पान:निवडक अंतर्नाद.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रद्धा-अश्रद्धा-अंधश्रद्धा यांच्या पलीकडे नेणारा मधु मंगेश कर्णिक यांना अलीकडेच आलेला एक आगळा अनुभव ओझरते दर्शन घेण्याचा योग आला होता. सोलापूरला दरवर्षी दमाणी साहित्य पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होतो, काही वर्षापूर्वी या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पंढरपूरला जाऊन आलो. तेथे भागवताचार्य वा ना उत्पात यांनी विठ्ठलाचे दर्शन घडवून आणले होते. पण युगे अठ्ठावीस विटेवर उभ्या असलेल्या या सावळ्या परब्रह्माला डोळे भरून पाहता आले नव्हते. क्षणभर दर्शन घडते न घडते तोवर पुजारी दुसऱ्या दर्शनेच्छुकाला पुढे ढकलतो! त्या गोजिया रूपाला डोळ्यात साठवताच येत नाही. सर्व पूजासाहित्य घेऊन पुढे गेले होते. दर्शनार्थीची रांग एव्हाना सुरू झाली होती आणि पावलापावलाने वाढत होती, परमेश्वराची षोडशोपचारे पूजा करायची तर पूजेचे सर्व नियम पाळावे लागतात. त्याप्रमाणे सौ. स्वच्छ रेशमी लुगडे नेसली होती पण मला रेशमी कद वा मुकटा नेसणे जमत नव्हते! मग पुरोहितांनी हातभार लावला आणि आम्ही उभयतां पूजेसाठी सज्ज झालो. प्रथम विठ्ठलाच्या गाभान्याच्या एका बाजूच्या मोकळ्या जागेत पुण्याहवाचन, गणेशपूजा आदी मुख्य पूजेच्या आधीचे विधी पार पडले. ते आटोपल्यानंतर दत्तोपंत बडवे यांनी आम्हांला विठ्ठलापुढील चांदीने मढविलेल्या महाद्दारासमोर थेट नेऊन उभे केले. श्री विठ्ठलाचे समीपदर्शन 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असलेल्या त्या परब्रह्माला पाहताच मन आतून उचंबळून आले. एरवी मी घरच्या देवाचीही कधी नियमित पूजा केलेली नाही! देव आणि धर्म यांतील द्वैत सतत पाठलाग करीत आले होते. क्षणभर मनात असेही येत होते, की आपण पंढरपूरचे आमंत्रण येताच देवभोळेपणाने हुरळून गेलोय का? आजवर आपल्या आयुष्यात हा विठ्ठल कुठे होता? मग दत्तोपंत बडवे यांनी निमंत्रणाबरोबर आणखीही जे काही सांगितले होते याची आठवण झाली. दत्तोपंत म्हणाले होते “आपण येणार असल्याचा लाभ घेऊन एक अभिनव कार्यक्रम आयोजित केला आहे तोही आपल्याच उपस्थितीत व्हावा, अशी विनंती आहे.” हा कार्यक्रम खरोखरच अभिनव अशा सामाजिक स्वरूपाचा होता. समाजातील एकत्र कुटुंबपद्धतीने, एकाच चुलीवर अनेक माणसांचा स्वैपाक रांधणाऱ्या कुटुंबे एकत्र ठेवणाऱ्या त्या कुटुंबप्रमुख महिलांचा जाहीर सत्कार त्या कार्यक्रमात होणार होता. एकतेतून देवत्वाकडे जाण्याचा हा प्रवास निश्चितच सत्कारार्ह होता व मला त्याचे विठ्ठलाच्या पूजेएवढेच अप्रूप वाटत होते. विठ्ठल जर सर्वांचा, तर तोच ही सर्वात्मकता जपण्याचे बळ देतो, असे मला वाटले आणि ती महापूजा म्हणजे समाजाच्या ऐक्याची महापूजा मला वाटली. माझ्या मनातील सारे द्वैत निमिषात नाहीसे झाले मी पंढरपूरची वाट धरली. आदल्या दिवशी सपत्नीक पोचलो, तेव्हा