पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चित्रकार हसैन : एक आठवण अरुण डिके एम. एफ. हुसैन यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा एक चित्रकार सहज म्हणून इंदूरमधील एका जुन्या मित्राकडे साध्या रिक्षातून जातो, मित्र भेटला नाही म्हणून वेळात वेळ काढून दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो आणि पुढचे दोन तास अगदी घरचाच माणूस म्हणून वावरतो त्या प्रसंगाची ही रसाळ आठवण. जवळजवळ २१ वर्षे लोटली त्या गोष्टीला. डिसेंबर १९९०च्या तिसऱ्या आठवड्यात चित्रकार मकबूल फिदा हुसैन इंदूरात होते. त्यावेळी सेंट रेफियल स्कूलमध्ये त्यांचा अमृतमहोत्सव साजरा झाला होता. २० डिसेंबरच्या संध्याकाळी इतर कामे आटोपून मी, माझी बायको व मधली मुलगी त्रिवेणी (वय २०) घरी परतलो. माझा सर्वात धाकटा मुलगा अभिराम (वय १६) हॉलमध्ये एकटाच अभ्यास करत बसला होता. आल्या आल्या तो मला म्हणाला, "पापा, हुसैन अंकल आए थे” आमचे एक पारिवारिक मित्र मझहर महम्मद हुसैन इंदूरला लोकसेवा आयोग (पी. एस. सी.) चे सदस्य होते. अधूनमधून ते भेटायला घरी यायचे. आम्हांला वाटले तेच आले असतील. "सोबत अंटीपण आली होती का?” हिने विचारले. "अग आई, आले होते ते आपले हुसैन अंकल नाही, ते, पेंटर... उंच उंच पांढरी दाढी, लांब केस, हातात ब्रश... ते आले होते. बरोबर आपले शाहीद अंकलपण होते.” माझा पत्रकार मित्र शाहीद मिर्झा त्यावेळी हुसैन साहेबांचे चरित्र लिहीत होता. "क्यों रे, मैं ही मिला सुबह से तेरे को बेवकूफ़ बनाने" मी अभिरामला हसत विचारले. "कसम पापा, काकू को ऊपर जाकर पूछलो” अभिराम गळ्याची शपथ खात बोलला, मी लगेच वर सुशीलावहिनींना (माझे वडील बंधू ऊर्फ बाबांच्या पत्नी) विचारायला गेलो. "हो, ते आले होते बाबांना भेटायला म्हणाले, उद्याच सकाळच्या विमानाने मुंबईला परतायचे आहे,” वहिनी म्हणाल्या, मी हिरमुसला चेहरा करून खाली आलो. मन खट्टू झाले होते. वाटले, की एवढा मोठा कलाकार घरी येऊन गेला अन् आम्हांला कळलेसुद्धा नाही. नेहमीप्रमाणे बाबापण जेवण झाल्यावर रात्री गप्पा मारायला खाली आले. त्यांनापण वाईट वाटले. आम्ही ठरवले, की हुसैन साहेबांना एक दिलगिरीचे पत्र लिहून सकाळी विमानतळावर जाऊन त्यांना द्यायचे, सकाळी हिने मला पत्राची आठवण करून दिली. मी तयारी करणार इतक्यात फोन वाजला. त्रिवेणीने फोन घेतला, फोन शाहीदचा होता. त्रिवेणी त्याच्यावर जाम भडकली, पण लगेच "क्या सच?” म्हणत तिने फोन ठेवला आणि म्हणाली, "पंधरा मिनियत ते परत आपल्या घरी येत आहेत. " झाले, आमची धावाधाव सुरू झाली. बरोबर पंधरा मिनिटांनी आमच्या घरासमोर एक ऑटोरिक्षा थांबली, सडसडीत बांध्याचे, धवल दाढी व केशरचना असलेले हुसैन साहेब रिक्षातून खाली उतरले. त्यांना पाहताच मोहल्ल्यातले लोक गोळा झाले. आमच्यासमोर राहणाऱ्या मेहता वकिलांच्या वडिलांनी तर कंबरेला टॉवेल गुंडाळलेल्या स्थितीत धावत येऊन हुसैन साहिबांशी हस्तांदोलन केले. "मैं केवल १० मिनिट बाबासाहब को मिलने आया हूँ। एक गिलास पानी भी नहीं लूँगा ।" माझ्या बायकोच्या व त्रिवेणीच्या नमस्काराला उत्तर देत हुसैन साहेब हसत म्हणाले व झपझप पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर बाबांना भेटायला गेले. पायऱ्यांवरच बाबांनी त्यांचे नमस्काराने स्वागत केले. "क्या चल रहा है बाबा साहब?” हुसैन साहबांनी बाबांचा खांदा थोपटत विचारले. "हिन्दू-मुसलमानों के हाल ही में हुए दंगों पर एक नाटिका लिखकर दे रहा हूँ इन्दौर युनिवर्सिटी को।” हुसैन साहेबांना खुर्ची देत बाबा म्हणाले. " नहीं नहीं, कुर्सी पर आप बैठिये, मैं यहाँ पलंग पर बैठकर आपका स्केच बनाऊँगा, और हां, आप सुनाइये क्या लिखा है?” पलंगावर आरामात बसून मागे भिंतीला टेकत हुसैन म्हणाले. बाबा वाचू लागले ( खून से सनी तलवार लेकर उसने प्रवेश किया और बोला ) 'एक झटके में दो की गर्दन उड़ा दी ।' 'जीयो प्यारे । लेकिन जिनको मारा वो मुसलमान ही थे ना?' 'ये किसने देखा? हम तो भैय्या सच्चे धर्म निरपेक्ष है..' निवडक अंतर्नाद ४५