पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

FAN PLAST हिंदीतील सर्वांत गाजलेला देवदास, १९५५. बिमल रॉय यांनी बनविलेला. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक 'क्लासिक' चित्रपट. देवदासच्या अजरामर भूमिकेत दिलीपकुमार. त्याच्यासोबत डावीकडे चंद्रमुखीच्या भूमिकेत वैजयंतीमाला व उजवीकडे पारोच्या भूमिकेत सुचित्रा सेन. पाहावे लागेल. स्वतःची ठाम मनोभूमिका नसलेला, दुबळा, स्वकेंद्रित, बेजबाबदार वागणे असलेला हा नायक आहे. त्याची आत्मघाताची प्रवृत्ती, चंचल मन, विवाहसंस्थेबद्दलची धरसोड भूमिका बंगाली तरुण वर्गाला आकर्षित करू शकली, पण मराठी मानसिकतेवर त्याचा विशेष प्रभाव पडला नाही असेच म्हणावे लागेल. नाहीतर इतकी मजबूत निर्मिती मूल्ये असलेल्या या कादंबरीचे रूपांतरण एकाही मराठी निर्माता- दिग्दर्शकाला आव्हानात्मक वाटू नये? नायकाचे दारू पिणे, प्रेमभंग आणि दुसऱ्या बाईंच्या नादी लागणे हा विषय मराठीमध्ये तमाशापटांनी चावून चावून चोथा केला आहे परंतु मदिरेमध्ये स्वत:ला बुडवून घेणे, असलेले अनैतिक संबंध या अध: पतनाच्या आणि विनाशाच्या दिशेची वाटचाल अजूनपर्यंत एकदाही मराठी भाषेमध्ये चित्रित होऊ शकली नाही! गणिकेशी नायकाच्या मदिरेमध्ये स्वतःला बुडवून घेणे, गणिकेशी असलेले अनैतिक संबंध या नायकाच्या अधःपतनाच्या आणि विनाशाच्या दिशेची वाटचाल अजूनपर्यंत एकदाही मराठी भाषेमध्ये चित्रित होऊ शकली नाही! आपल्याला ज्या यासाठी काळामध्ये बंगाली आणि हिंदी भाषांमध्ये देवदास बनवला गेला त्या वेळच्या परिस्थितीकडे पाहावे लागेल. त्या कालखंडामध्ये, म्हणजे १९३० च्या दशकामध्ये मराठीत प्रभातयुग बहरात होते. व्ही. शांताराम यांच्या नेतृत्वाखाली प्रभातचे सर्व शिलेदार एका दुर्दम्य आशावादी ध्येयाने चित्रपटनिर्मिती करत होते. म्हणूनच ज्यावेळी बंगाली आणि हिंदीमध्ये देवदास चालला आणि गाजला त्याच वेळेस व्ही. शांतारामांचा 'माणूस / आदमी' हा मराठी आणि हिंदी भाषेमधील आशावादाने प्रेरित चित्रपटही भरपूर चालला. आशावादाची वाट स्वीकारतो. ( शांताराम यांनी या चित्रपटाचे इंग्रजीमध्ये Life is for Living असे शीर्षक दिले होते!) हे जीवन चांगले असून पूर्ण अर्थाने जगण्यासाठी आहे, कर्तव्ये पार पाडण्यासाठी आहे, नवीन काही घडवण्यासाठी आहे असा मार्ग हा चित्रपट दाखवतो. एक पोलीस शिपाई वेश्येचे जीवन सुधारण्यासाठी तिच्याशी लग्न करतो आणि मग होणाऱ्या परिणामांना ते दोघे कसे सामोरे जातात याचे प्रभावी चित्रीकरण शांताराम यांनी केले. या चित्रपयच्या अगोदर आलेल्या 'कुंकू' या मराठीतील आणि 'दुनिया ना माने' या हिंदीतील रुपांतरणामध्ये एक विधवा तरुण स्त्री तिच्यापेक्षा वयाने मोठ्या विधुर माणसाशी विवाह झाल्यानंतर बंड करून उठते. अशा प्रकारे निराशावादी व दैववादी विचारधारणेला तिलांजली देऊन मानवी जीवनाच्या आशवादी आणि कर्मवादी जगण्यावर भर देणारे सिनेमे त्यावेळी मराठीमध्ये प्रामुख्याने निर्माण झाले. देवदास या पात्राच्या पूर्णपणे विरुद्ध किंवा त्याच्या निराशावादी मानसिकतेला छेद देऊन शांताराम यांचा 'आदमी' ४५२ निवडक अंतर्नाद कदाचित याच विचारसरणीचा पगडा पुढील काळातील मराठी चित्रपटनिर्मितीवर झाला असे म्हणण्यास वाव आहे. त्यामुळेच इतक्या वेळेस अन्य भाषांमध्ये निर्मिती होऊनही मराठीमध्ये मात्र देवदास अजूनपर्यंत पडद्यावर येऊ शकला नाही. कोणी नवीन प्रतिभावान दिग्दर्शक हे धाडस पुढील काळात दाखवू शकेल का? (लेखक राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे [NFAI] संचालक आहेत.) (छायाचित्र सौजन्य: राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय) (मे २०१६)