पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ताजमहाल हॉटेलसाठी केलेला जमशेटजी टाटा यांचा संगमरवरी पुतळा शक्तिमान अशी प्रतिमा त्यांनी समर्थपणे साकार केली आहे. ही प्रतिमा लहान आकाराची स्केच स्वरूपाची आहे. पण त्यातूनही त्यांच्या गुणवत्तेची झलक प्रत्ययाला येते. अशी बरीच त्रिमित स्केचेस त्यांनी, 'स्वान्तसुखाय' म्हणून केली. परंतु या ऊर्मींना पूर्णत्वाचे लेणे क्वचितच लाभले. त्यामागे व्यावहारिक कारणे असणार, कामासाठी पुरेशी मोठी जागा नसणे, त्या शिल्पांना मागणी असणे इत्यादी. त्यासाठी मागणी यायला त्या शिल्पाकृती रसिकांसमोर यायला पाहिजेत. परंतु भिडस्त स्वभावामुळे त्यांना ते अवघड वाटायचे. काही तत्त्वे निकराने जपण्यामुळे, नुकसान थोडेफार झालेच. त्यांचा नावलौकिक मर्यादित राहिला ही त्यांच्या निकटवर्तीयांची भावना आहे व ती योग्यही आहे. सार्वजनिक ठिकाणच्या काही खास शिल्पाकृती शिल्पकार मांजरेकरांचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी टर्मिनस) या महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूच्या घुमटावर डौलदारपणे उभ्या असलेल्या प्रगती देवतेच्या' चेहऱ्याशी जोडलेले आहे, हे कलाक्षेत्राखेरीज अन्य कोणाला फारसे माहीत नाही. ब्रिटिशांची राजवट असताना हे टर्मिनस अस्तित्वात आले. गॉथिक शैलीतील या देखण्या वास्तूचे बांधकाम दहा वर्षे सुरू होते. १८८७ मधे ते पूर्ण झाले. प्रगतीचे प्रतीक असणाऱ्या तेथील देवतेच्या उजव्या उंचावलेल्या ह्यतात मशाल आहे तर डाव्या हातात परिभ्रमण करणारे चाक आहे हे शिल्प ग्रीक अँटिकच्या धाटणीचे आहे. ४६२ • निवडक अंतर्नाद १९६९च्या जूनमधे झालेल्या तुफानी पावसात त्यावर वीज कोसळली आणि ती पाषाणमूर्ती भंगली. दुसऱ्या दिवशी ती तुकडा पडलेली मूर्ती लक्षात येताच एकच खळबळ उडाली. तर्कवितर्कांना उधाण आले. मध्य रेल्वेने ती मूर्ती पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. पण उंचावरील घुमटाच्या टोकाला असणारी मूर्ती दुरुस्त करणे, हे मोठे आव्हान होते. तिचे शिर ते छातीपर्यंतचा भाग धडावेगळा झाला होता, ते अवघड, गुंतागुंतीचे काम करण्यास देशभरातून कोणी शिल्पकार धजावले नाही. जे एक दोन जण पुढे आले, त्यानी दोन लाखांपर्यंतचे बजेट दिले. मांजरेकरांच्यातील पाषाणशिल्पीला राहवले नाही. सोळा फूट उंचीच्या मूर्तीचे शिर पूर्ववत करण्याची जबाबदारी स्वीकारणे म्हणजे शिवधनुष्य पेलणेच होते. ते त्यांनी लीलया पार पाडले. हे काम ते नोकरी करत असणाऱ्या जे. जे. स्कूलमधे झाले. विद्यार्थ्यांनाही त्यात सहभागी केले. आधीच्या मूर्तीसारखे, त्याच शैलीतील पण नवा चेहरा, ह्यत असणारे अर्धेमुर्धेच पाषाणशिल्प करणे आणि जोडल्यावर तेथे त्या सांध्यावर असणारे तपशील एकमेकांशी जुळून ते एकसंध दिसणे, यासाठीचे पराकोटीचे कौशल्य, कल्पकता, अचूक मोजमापे व माध्यमावरील प्रभुत्व त्यांच्याकडे होते. ही घटना त्याचे द्योतक आहे काम पूर्ण झाले. त्यानंतर रेल्वेचे इंजिनिअर्स, स्वतः शिल्पकार, विद्यार्थी यांनी महत्प्रयासाने ते तेथे चढविले. या कामाचे केवळ साडेचारहजार रुपये त्यांनी घेतले. मनात येते, हे काम मांजरेकर यांनी स्वीकारल्यावर, त्या शिल्पाकृतीच्या तपशिलांचे रेकॉर्ड, ब्रिटिशकालीन असल्याने त्यांना उपलब्ध झाले असणार, पण स्वातंत्र्योत्तर काळात, व्ही. व्ही. मांजरेकरांच्या या मोलाच्या कार्याचे तपशील सरकारी खाक्यानुसार उपलब्ध असण्याची शक्यता अगदीच कमी. हा अर्धामुर्धा पुतळा साकारणे व तो त्या अवघड जागी चढविणे यात पेच, थरार असतील, पण त्याची वर्णने लेखांतून, मुलाखतीतून शब्दबद्ध झाल्याचे ऐकिवात नाही. त्यावेळी आजच्यासारखी प्रसारमाध्यमे नव्हती. टी. व्ही अस्तित्वात नव्हते. तेव्हाच्या वर्तमानपत्रात पुतळा मोडल्याची व नंतर तो पुन्हा उभा केल्याची वृत्ते होती, असे ऐकले. पण आपल्या खाक्यानुसार त्यात शिल्पकाराचे नाव आले असेल, असे वाटत नाही. सर्वसाधारणपणे शिल्पकारांकडे पौराणिक व ऐतिहासिक व्यक्तिरेखा, राष्ट्रपुरुष, संत-महंत, आध्यात्मिक गुरू, पुढारी, उद्योजक अशांचे पुतळे करण्याची कामे असतात. त्याप्रमाणे मांजरेकर यांनीही बरेच पुतळे प्लास्टर, ब्रॉन्झ, पाषाण इत्यादी माध्यमांत केले. उदा: जिजाबाई - शिवबा पुण्यातील वाडिया कॉलेजचे संस्थापक कुस्रो वाडिया यांचा संगमरवरी अर्धपुतळा, मुंबईतील ताजमहाल हॉटेलसाठी केलेला जमशेटजी टाटा यांचा संगमरवरी पुतळा, बजाज हाउससाठी साकार केलेला जमनालाल बजाज पुतळा इत्यादी. हे पुतळे काहींनी बघितलेही असतील. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा कास्य धातूतील नऊ फूट उंचीचा पुतळा तेथील कलंगुटच्या किनारी स्थापन झाला. या पुतळ्याचे काम