पान:निवडक अंतर्नाद.pdf/४६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिल्पसाद २०१८-१९ स्टुडिओत केले. ते बघण्यास मा. तेथे जात असत. बांद्र्याच्या कलानगरमधील त्यांचे स्नेही प्रल्हाद धोंड यांच्या बाळासाहेब ठाकरे वरचेवर मांजरेकर यांच्या शिल्पकृतींचे जे. जे. स्कूलमधील प्रदर्शन स्वामी नित्यानंद हे गणेशपुरी आश्रमाचे संस्थापक, तेथे १९७२ मधे स्थापन झालेले त्यांचे शिल्प हे व्यक्तिशिल्पकलेचा उत्तम नमुना मानला जातो. नित्यानंदांचा चेहरा, शरीरयष्टी हुबेहूब आहेतच, शिवाय चेहरा बोलका आहे. तसेच त्वचेचा पातळ तरीही सुरकुतलेला पोत, छातीवरचे केस यांत विशेषत्वाने प्रत्ययाला येतात. चेहऱ्याची त्वचा, केशविरहित माथ्याची त्वचा, उघड्या अंगाची त्वचा यांत असणारा पोताचा (टेक्सचर) फरक लक्षणीय आहे हा पुतळा त्यांनी हाजीअली येथील आपल्या राहत्या गव्हमेंट क्वार्टर्समधे केला. जे. जे. स्कूलमधे नोकरीसाठी जाण्यास त्यांना सकाळी साडेसातला घराबाहेर पडावे लागे. त्यामुळे गणेशपुरी आश्रमातील संबंधित व्यक्तींना त्यांची अट होती, की काम बघायचे असल्यास सकाळी सातपर्यंत इथे पोचावे लागेल. ती मंडळीही त्यांची वेळ पाळत. हा पुतळा झाल्यावर तेथून तो वाजतगाजत मिरवणुकीने गणेशपुरीपर्यंत नेला गेला. त्यात सुमारे एक हजार स्वामिभक्त सामील होते. याशिवाय अमेरिका, हवाई, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान व इंग्लंड येथील प्रमुख शहरांतील मठांमधे महाराज / स्वामी यांचे मांजरेकर यांनी केलेले पुतळे आहेत. अशा 'कमिशन्ड वर्क बरोबर त्यांनी 'स्वान्तसुखाय' केलेली व्यक्तिशिल्पे म्हणजे यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, गानतपस्वी मोगुबाई कुर्डीकर इत्यादी. TOTTE SCOOLED व्ही. व्ही. मांजरेकर व्यक्तिशिल्पांसाठी सुरुवातीचे जे आर्मेचर (माती थापण्यापूर्वीचा सांगाडा) करीत, तो अचूक असे. त्या प्राथमिक टप्प्यातील बांधणीतूनच व्यक्तीच्या शरीराच्या ठेवणीचा अंदाज यायचा शिल्पकामाची आपली काही हत्यारे ते स्वतःच तयार करीत. मातीकामात अंगठ्याचा वापर बराच केला जातो. त्यासाठीचे हत्यार त्यांनी केले होते. मातीकामाच्या टप्प्यानंतरच्या धातूकामातही ते जातीने लक्ष घालत, संगमरवर माध्यमासाठी त्याकाळात, आज उपलब्ध असणारे ग्राइंडर अस्तित्वातच नव्हते. ते छिन्त्री हातोडीने लहान मोठे आकार स्वतः करीत. छिन्नी- हातोडी वापरण्याची काही तंत्रे, खुब्या त्यांनी स्वानुभवातून प्राप्त केल्या. बारीक कलाकुसरीच्या कामात ते माहीर होते. कारागिरांची मदत कधीही घेत नसत. पुढ्यातील संगमरवर शिल्पकामाला योग्य आहे का, त्याला कुठे आतमधे चीर नाही ना, हे त्यावर हातोडीचा हलका आघात करून, त्या केवळ आवाजावरून ते ओळखायचे. त्या टीप्स त्यांनी उत्सुक विद्यार्थ्यांना शिकवल्याही. स्वामी नित्यानंद - गणेशपुरी आश्रमाचे संस्थापक निवडक अंतर्नाद ४६३