पान:निवडक अंतर्नाद.pdf/४७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छेडले असते तर किती भयानक परिस्थिती उद्भवली असती - मध्य प्रदेशात, उत्तर प्रदेशात, दिल्लीत? पडद्यावरच्या प्रतिमा मोठ्या अद्भुत असतात. बघता बघता आपल्याला कुठून कुठे घेऊन जातात. एकूणच, आपल्या मनात ठसलेल्या अनेक प्रतिमा या वास्तवापेक्षा खूपच वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, 'बॉम्बस्फोट' हा अतिरेक्यांच्या संदर्भात सर्रास वापरात येणारा शब्द घ्या. आता बॉम्बस्फोट म्हटला, की माझ्या डोळ्यांपुढेतरी पटकन उभी राहणारी प्रतिमा म्हणजे आगीचा अन् धुराचा मशरूमच्या आकाराचा एक प्रचंड लोट, हिरोशिमा- नागासाकीसारखी बेचिराख झालेली शहरे, हजारो प्रेतांचा खच, क्वचित केव्हातरी एखाद्या युद्धात घडणारा उत्पात, पण अलीकडे 'दोन ठार, तीन जखमी' झाले तरी टीव्हीवरच्या 'ब्रेकिंग न्यूज'च्या दृष्टीने तो 'प्रचंड बॉम्बस्फोट च असतो, आणि त्याने सगळे शहर 'हादरलेले' असते! 'युद्ध' हा प्रकार घ्या. अगदी लहानपणापासून माझ्या मनातली युद्धाची प्रतिमा मोठी रोमँटिक होती. त्या वेळच्या प्रभावी म्हणजे पुस्तकांतून माध्यमातून तयार झालेली. उभ्या- आडव्या फिरणाऱ्या तलवारी, उडणारी मुंडकी, रक्ताच्या चिळकांड्या, किंकाळ्या, वळलेल्या मुठी, डोळ्यांत फुललेला विस्तव, 'तोफेआधी मरे न बाजी सांगा मृत्यूला' म्हणणारा आवेश. पुढे पुढे ती प्रतिमा आधुनिक पण आणखीनच भडक बनली. तोफांचा धडधडाट, सुरुंगाचे स्फोट, आगीचे लोळ. मग नंतर केव्हातरी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याशी परिचय झाला. त्यांच्याशी आधुनिक युद्धाबद्दल गप्पा झाल्या. आपण आणि शत्रू प्रत्यक्षात कधीच असे आमनेसामने नसतो, तोफगोळे तर चांगले पंधरा-वीस मैलांच्या अंतरावरून फेकले जातात, त्यांचाही धडाडधूम असा अविरत वर्षाव ('बरसता अंगार) नसतो, दोन फायरिंग्ज्मध्ये खूपदा काही तासांचाही अवधी असतो, जवळजवळ सगळेच कॉम्प्युटर आणि लेझरवर ठरते, 'वर भिवई चढली दात दाबती ओठ, छातीवर तुटली पटबंदाची गाठ' असला काहीच प्रकार नसतो, वगैरे गोष्टी कळल्या; प्रतिमेपेक्षा वास्तव किती मवाळ मचूळ असते हे लक्षात आले, आणि 'युद्धं या प्रकारातले सगळे 'ग्लॅमर'च जणू नाहीसे झाले! - - पण चित्रपयत व टीव्हीवर दिसणारी युद्धाची प्रतिमा आजही पूर्वीइतकीच रोमँटिक आहे आणि लोकमानसात सामान्यतः तीच प्रतिमा ठसलेली असते. युद्धच कशाला, अगदी साधी मारामारीही घ्या. रायफलींमधला गोळ्यांचा वर्षाव, रक्तपात, स्फोट, आग हे सगळे त्यात असतेच, पण त्यानंतर प्रत्यक्ष हाणामारीही असतेच असते. खूपदा तर खलनायकाला गोळी घालून झटक्यासरशी सगळे संपवण्यापेक्षा बलदंड नायक स्वतःच्या हातातले पिस्तुल उगाचच फेकून देतो व प्रत्यक्ष हाणामारी सुरू करतो, लाथाबुक्के, पिळवटलेले चेहरे, रक्ताचे ओघळ हे सगळे खूप वेळ दाखवल्याशिवाय