पान:निवडक अंतर्नाद.pdf/४३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खेळाडू ठरला आणि लांब उडी व ४ X १०० मीटर स्पर्धातही सुवर्णपदके पटकावून तो सर्वश्रेष्ठ खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. त्याच्याशी हस्तांदोलन करायला लागू नये म्हणून हिटलरने बक्षीस समारंभांना यायचेच यळले. दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे १९४० व १९४४ साली ऑलिंपिक स्पर्धा झाल्याच नाहीत. सर्वच युरोपियन राष्ट्रांना महायुद्धाच्या धक्क्यातून सावरायला बराच काळ जावा लागला. त्यामुळे १९४८ च्या लंडन ऑलिंपिक्स व १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिक्समध्ये अमेरिकेला आपले वर्चस्व राखता आले. पण १९५६च्या मेलबर्न ऑलिंपिक्समध्ये रशिया पूर्ण तयारीनिशी उतरला आणि त्याच्या संघांनी अमेरिकेला मागे टाकले. याचीच पुनरावृत्ती १९६० च्या रोम ऑलिंपिक्समध्ये झाली. १९६४चे ऑलिंपिक्स पहिल्यांदाच आशियात जपानची राजधानी टोकियो येथे भरले. तोपर्यंत ऑलिंपिक स्पर्धा सुप्रतिष्ठित झाल्या होत्या. त्या स्पर्धांत मिळालेली पदके म्हणजे त्या राष्ट्राच्या प्रगतीचा आलेख समजला जाऊ लागला होता. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान जोमाने परत उभा राहिला. ऑलिंपिकचे आयोजन तर उत्तम करून दाखवलेच; पण १६ सुवर्णपदके, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदके मिळवून त्याने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली, यावेळी अमेरिकेने पदकतालिकेत पहिला क्रमांक मिळवताना रशियाला मागे टाकले. मग १९६८ च्या मेक्सिको ऑलिंपिकमध्ये हीच क्रमवारी राहिली, आता बलाढ्य राष्ट्रांमध्ये क्रीडाविषयक शास्त्रांमध्ये प्रगती करून खेळाडूंचा विकास साधण्याची चढाओढ सुरू झाली. क्रीडावैद्यकशास्त्र, आहारशास्त्र आणि क्रीडामानसशास्त्र यांत मोठ्या प्रमाणावर संशोधन करून १९७२च्या म्युनिक ऑलिंपिकमध्ये आणि १९७६ च्या मॉन्ट्रिअल ऑलिंपिकमध्ये सोव्हिएट रशियाने अमेरिकेला कोठल्या कोठे मागे टाकले. जर्मनीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन स्वतंत्र संघ उतरलेले असतानाही मॉन्ट्रिअलमध्ये पूर्व जर्मनीनेही अमेरिकेला मागे यकले, हंगेरी, रोमानिया, पोलंड हे रशियन वर्चस्वाखालचे युरोपीय देशही आपली चमक दाखवू लागले. १९८० मध्ये मॉस्को येथे भरलेल्या ऑलिंपिकमध्ये बहुतेक पाश्चात्त्य राष्ट्रांनी बहिष्कार टाकलेला असल्याने स्पर्धा एकतर्फी होऊन रशिया आणि पूर्व जर्मनीने बहुसंख्य पदके जिंकली. अमेरिकेत भरलेल्या १९८४च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकवर रशियन वर्चस्वाखालील बहुतेक राष्ट्रांनी बहिष्कार टाकल्यामुळे स्पर्धा एकतर्फीच झाल्या. मग सर्वांनीच या स्पर्धांत भाग घ्यायला हवा, असे प्रयत्न सुरू झाले. १९८८च्या स्पर्धा दक्षिण कोरिया या झपाट्याने आर्थिक प्रगती करीत असलेल्या देशाची राजधानी सेऊल येथे झाल्या उत्तम आयोजन करून पदकतालिकेत पश्चिम जर्मनी, जपान यांच्याहीवर क्रमांक मिळवून कोरियाने आपल्या शक्तीची चुणूक दाखविली परत सोव्हिएट रशियाने अमेरिकेपेक्षा १९ सुवर्णपदके जास्त पटकावून आपले वर्चस्व निर्विवाद प्रस्थापित केले. पूर्व जर्मनीनेही पुन्हा एकदा अमेरिकेला मागे यकले. आशियातली आणखी एक महासत्ता चीनपण या स्पर्धांत