पान:निवडक अंतर्नाद.pdf/४५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देणाऱ्या रविशंकर यांचाही वाटा आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे पुढे सत्यजित राय आणि रविशंकर या दोघांनाही 'भारतरत्न' ही पदवी मिळाली. या दोन महान कलावंतांच्या एकमेकांसोबत केलेल्या वाटचालीची कहाणी मोठी चित्तवेधक आहे. सत्यजित राय आणि रविशंकर हे तसे समवयस्कच, २ मे १९२१ रोजी कलकत्ता येथे जन्मलेले सत्यजित राय हे प्रख्यात बंगाली लेखक सुकुमार राय यांचे पुत्र संगीत ऐकणे आणि चित्रपट पाहणे या दोन गोष्टींचे सत्यजितना लहानपणापासून वेड होते. मात्र त्यांचा अधिक कल पाश्चिमात्य संगीताकडे होता. बीथोवन, बाख, मोझार्ट यांच्या संगीताच्या अनेक रेकॉर्ड्स त्यांनी जमवल्या होत्या व त्या संगीतावरील पुस्तकेही वाचली होती. त्यांनी शांतिनिकेतनमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतले होते व ते एका जाहिरातसंस्थेत चित्रकार म्हणून काम करीत होते. १९४८ साली सत्यजित राय यांनी आपल्या काही मित्रांच्या सोबतीने कलकत्ता फिल्म सोसायटीची स्थापना केली. जगभरचे उत्तमोत्तम चित्रपट पाहणे, त्यावर चर्चा करणे, त्यासंबंधी वाचन करणे व श्रेष्ठ चित्रपटाविषयी सर्वसाधारण प्रेक्षकाची रुची वाढवणे ही या सोसायटीची प्रमुख उद्दिष्टे होती. या सोसायटीतर्फे राय यांनी एकदा चेतन आनंद यांचा 'नीचा नगर' हा चित्रपट पाहिला. हा लोकप्रिय हिंदी चित्रपटांपेक्षा वेगळा असा प्रयोग होता व त्याला १९४६ साली कान येथील चित्रपट महोत्सवात पहिले पारितोषिक मिळाले होते. या चित्रपटाचे संगीत रविशंकर यांनी दिले होते. रविशंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी बनारस येथे एका सुखवस्तू आणि सुशिक्षित बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्याम शंकर चौधरी हे प्रख्यात वकील होते आणि काही काळ त्यांनी राजस्थानातील एका संस्थानात दिवाण म्हणून काम पाहिले होते. प्रख्यात नर्तक उदयशंकर हे रविशंकर यांचे वडील बंधू. रविशंकर कला आणि संगीत यांच्या सान्निध्यात मोठे झाले. लान असतानाच ते वडील बंधूच्या नृत्यनाटिकांत भाग घेत, नृत्य करत व वाद्ये वाजवत तेरा वर्षांचे होईपर्यंत ते अनेक वाद्ये वाजवण्यात प्रवीण झाले होते, मात्र त्यांचे विशेष प्रेम हे सतार या वाद्यावर होते. भावाच्या ग्रुपसोबत त्यांना अनेकदा परदेशांत जावे लागे. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी फ्रेंच शिकून घेतले, तसेच पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचाही अभ्यास केला. १९३८ साली रविशंकर यांनी नृत्य करणे बंद केले व प्रख्यात वादक अल्लाउद्दिन खां यांचे शिष्यत्व पत्करून ते त्यांच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीत शिकू लागले. सहा वर्षांनी त्यांनी स्वतःचे सतारवादनाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्या सुमारासच त्यांनी 'धरती के लाल' व 'नीचा नगर' या हिंदी चित्रपटांना संगीतही दिले. विभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या 'पाथेर पांचाली' या कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याचे जेव्हा राय यांनी ठरवले, तेव्हा काही गोष्टी त्यांच्या मनात पक्क्या होत्या. एक म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना