पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"क्या बात है - बाबा साहब क्या बात है!” बाबांना टाळी देत हुसैन म्हणाले. एव्हाना माझी बायको एका मोठ्या प्लेटमध्ये काजू, गजक व एक ग्लास दूध घेऊन वर आली होती. गजक पाहताच हुसैन साहेबांचे डोळे लकाकले. "अरे वा! ये तो पूरी प्लेट मैं ही चाट जाऊँगा।" गजकचा तुकडा चघळत हुसैन साहेब म्हणाले. त्यांचे स्केच काढणे व बोलणे चालू होते. त्रिवेणी कॅमेऱ्याने त्यांचे फोटो काढत होती. दहा मिनिटांसाठीच म्हणून आलेले हुसैन साहेब चांगले दोन तास आमच्या घरी होते. इतकेच नव्हे तर जाताना त्यांनी त्रिवेणीला विचारले, "क्यूं, मेरे आटोग्राफ नहीं चाहिए?” त्रिवेणी तर इतकी भांबावून गेली की, "ठहरिये, ठहरिये" To Treweni हसन zuz these 21.x11.90 ४६ • निवडक अंतर्नाद बोलत खाली पळाली आणि वर येऊन एअर इंडियाची हाती मिळाली ती एक डायरी तिने हुसैन साहेबांसमोर ठेवली. हुसैन साहेबांनी तिच्यातल्या समोर उघडलेल्या पानावर अक्षरशः दोन मिनिटांत त्यांचा आवडता घोडा काढला व आपली सही दिली (सोबतचे चित्र). त्यांनी कला महाविद्यालयात नुकत्याच काढलेल्या गणपतीच्या चित्राबद्दल मी त्यांना विचारले, की गणपतीचे चित्र का काढले? माझ्या खांद्यावर हात ठेवत ते शांत स्वरात म्हणाले, "मुझे दिनभर में कई पेंटिंग्ज करने थे और मैं मेरे काम की शुरुवात गणेश जी से करता हूँ।” (ऑक्टोबर २०११)