उतरला आणि पदकतालिकेत सहावा क्रमांक पटकावून त्याने आपल्या तयारीची चुणूक दाखवून दिली. पुढल्या १९९२च्या बार्सिलोना ऑलिंपिकपर्यंत सोव्हिएट युनियनचे विघटन झाले होते, तरी त्या साऱ्या देशांचे संघ एकत्र उतरले आणि त्यांनी अमेरिकेच्या संघाचा धुव्वा उडवला. चीनने चौथ्या स्थानावर येऊन आपले सामर्थ्य वाढले असल्याची सर्वांना कल्पना दिली. १९९६ सालच्या अटलांटा येथील ऑलिंपिकमध्ये अमेरिकेने ४४, रशियाने २६, जर्मनीने २० व चीनने १६ सुवर्णपदके मिळवली. तीच परिस्थिती २०००च्या सिडनी ऑलिंपिकमध्येही होती. पण यावेळेला तिसऱ्या क्रमांकावर येऊन चीनने अमेरिकेला धोक्याचा इशारा देऊन ठेवला. २००४चे ऑलिंपिक ग्रीसची राजधानी अथेन्स येथे झाले. अमेरिकेने आपले वर्चस्व कसेबसे राखले; तर चीनने त्यांच्यापेक्षा फक्त ४ सुवर्णपदके मागे राहून पदकतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. ग्रीकांनी स्पर्धांचे सुंदर आयोजन तर केलेच; पण ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्यपदके जिंकून पदकतालिकेत बराच वरचा क्रमांक मिळवला. २००८चे ऑलिंपिक चीनमध्ये भरले. उत्कृष्ट आयोजनाचा एक नमुना पेश करत चीनने ५१ सुवर्णपदके जिंकली; तर श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेच्या वाट्याला फक्त ३६ सुवर्णपदके आली. २०१२च्या ऑलिंपिकच्या यजमानपदाचा मान मिळालेल्या ब्रिटनने १९ सुवर्ण, १३ रौप्य व ८८ कांस्य पदके जिंकून पदकतालिकेत रशियाच्या मागे चौथा क्रमांक पटकावला. आशियामधील कोरिया व जपान या सत्तासुद्धा चांगल्या क्रमांकावर आल्या; तर स्वातंत्र्याला ६० वर्षे पूर्ण केलेल्या भारताचा क्रमांक पदकतालिकेत ५०वा आला. ही आपली ऑलिंपिकमध्ये आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. आशियामधलेही मंगोलिया, मलेशिया, कझाकस्तान वगैरे १०/११ देश पदकतालिकेत आपल्या पुढे आहेत आणि आपण ऑलिंपिक स्पर्धा भरवण्याच्या गप्पा करीत आहोत! आपली पुढे आलेली पोटे घेऊन समारंभात मिरवण्याचा प्रयत्न तेवढा करणाऱ्या आपल्या संघटक, राजकारणी आणि नोकरशहांमुळे आपण भारतीय जागतिक क्रीडाक्षेत्रातले विदूषक समजले जातो. आपले सगळीकडे हसे होत आहे, हेसुद्धा या महाभागांना समजत नाही. त्यांना फक्त उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमात रस असतो. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत पदकप्रदान समारंभ अगदी साधेपणाने साजरा केला जातो. सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक मिळवणारे खेळाडू विजयमंचावर उभे असतात. त्यांच्या देशांचे ध्वज फडकवले जातात. त्यात सुवर्णपदक जिंकणाच्या खेळाडूच्या देशाचा ध्वज सर्वात उंचावर असतो आणि त्याच्या देशाच्या राष्ट्रगीताची धून त्यावेळी वाजवली जाते. आपला झेंडा सर्वात वर फडकवणे आणि आपले राष्ट्रगीत सर्वांना ऐकवणे हे साऱ्या खेळाडूंचेच नव्हे; तर साऱ्या देशांतील क्रीडाप्रेमींचे स्वप्न असायला हवे. क्रीडाक्षेत्रात खेळाडूच्या वर कोणी नाही, तोच मुख्य घटक आहे आणि बाकीचे सारे फॅसिलिटेटर्स म्हणजे मदत करायच्या भूमिकेत आहेत, हेच मुळी विसरायला होते. मग आपल्या वाट्याला विदूषकाची भूमिका येणार, याचेही आपल्याला काही वाटत नाही. कारण 'चक दे इंडिया' सारखा एखादा सिनेमा पाहिला, तरी आपल्याला ते पुरेसे असते. निवडक अंतर्नाद ४३७