पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इकॉनॉमीचा) नियम, सांस्कृतिक वैचारिक क्षेत्राला सरसकट लागू पडत नाही. सामाजिक उपयुक्ततेच्या अनेक गोष्टी शेवटी प्रयत्नपूर्वकच टिकवाव्या लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर अंतर्नादच्या भावी वाटचालीचा विचार करताना एक गरज प्रकर्षाने जाणवते. - ती म्हणजे अंतर्नादची संस्थात्मक पातळीवर व्यावसायिक (प्रोफेशनल ऑर्गनायझेशन म्हणून) उभारणी करणे जे मला स्वतःला दुर्दैवाने कधीच जमू शकले नाही आणि भविष्यातही कधी ते जमणे आज तरी कठीण दिसते. एके काळी तर या प्रकारच्या उभारणीला माझा विरोधच होता. मासिकनिर्मितीला प्राणभूत असलेली व्यक्तिगत प्रतिभा आणि ऊर्जा अशा उभारणीत मंदावू शकते, आटूही शकते; या भीतीपोटी आजही ती भीती आहेच; पण आजच्या काळात अशी मासिके टिकवायची असतील तर अशा उभारणीला पर्याय नाही, असे आता वाटते. दरमहा काहीतरी दर्जेदार वाचायला मिळेल, समाधानकारक व्यावहारिक सेवा मिळेल या अपेक्षेने अनेक चोखंदळ वाचक आज अंतर्नादकडे पाहतात. ही जाणीव म्हटले तर सुखद आहे; आणि म्हटले तर अस्वस्थ करणारीही आहे या अपेक्षांना एखादा एकखांबी तंबू कितपत पुरा पडणार ? शिवाय या व्यक्तीचे स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रमही काही वर्षांनी बदलू शकतात. आर्थिकदृष्ट्या अंतर्नादची उलाढाल (टर्न ओव्हर) खूपच कमी असली, तरी मासिकाचे संपादकीय आणि व्यावहारिक काम (नीट काळजीपूर्वक करायचे असेल तर) खूप किचकट, वेळखाऊ व मुख्य म्हणजे मानसिक शीण देणारे असते. हे सगळे दीर्घकाळ करायचे असेल तर उत्तम व्यावसायिक यंत्रणा उभारायलाच हवी. घरातच कार्यालय ठेवणे, सजावट-रंगीत छपाई टाळणे, जास्तीत जास्त काम स्वबळावरच रेटायचा प्रयत्न करणे हे सगळे सध्याचे अंतर्नादचे उपाय फार काळ चालू शकत नाहीत. शिवाय 'कसे तरी' मासिक चालू ठेवायचे, यात काय स्वारस्य ? सुसज्ज कार्यालय, संपादकीय व व्यावहारिक कामासाठी बऱ्यापैकी पगार असणारी तीन चार कुशल माणसे ही अशा मासिकाच्या दृष्टीने चैन नसून आवश्यकता आहे. व्यावसायिकदृष्ट्या केवळ एका मासिकाच्या प्रकाशनासाठी ही यंत्रणा पोसणे अव्यवहार्य आहे व म्हणून अशी यंत्रणा त्याच आस्थापना - खर्चात (ओव्हरहेड्समध्ये) इतरही काही पूरक गोष्टी कदाचित करू शकेल उदाहरणार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम- व्याख्याने साहित्यचर्चा यांचे आयोजन - पण त्या यंत्रणेचा 'फोकस' मासिक हाच असायला हवा. पण हे सगळे करायला मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ लागेल. तेही फायद्याची अपेक्षा न ठेवता दिले गेलेले. आणि असे मासिक चालवणे हा मूलतः श्रेयविहीन (थँकलेस) प्रयत्न आहे, याचीही स्वतः पुरती पूर्ण जाणीव ठेवूनच हे काम करावे लागेल. ४७० निवडक अंतर्नाद एव्हरेस्ट मोहिमेसाठी आज लाखो रुपये उभारता येतात; पांढऱ्या वाघांच्या रक्षणासाठी काही कोटीही उभारता येतात. मराठीच्या संदर्भात बोलायचे तर साहित्यसंमेलनासाठी दरसाल पंचवीस लाख शासनातर्फे अनुदान मिळते; याहून कितीतरी अधिक रक्कम दरसाल इतरही प्रायोजकांकडून उभारली जाते. अगदी मराठी चित्रपटासाठीही शासनातर्फे प्रत्येकी पंधरा ते वीस लाख रुपये अनुदान मिळते. पण एखाद्या चांगल्या मराठी मासिकासाठी मात्र असे पाठबळ मिळणे कठीण आहे. पण असे मासिक पुन्हा उभे करणेही सोपे नाही. या बाबतीत अन्य जगातला अनुभव काय आहे? अमेरिकेत आज जवळपास शंभर छोटी-छोटी नियतकालिके प्रसिद्ध होतात. त्यांना The Little Magazines' असेच म्हणतात. त्यांचा सरासरी खपही हजाराच्या आसपासच असतो. पण त्यांचे महत्त्व विचारात घेऊन वेगवेगळी विद्यापीठे - प्रतिष्ठाने यांतली बहुतेक नियतकालिके चालवतात. ही नियतकालिके टिकवणे ही एक सामाजिक जबाबदारी मानली जाते आणि 'आगाखान फाउंडेशन' पासून 'रॉकफेलर फाउंडेशन पर्यंत अनेक प्रतिष्ठाने ( खूपदा विविध व्यक्तीसुद्धा) त्याबाबतीत पुढाकार घेतात. केवळ व्यक्तिगत मालकीची असली, तर असली छोटी नियतकालिके फार टिकत नाहीत; ज्यांना संस्थात्मक पाठबळ मिळते तीच दीर्घकाळ टिकतात. आधी उल्लेख केलेले 'Foreign Affairs' हे असेच एका प्रतिष्ठानाने पुरस्कृत केलेले त्रैमासिक 'Paris Review हे दुसरे एक उदाहरण, 'Writers At Work' सारखी जगप्रसिद्ध लेखमाला (जिचे नंतर कैक खंड प्रकाशित झाले) देणारे नियतकालिक हेच जॉर्ज प्लिम्टन (Plimpton) यांनी १९३५ साली पॅरिस येथे सुरू केलेले हे त्रैमासिक १९७२ पासून न्यूयॉर्कहून प्रकाशित होऊ लागले. पुन्हा एका प्रतिष्ठानाच्या साह्याने. संस्थात्मक पातळीवर अशी व्यावसायिक उभारणी अंतर्नाद कशी करू शकेल? व्यक्तिगत मालकी सोडून दिली तर ते अधिक सुलभ होईल का? अंतर्नाद दीर्घकाळ चालू राहावे या दृष्टीने वाचकांना काही सांगावेसे वाटते का? - असे काही प्रश्न आज समोर आहेत. आमच्या एका लेखक- स्नेह्यांना असे प्रश्न अंतर्नादने वाचकांपुढे मांडणे अनावश्यक व गैरही वाटते. त्यांच्या मते, "गि-हाईकाला दुकानदाराच्या चोपड्या पाहण्यात रुची नसते, त्याला फक्त चांगला माल मिळण्याशी मतलब असतो. " त्यांची ही भूमिका तशी 'प्रॅक्टिकल' वाटते, तरीपण अंतर्नादचे ( बऱ्याचशा ) वर्गणीदारांशी असलेले नाते दुकानदार ग्राहक या नात्यापेक्षा खूपच वेगळे आहे. म्हणूनच हे प्रकट चिंतन, बघू या यातून काय निघते ते. (ऑगस्ट २००५)