पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या दुसऱ्या फेरीला वाचकांचे अधिक व्यापक सहकार्य लाभले. या फेरीत एकूण १८२ वाचकांनी आपली निवड कळवली. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर पर प्रांतांतून व परदेशांतूनही पत्रे आली. अशा प्रकारच्या उपक्रमांना आजकाल लाभणाऱ्या वाचकसहभागाच्या पार्श्वभूमीवर वाचकांचा हा प्रतिसाद उत्तम म्हणावा लागेल. वीस पुस्तकांची अंतिम यादी पुढीलप्रमाणे : (त्या-त्या पुस्तकाच्या अंकातील परीक्षणकर्त्याचे नाव कंसात दिले आहे.) कादंबरी (५) २. १. श्यामची आई / साने गुरुजी (विलास खोले) रणांगण / विश्राम बेडेकर (चंद्रकांत बांदिवडेकर) बनगरवाडी / व्यंकटेश माडगूळकर (विजय पाडळकर) ४. ययाति / वि. स. खांडेकर (सु. रा. चुनेकर) ३. ५. कोसला / भालचंद्र नेमाडे (संजय भास्कर जोशी) कथा (४) ६. चिमणरावाचे चऱ्हाट/ चिं. वि. जोशी (गो. मा. पवार ) कळ्यांचे निःश्वास / विभावरी शिरूरकर (यास्मिन शेख) तलावातले चांदणे / गंगाधर गाडगीळ ( सुधा जोशी) ९. काजळमाया / जी. ए. कुलकर्णी (द. भि. कुलकर्णी) ७. ८. नाटक (१) १०. सखाराम बाईंडर / विजय तेंडुलकर ( रमेश धोंगडे ) कविता (४) ११. संपूर्ण केशवसुत / केशवसुत (कल्याण काळे) १२. विशाखा / कुसुमाग्रज ( लीला दीक्षित) १३. मर्ढेकरांची कविता / बा. सी. मर्ढेकर (वसंत पाटणकर) १४. मृद्गंध / विंदा करंदीकर ( नीलिमा गुंडी) समीक्षा (१) १५. युगान्त / इरावती कर्वे (राम शेवाळकर) चरित्र/आत्मचरित्र (३) १६. स्मृति-चित्रे / लक्ष्मीबाई टिळक (पुष्पा भावे) १७. बलुतं / दया पवार ( रावसाहेब कसबे ) १८. आहे मनोहर तरी.../ सुनीता देशपांडे (मिलिंद जोशी) संकीर्ण (२) १९. व्यक्ती आणि वल्ली / पु. ल. देशपांडे (मंगला गोडबोले) २०. माणसं! / अनिल अवचट (वि. शं. चौघुले) ४७४ निवडक अंतर्नाद निवडीबाबतची काही निरीक्षणे सर्वप्रथम जाणवते ती निवडल्या गेलेल्या पुस्तकांमधली प्रचंड विविधता, प्रत्येक पुस्तकाचा घाट वेगळा, आशय वेगळा, सौंदर्य वेगळे, श्यामची आई ते सखाराम बाईंडर आणि युगान्त ते बलुतं ह्य विशाल कॅनव्हास कुठल्याही भाषेला अभिमानास्पद वाटावा असाच आहे. साहित्यसृष्टीतील विविध स्तरांचे, अभिरुचीच्या विविध पैलूंचे प्रतिबिंब या निवडीत पडलेले दिसते. ही निवड म्हणजे या पुस्तकांना मिळालेला रसिकांचा पुरस्कारच आहे. इतर पुरस्कारांपेक्षा हा रसिक पुरस्कार अधिक उचित वाटतो. उदाहरणार्थ, साहित्य अकादमी पुरस्कार भालचंद्र नेमाडेंना 'टीकास्वयंवर' साठी वा गंगाधर गाडगीळांना 'एका मुंगीचे महाभारत' साठी मिळाला असला तरी रसिकांच्या मनामध्ये ते लेखक 'कोसला' वा 'तलावातले चांदणे यांच्याशीच अधिक जोडलेले आहेत. वीस लेखकांपैकी चार स्त्रिया आहेत: विभावरी शिरूरकर (मालती बेडेकर), इरावती कर्वे, लक्ष्मीबाई टिळक व सुनीता देशपांडे. यादीत दोन जोडप्यांचा समावेश आहे: विश्राम बेडेकर व मालती बेडेकर, पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे, ● वीसापैकी सहा लेखक आज हयात आहेत- सर्व साठीपुढचे: भालचंद्र नेमाडे, गंगाधर गाडगीळ, विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, सुनीता देशपांडे व अनिल अवचट सर्व पुस्तके १९१७ ते १९९० या कालखंडातली आहेत. ('केशवसुतांची कविता' १८८५ ते १९०५ च्या दरम्यान लिहिली गेली असली तरी पुस्तकरूपाने ती प्रकाशित झाली तेव्हा १९१७ साल उजाडले होते. 'आहे मनोहर तरी... ' ची प्रथमावृत्ती १२ जून १९९०ची आहे.) पुस्तकाचे यथार्थ मूल्यमापन होण्यासाठी किमान काही वर्षे उलटावी लागतात याचे भान निवडकर्त्यांनी राखलेले दिसते. ह. ना. आपटे यांचे 'वज्राघात' व ना. सी. फडके यांचे 'दौलत' ही दुसऱ्या यादीतील दोन्ही पुस्तके तशी खूप • गाजलेली व दीर्घकाळ टिकलेली, पण अंतिम निवडीत त्यांना सर्वांत कमी वाचकांची पसंती मिळाली. ● दुसऱ्या यादीतील ५० पुस्तकांमध्ये सर्वांत अलीकडची पुस्तके होती सदानंद देशमुख यांचे 'बारोमास' (२००२) व दासू वैद्य यांचे 'तूर्तास...' (२००३). परंतु अंतिम फेरीत ती मागे पडली, वाचकांना सगळे नवे नवेच हवे असते, असे दिसत नाही. या यादीतील पुस्तकांची वाचकपसंतीनुसार पुन्हा क्रमवारी लावायची आवश्यकता भासत नाही. सर्वच वीस पुस्तके श्रेष्ठ म्हणता येतील अशी आहेत एवढेच.