विठ्ठल रुक्मिणीच्या गौरीच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू होत होती. गौरीचा सजवलेला शोभिवंत मुखवय असलेला चौरंग मस्तकावर घेऊन एक वृद्ध भाविक चालत होते. त्यांच्या बरोबरीने चालणारे आळीपाळीने ते मखर आपल्या मस्तकी घेऊन चालत होते. पंढरपूर शहरातील सर्व स्त्रिया नटूनथटून गौरीच्या दर्शनाला निघाल्या होत्या. "देवदर्शना निघती ललना हर्ष माझ्या हृदयांत" - ओल्या श्रावणाला अधिकच चिंब करणारे ते रमणीय दृश्य ! मुंगीच्या पावलांनी चालणारी ती मिरवणूक सूर्यास्तासमयी चंद्रभागेच्या घाटावर पोचली. सश्रद्ध अंतःकरणाने जड हातांनी पुरोहितांनी गौरीचे गंगेत विसर्जन केले. निरोपाची आरती, पूजा सारे यथासांग झाले. गौरीच्या या सोहळ्यासाठी अख्खे पंढरपूर घाटावर एकवटले होते. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी श्री विठ्ठलाची महापूजा, पुरोहित रंभीचीच महापूजा आमची होती. आम्हांला श्री विठ्ठलाच्या समोरच्या दरवाज्यात बसवण्यात आले. आम्ही एकटक विठ्ठलाकडे पाहत होतो. अजून त्याच्या अंगावर आदल्या दिवशीचाच वेष होता. मग पुरोहित पुढे झाले. (इथे प्रत्येक लहानसहान विधीसाठी ठरलेले मानकरी व सेवेकरी असतात.) त्यांनी विठ्ठलाच्या अंगावरील निर्माल्य हळूहळू बाजूला केले. मग त्याचे कपडे उतरवण्यास प्रारंभ केला. किंचित्काळात विठ्ठलाची उघडी मूर्ती डोळ्यांसमोर साकार झाली! काळासावळा वर्ण, ओबडधोबड देह, विस्फारल्यागत वाटणारे पण निश्चल, शांत, आश्वासक डोळे, दोन्ही हात कटीवरी, कमरेवर शेला आणि खाली समचरण, मस्तकी उंच टोपी... बाकी सर्व देह उघडा, अवस्त्र... स्वप्नातही न पाहिलेले 'सुंदर ते ध्यान साक्षात समोर ठाकले होते नि आम्ही साक्षात आमच्या इवल्याशा डोळ्यांत ते मावेल तेवढे साठवून घेत होतो! याच मराठमोळ्या, कानडा विठ्ठलाला डोळ्यांत साठवण्यासाठी दशदिशांतील वारकरी इथे, या इवल्याशा जागेत एकत्र होतात. सबंध महाराष्ट्राचा आणि कर्नाटकाचा ह्य देव. येथल्या भोळ्याभाबड्या, राकट काळ्या, ओबडधोबड देहाच्या माणसासारखाच त्याचा हा देव! वर वर पाहिले तर एक ओबडधोबड मूर्ती, रेखीवपणाचा अंशही नसलेली... पण अंतर्मनातून, अंतः चक्षूंनी पाहिली तर किती रूपसुंदर ! 'देहुडा चरणी वाजवीत वेणू असलेला हा उभा चक्रपाणी पाहण्यासाठी डोळेही तसेच हवेत. अश्रद्ध मनाने, कोरड्या डोळ्यांनी दिसेल ती एक प्राचीन, आकारविल्हे नसलेली दगडी मूर्ती! पण जेव्हा तुम्हांला जाणवेल, की याच मूर्तीच्या दर्शनासाठी संतांनी टाहो फोडला होता, ज्ञानदेव माउली तुकाराम महाराज, रामदास महाराज, एकनाथ, निवृत्ती, जनाबाई आणि नामदेव यांनी याच परब्रह्मासाठी जिवाचा आकांत केला होता, किती साधुसंतांचे मस्तक या समचरणावर नत झाले असेल, हे सारे अंतःकरणात जाणवताक्षणी समोरचा विठ्ठल म्हणजे कोण आहे, त्याचा विसर पडतो. माय रखुमादेवीवरू.... साक्षात आई आणि प्रत्यक्ष निवडक अंतर्नाद ४३