पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सारे सोपस्कार पूर्ण होऊन जून १९८२मध्ये 'गांधी' चित्रपट लोकांसमोर येण्यास सज्ज झाला. वीस वर्षांपूर्वी पाहिलेलं एक स्वप्न साकार करण्यासाठी रिचर्ड अॅटनबरो नामक एका जिद्दी ब्रिटिश नयनं आरंभिलेल्या अथक श्रमयज्ञाची कुणाही चित्रपट- व्यावसायिकाला हेवा वायवा अशीच सांगता झाली. माणसांसाठी माणसाची गोष्ट 'गांधी' चित्रपयस आरंभ होतो. गांधीहत्या आणि गांधीजींची विराट अंत्ययात्रा हे महत्त्वाचे सीक्वेन्स झाल्यानंतर फ्लॅशबॅक सुरू होतो. रात्रीच्या अंधारातून शिट्टी फुंकत, धडाडत जात असलेल्या ट्रेनचं दृश्य येतं. त्या पार्श्वभूमीवर अक्षरं येतात, 'दक्षिण आफ्रिका १८९३ ट्रेनमधला पहिल्या वर्गाच्या कंपार्टमेंटमध्ये खिडकीजवळच्या सीटवर बसून तरुण गांधी पुस्तक वाचण्यात दंग मस्तकावर काळेभोर दाट केस. चेहरा देखणा याआधी बिर्ला हाउसमधील सिक्वेन्समध्ये पाहिलेल्या त्यांच्या डोळ्यांमुळे आपल्याला इथं त्यांची ओळख पटते. कंपार्टमेंटमध्ये ते आणि एक कृष्णवर्णीय पोर्टर यांच्याखेरीज तिसरं कुणीही नाही. कंपार्टमेंटवरून जाणारा एक युरोपियन दारात थबकतो. पहिल्या वर्गाच्या डब्यात एक काळा आदमी पाहून तो थक्क होतो. पोर्टर त्याच्याकडे अस्वस्थपणे पाहतो; हलक्या, पडेल आवाजात गांधींना विचारतो, "माफ करा साहेब, पण दक्षिण आफ्रिकेत तुम्ही किती काळ आहात?" गांधी गोंधळून म्हणतात, "का बरं? एक आठवडा " "मला कळत नाही, की तुम्हांला पहिल्या वर्गाचं तिकीट कसं काय.... " अचानक तो घाबरून त्यांच्याकडे पाठ करतो नि आपल्या कामाकडे वळतो. तो कशासाठी एवढा घाबरला ते पाहण्यासाठी गांधी दाराकडे नजर वळवतात. मघाच्या त्या युरोपिअनासह गाडीचा कंडक्टर काचेचं दार उघडून आत येतो. उर्मटपणे गांधींकडे पाहत तो दरडावून विचारतो, "ए कूली, तू इथं या कंपार्टमेंटमध्ये काय करतो आहेस?" आपल्याशी कुणी अशा रीतीनं बोलेल, यावर गांधींचा विश्वासच बसत नाही. खिशातून तिकीट काढत ते म्हणतात, "का बरं? माझ्यापाशी तिकीट आहे. फर्स्ट क्लासचं तिकीट" "कसं काय मिळालं तुला हे?” कंडक्टरचा उद्धट प्रश्न, "मी पोस्टानं मागवलं. मी अॅटर्नी आहे. आणि मला वेळ नसतो.” "दक्षिण आफ्रिकेत कुणीही काळे अॅटर्नीज नाहीत,” लागलीच तो युरोपियन बरळतो, "जा, पुढच्या स्टेशनावर उतर आणि जिथं तुझी खरी जागा आहे तिथं जाऊन बैस, " तो जोरजारानं ट्रेनच्या पाठीमागच्या दिशेस हस्तनिर्देश करतो. गांधी संभ्रमित होतात. पुढचा संभाव्य अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी पोर्टर रॅकवरील त्यांच्या सामानास हात घालत म्हणतो, "तुमचं सामान मी पाठीमागे नेऊन ठेवतो, साहेब. 2) गांधी त्याला थांबवतात आणि कोटाच्या खिशातून एक कार्ड काढून कंडक्टरला देतात. "पाहा, पाहा, " ते सांगतात, "मोहनदास के गांधी, अॅटर्नी अॅट लॉ, एका भारतीय व्यापारी फर्मसाठी केस चालवण्यासाठी मी प्रिटोरियाला चाललो आहे.” "मी काय म्हणालो ते ऐकलं नाहीस का तू?” युरोपियन कडाडला. "दक्षिण आफ्रिकेत कुणीही काळे अॅटर्नीज नाहीत.” " तर मग सर, माझ्या रूपानं एक तरी काळा अॅटर्नी दक्षिण आफ्रिकेत आहे” पोर्टर थक्क होऊन गांधींकडे पाहातच राहतो. युरोपिअनाचा क्रोध उत्कलन बिंदूकडे झेपावतो आणि हातवारे करत तो किंचाळतो, "स्मार्ट ब्लडी काफिर! थ्रो हिम आउट !” इतक्यात गाडी स्टेशनात येऊन थांबते. त्यासरशी जणू वाटच बघत असलेला कंडक्टर गांधींना गाडीतून बाहेर फलाटावर ढकलून देतो आणि पाठोपाठ त्यांचं सामानही. आपण मनोमनी संतप्त होतो. हे पडद्यावरचं दृश्य आहे, याचा क्षणमात्र विसर पडतो. गाडीची एक कर्णपटू शिट्टी रात्रीच्या नीरव वातावरणाला छेद देते. इंजिनातून निघालेल्या वाफेचा ढग अंधाराच्या तोंडाला पांढरं फासतो. धापा टाकत गाडी तिथून पळ काढते. ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे आंधळ्या नजरेनं पाहत गांधी सुत्रबधिरपणे उभे आहेत. स्टेशनातल्या मळकट खाकी प्रकाशात फलाट झाकोळून निघाला आहे एकाकी फलाट एकाकी गांधी अवमानित, संतप्त आणि हतबल, कुणातरी तान्ह्या बाळाचं कोवळं आक्रंदन कानांवर येतं. बाजूलाच कुठंतरी अंधारात उभ्या असलेल्या कुणा मातेच्या धूसर आकृतीकडे कॅमेरा हलकेच वळतो. ती आपल्या रडणाऱ्या लेकराची समजूत काढत असते. कॅमेरा झपकन टॉप अँगलला जातो. वरून सारा फलाट नजरेच्या टप्प्यात येतो. सुना सुना त्यावर उभे असलेले गांधी अधिकच एकाकी, असहाय आणि हरवलेले वाटू लागतात. पुन्हा काळजात कळ उठते. वाटतं, की ते गांधी आहेत, की आपण स्वतःच? त्या वेळची त्यांची मनःस्थिती केव्हाच आपल्यात भिनू लागलेली असते. आपण आणि गांधी यांच्यातलं द्वैत विरून जातं. इथून पुढे गांधी आपल्यासाठी एक नेता, राजकारणी म्हणून न राहता निखळ माणूसच उरतात. त्याच दृष्टीतून आपण पुढचा सारा चित्रपट पाहत राहतो. अखेर माणसांना माणसांच्याच गोष्टी अधिक भावतात, आणि मनाला भिडतातही! (दिवाळी २००७) निवडक अंतर्नाद ४३५