं या वाहनांचा वापर होई. तंत्रज्ञ आणि कलावंतांना चित्रीकरणादरम्यान सर्व प्रकारच्या हवामानाला तोंड द्यावं लागलं. हाडं गोठवून यकणारी दिल्लीची हिवाळ्यातली थंडी आणि भाजून काढणारा राजस्थानातला एप्रिलमधला उष्मा! चित्रीकरण एकूण २६ आठवडे (२४ भारतात; २ लंडन नि आसपास) झालं. चित्रीकरणास आरंभ दि. २६ नोव्हेंबर १९८०. दिल्लीच्या पश्चिमेस पंचवीस मैलांवर असलेल्या सिकंदरापुरा घासी नामक एका खेड्यात आज 'गांधी' चित्रपटाच्या चित्रीकरणास आरंभ होणार होता. ४३२ • निवडक अंतर्नाद भल्या सकाळी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कार्यस्थळी उपस्थित होते. दिल्लीचा कडाक्याचा गारठा असूनही प्रत्येकाच्या गात्रांतून उत्साहाची, उत्सुकतेची ऊब सळसळत होती. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो यांचं गेल्या सुमारे दीड तपाचं स्वप्न आता थोड्याच वेळात आकार घेऊ लागणार होतं. त्यांच्यावर जबाबदारीचं ओझं अर्थातच सर्वाधिक होतं. मात्र ते अविचल होते. ब्रिटिश शिस्तीतल्या अॅटनबरोंनी चित्रीकरणाची संपूर्ण योजना बारीकसारीक तपशिलांनिशी अगदी काटेकोर आखली होती. चित्रीकरणाचा मुहूर्त पारंपरिक हिंदू पद्धतीनं झाला. हिंदू उपाध्यायांनी यथासांग कॅमेऱ्याची पूजा केली; नारळ वाढवण्यात आला; प्रसाद वाटण्यात आला आणि मग लागलीच कामाला सुरुवात झाली. लोकेशनवरील जी बत्रा खाण वापरण्यात येत होती, ती चित्रपटयत दक्षिण आफ्रिकेतील एक खाण म्हणून दाखवण्यात येणार होती. तरुण गांधी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभकाळातील ब्रिटिश सरकारविरोधी आंदोलन तिथं छेडतात, असं दृश्य होतं. हे सारंच दृश्य मोठं गुंतागुंतीचं होतं. या चित्रीकरणासाठी प्रथमतःच लूमा क्रेन वापरण्यात येणार होती. ती पूर्ण ३६० अंशात फिरवता येत असल्यानं एका टेकमध्ये फार मोठा परिसर टिपून दृश्याची भव्यता साधता येत होती. नेहमीच्या यंत्रणेनं हे साधता येणं अशक्य होतं. या दृश्यात अश्वारूढ पोलिसदलासह सुमारे तीनशेजणांचा जमाव होता. गांधीजींच्या भूमिकेतील बेन किंग्जले अगदी आरंभापासूनच पूर्णतया आत्मविश्वासपूर्वक वावरत होता. भूमिकेच्या पूर्वतयारीसाठी त्यानं कसून मेहनत घेतली होती. आपल्याला कोणतं शिवधनुष्य पेलायचं आहे, याची त्याला पुरेपूर कल्पना होती. या भूमिकेत आपण जरा जरी कमी पडलो तर सारा चित्रपटच भयंकर टीकेला पात्र होऊन कोसळेल, हे तो मनोमन ओळखून होता. मात्र या संभाव्य धोक्याच्या कल्पनेनं भयग्रस्त होण्याऐवजी त्याची जिद्दच उफाळून आली होती. बेननं महात्मा आपल्या अंगी किती भिनवला आहे, याची प्रचिती पहिल्या दिवशीच्याच चित्रीकरणापासून येऊ लागली. दुसरं दृश्यही महत्त्वाचं होतं. १९१५ साली गांधीजी भारतात परतल्यानंतरचं एका भल्या मोठ्या मंडपात ते चित्रित करण्यात आलं. मंडपात तेराशेहून अधिकच माणसांचा जमाव होता. गांधीजींच्या भूमिकेतील बेनला भाषणासाठी व्यासपीठावर आमंत्रित करण्यात येतं. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणता मार्ग अनुसरायला हवा, याविषयीचं ते भाषण होतं. कळकळीनं ओथंबलेलं बेनचं ते भाषण इतकं हृदयस्पर्शी आणि मंत्रमुग्ध करणारं झालं, की ते संपल्यावर कितीतरी वेळ टाळ्यांचा कडकडाट होत राहिला.. मंडपातल्या जमावाकडून आणि चित्रपटाच्या तंत्रज्ञांकडूनही! चित्रीकरणाच्या तिसऱ्या आठवड्यात रोहिणी प्रथम सेटवर अवतीर्ण झाली. तिचं पहिलंच दृश्य होतं, ते दोन हजारांहून अधिक लोकसमुदायापुढे भाषण देण्याचं. ती आणि स्वतः