पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीला ज्यावेळी ही कादंबरी प्रसिद्ध झाली त्यावेळी या कथानकाने एकाच वेळी खळबळ उडवून दिली आणि प्रसिद्धीही अनुभवली. आत्मघाताचे तीव्र आकर्षण असणारा नायक, त्याचप्रमाणे प्रस्थापित विवाहसंस्थेविषयीची भूमिका आणि नायकाचे दारूच्या आहारी जाणे; भरीस भर म्हणून नायकाचे गणिकेबरोबर असलेले संबंध या भारतीय समाजातील निषिद्ध गोष्टी! या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे या कादंबरीची सिनेमामध्ये रूपांतरण करण्याविषयीची उपयुक्तता अनेकांच्या लक्षात आली, नव्हे तिने अनेकांना भुरळच घातली. याच्या जोडीला शरच्चंद्र चटर्जी यांच्या आणि कादंबरीतील सहजता नाट्यात्मकता यांचे सुरेख मिश्रण, प्रभावशाली संवाद आणि या सर्वांचा होणारा एकत्रित परिणाम या कारणांमुळे केवळ देवदासच नव्हे तर त्यांच्या परिणिता, बिराज बहू इत्यादी कृतींचे यशस्वी रूपांतर पडद्यावर केले गेले. १९३५ मधील बंगाली देवदास चित्रपटामध्ये नायकाची भूमिका स्वतः प्रथमेश बारूआ यांनीच केली. पारोची भूमिका जमुना व चंद्रमुखीची भूमिका चंद्रावतीदेवी यांनी निभावली होती. या चित्रपटाने व्यावसायिक सफलता तर मिळवलीच पण समीक्षकांसकट सर्वांनीच हा बोलपट वाखाणला. खुद्द शरच्चंद्र चटर्जी यांनी चित्रपटाचे कौतुक केले. चांगल्या कथानकाबरोबरच प्रथमेश बारूआ यांनी अतिशय परिणामकारक वठवलेली देवदासची व्यक्तिरेखा आणि तितकेच कुशल दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाने चांगलेच यश मिळवले. आत्तापर्यंत जवळजवळ तेरा वेळा वेगवेगळ्या देवदासची निर्मिती झाली आहे पण मराठी भाषेमध्ये देवदास पडद्यावर आला नाही. असे का झाले असावे याचा विचार करताना आपल्याला देवदासच्या पात्राकडे बारकाईने पाहावे लागेल. त्यानंतर १९३५ मध्येच लगेच आला तो हिंदी भाषेमधील देवदास ज्यामध्ये प्रसिद्ध पार्श्वगायक कुंदनलाल सैगल यांनी देवदासाची भूमिका केली. पुन्हा एकदा पारोच्या भूमिकेमध्ये जमुना होत्या, तर राजकुमारी यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली. सैगल यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. त्यामुळे या चित्रपयने तुफान यश मिळवले. अजूनही सैगल यांची गाणी रसिकांच्या ओठावर आहेत! बिमल रॉय या चित्रपटाचे छायालेखक होते. पुढच्या वर्षी म्हणजे १९३६ साली तमिळ भाषेमध्ये पी. व्ही. राव यांनी देवदास बनवला. यामध्ये कुंदनलाल सैगल यांनी दोन गाणी गायली. मग १९५३ मध्ये राघवैय्या यांनी तेलुगूमध्ये देवदास पडद्यावर आणला, प्रसिद्ध अभिनेते अकिण्णेणी नागेश्वरराव (सध्याचा तेलुगूमधील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याचे वडील) यांनी देवदासची भूमिका केली. केले. जिवंत आणि वास्तववादी अभिनय यामुळे अजूनही दिलीपकुमार यांचा देवदास लोकांना आठवतो. देवदासच्या मित्राची, चुन्नीलालची भूमिका मोतीलाल यांनी जिवंत केली होती तर सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला यांनी अनुक्रमे पारो आणि चंद्रमुखी म्हणून समर्थ साथ दिली. हा चित्रपट खूप गाजला आणि त्याचबरोबर एक 'क्लासिक' चित्रपट म्हणून त्याची नोंद भारतीय सिनेमाच्या इतिहासामध्ये केली जाते. १९५५ मध्ये बिमल रॉय यांनी हिंदीमध्ये देवदास बनवताना दिलीपकुमारची निवड देवदास साकारण्यासाठी केली. त्याने अतिशय समर्थपणे ही भूमिका पडद्यावर वठवून देवदास म्हणजे दिलीपकुमार हे समीकरण रसिकांच्या मनामध्ये पक्के प्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार यांनाही देवदासने मोहिनी घातली होती. धर्मेन्द्र आणि हेमामालिनी यांना घेऊन त्यांनी सुरुवातही केली, पण फक्त दोन रिळांचे शूटिंग झाल्यानंतर काही कारणास्तव हा चित्रपट डब्यात गेला. अशाच प्रकारे तमिळ, मल्याळम इत्यादी आणखी काही भाषांमध्ये देवदास बनवला गेला. शक्ती सामंत यांनी बंगालीमध्ये तर संजय लीला भन्साळी यांनी शाहरूख खानला घेऊन खर्चिक देवदास बनवला, नव्या पिढीतल्या अनुराग कश्यप यांनी देवदासपासून प्रेरणा घेऊन 'देव डी' या Black Comedyची निर्मिती केली. नामांकित दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीही 'और देवदास' नावाच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या कथेची मोहिनी अशी जबरदस्त आहे, की काही ठरावीक कालावधीनंतर एक नवीन दिग्दर्शक येतो आणि त्याला भावलेले देवदासचे एक नवीन रूपांतरण सादर करण्याचा प्रयत्न करतो! इतर अनेक भाषांमध्ये देवदास बनवला गेला, परंतु भारतीय चित्रपट उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीने मात्र आश्चर्यकारकरीत्या देवदासकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ तेरा वेळा वेगवेगळ्या देवदासची निर्मिती झाली आहे पण मराठी भाषेमध्ये देवदास पडद्यावर आला नाही. असे का झाले असावे याचा विचार करताना आपल्याला देवदासच्या पात्राकडे बारकाईने हिंदी देवदास, १९३५. प्रमुख भूमिकेत कुंदनलाल सैगल. सोबत पारोच्या भूमिकेत पुन्हा एकदा जमुना. निवडक अंतर्नाद ४५१