शक्यतो नवे चेहरे घ्यायचे होते. दुसरे म्हणजे चित्रपटाचे चित्रण बव्हंशी बाह्य लोकेशन्सवर करावयाचे होते व लोकप्रिय चित्रपटांचा कसलाही मालमसाला त्यांना चित्रपटात ४५४ निवडक अंतर्नाद वापरायचा नव्हता. चित्रपटासाठी संगीत आवश्यक आहे असे त्यांचे मत होते; पण हे संगीत लोकप्रिय बंगाली किंवा हिंदी चित्रपयसारखे गाण्यांना महत्त्व देणारे नको होते. (खरे तर त्यांची चित्रपटातील संगीताबद्दलची मूळ कल्पना काही निराळीच होती. त्यांनी लिहिले आहे, 'माझ्या चित्रपटाचा मी जर एकटाच प्रेक्षक असतो तर मी चित्रपयत संगीत वापरलेच नसते. संगीत हा एक बाह्य घटक आहे व त्याच्याशिवाय चित्रपट करता आला पाहिजे.' परंतु इतके 'बंडखोर' होणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते, चित्रपट ही कला असली तरी तो व्यवसायही आहे, व त्यात पैसे गुंतवणाऱ्यांचा विचार करणे आवश्यक असते अशीही त्यांची धारणा होती.) चित्रपटातील प्रसंगांच्या मूडला मिळतेजुळते आणि प्रसंगांचा प्रभाव वाढवणारे संगीत त्यांना हवे होते व त्यासाठी त्यांच्या डोळ्यांसमोर प्रथम रविशंकर हेच नाव आले. “My years with Apu' या आठवणींच्या पुस्तकात सत्यजित राय यांनी या संदर्भात लिहिले आहे, "पाथेर पांचालीचे चित्रण जवळजवळ पूर्ण झाले होते व आता पार्श्वसंगीताचा विचार करणे आवश्यक होते. मी रविशंकर यांची निवड केली, कारण एक तर मी व्यक्तिशः त्यांना ओळखत होतो व दुसरे म्हणजे त्यांची सतार मला आवडत होती. या सतारीचा चित्रपटात चांगला उपयोग करून घेता येईल, असे मला वाटले. रविशंकर त्यावेळी दिल्लीला राहत होते. मी त्यांना पत्र लिहून त्याबद्दल विचारले. त्यांनी आनंदाने संगीत देण्यास संमती दिली. मला त्यांची गरज अंदाजे केव्हा लागेल हे मी त्यांना कळवले व त्यावेळी ते उपलब्ध आहेत असा त्यांचा निरोप आला. " रविशंकर यांनी 'स्मृती' नावाचे (बंगाली) आत्मचरित्र लिहिले आहे. त्यांत सत्यजित रायबद्दल ते लिहितात, "जगातील अनेक चित्रपट दिग्दर्शकांचा मी उल्लेख केला आहे पण त्यात आपल्या सत्यजित राय यांचे स्थान वेगळे आहे त्यांच्या पहिल्या चार चित्रपटांना मी संगीत दिले आहे. एका अर्थाने आम्ही दोघेही बरोबर वाढलो. त्यामुळे त्यांच्याविषयी विचार करताना मी भावुक होतो. माझ्या मनात त्यांच्याविषयी जिव्हाळ्याच्या भावना आहेत व एक हळवा कोपराही आहे त्यामुळे मी त्यांच्याबद्दल व्यक्तिनिरपेक्ष मत देऊ शकत नाही. त्यांच्या 'पाथेर पांचाली'ने माझ्यावर उमटवलेला ठसा मी विसरू शकत नाही. "१९५१ किंवा १९५२ सालची गोष्ट आहे. मी कलकत्त्याच्या ज्ञानप्रकाश घोष यांच्या घरी उतरलेलो असताना सत्यजित बाबू मला भेटायला आले. आम्ही दोघे एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होतो. मला त्यावेळी हेही माहीत होते की सत्यजित 'पाथेर पांचाली' या कादंबरीवर एक चित्रपट निर्माण करत आहेत. जवळजवळ दोन वर्षांपासून ते या कामात गुंतले आहेत व या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान त्यांना असंख्य अडचणी आलेल्या आहेत. त्यांची जिद्द मला जाणवली. एकानंतर एक चमत्कारिक अडथळ्यातून मार्ग काढण्याचा ते प्रयत्न करत होते. काही गोष्टींची मला माहिती दिल्यानंतर ते म्हणाले, 'या चित्रपटाला तुम्ही पार्श्वसंगीत द्यावे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा नक्की वादेल, "