मारामारीला जणू पूर्णत्व येतच नाही. या सगळ्या ४७८ निवडक अंतर्नाद क्रौर्याला क्लोजअप्समुळे आणि जोरदार म्युझिकमुळे अधिकच उठाव दिला जातो. पडद्यावरचा गरबा आणि आजूबाजूच्या सोसायट्यांमधला आपण प्रत्यक्ष बघितलेला गरबा पडद्यावरची पार्टी आणि प्रत्यक्षातली, पडद्यावरची नातीगोती सणवार आणि प्रत्यक्षातले यांत जमीन अस्मानाची तफावत असते. स्टम्प्समध्ये छोटे मायक्रोफोन ठेवून आणि तोकड्या कपड्यातल्या मुली कॅमेऱ्याच्या कक्षेत पेरून केरी पॅकरने क्रिकेट कोट्यवधी दर्शकांसाठी 'आकर्षक' केले. तीच गोष्ट 'कॅन्ड ह्यूमर' ची प्री-रेकॉर्डेड हंशा- यळ्यांशिवाय टीव्हीवरचा विनोद आज रंगूच शकत नाही. संगीताच्या कार्यक्रमात डुलणारे, इतवारे करणारे, टाळ्या वाजवणारे श्रोते लागतातच; डोळे मिटून संगीताचा आस्वाद घेणारा रसिक आज टीव्हीवर कधी दिसणार नाही. सूक्ष्मता, सूचकता ही श्रेष्ठ कलाकृतीची वैशिष्ट्ये आजच्या प्रसारमाध्यमांनी केव्हाच हद्दपार केली आहेत. प्रत्येक गोष्ट भडक, बटबटीत करण्याच्या प्रयत्नात माध्यमे सर्रास अतिशयोक्ती करत असतात. संगीतस्पर्धांमधल्या वेगवेगळ्या स्पर्धकांना मिळणाऱ्या मतांचे आकडे हास्यास्पद वाटावेत इतके फुगवलेले असतात. आणि पुढच्या फेरीत सरकलेला प्रत्येक उमेदवार 'देशभर के करोड़ो दर्शकों को उनके ढेर सारे प्यार के लिए धन्यवाद' देतो तेव्हा वाटते त्याला कोणीतरी सांगावे, की 'करोड़ो देशवासीयांना' हा कार्यक्रम बघणे एवढाच एक धंदा नाही आहे! एखाद्या पादचाऱ्याला अगदी त्याच्याच चुकीने अपघात झाला असला तरी बातमीत मात्र 'भरघाव' जाणाऱ्या गाडीने त्याला 'उडवले' असते, आणि गाडीचालक एखादा बँकेतला क्लार्क असला तरी बातमीत मात्र तो 'धनदांडगा' असतो! अशा बेफाट अतिशयोक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे मागे गाजलेले भ्रष्टाचाराचे एक प्रकरण हा घोटाळा ३३,००० कोटी रुपयांचा आहे असे एकूणएक वृत्तपत्रांमधून व वाहिन्यांवरून सतत सांगण्यात येत होते. पुढे एकदा एका पोलीस अधिकाऱ्यांशी भेट झाली असता ते सांगत होते, " हा ३३,००० कोटीचा आकडा पत्रकारांनी कुठून व कसा पैदा केला तेच आम्हांला एक कोडं वाटतं, महाराष्ट्र सरकारचं स्टॅम्पपेपरविक्रीचं एकूण वार्षिक उत्पन्नच जेमतेम हजार कोटी आहे आणि बनावट स्टॅम्पपेपर छापायचा उद्योग फारतर वर्षभर चालला असेल. राज्यात विकला गेलेला अगदी प्रत्येक स्टॅम्पपेपर बनावट होता असं गृहीत धरलं - आणि ते अर्थात अशक्यच आहे - तरीही घोटाळ्याचा संभाव्य आकडा कितीतरी कमी येतो. मग हा इतका भरमसाट आकडा आणि तोही अगदी प्रत्येक बातमीमध्ये - आला कुठून?" ( या बातमीशी निगडित असो वा नसो, ३३ कोटी देव हाही असाच एक आकडा ! ) या प्रश्नाचे उत्तर 'दिला कोणीतरी दडपून' एवढेच असू शकते. अर्थात बातमी देण्यापूर्वी शहानिशा न करण्याची बेपवाई हाही त्या उत्तराचा एक भाग आहेच. मागे एकदा पोपनी अमेरिकेला भेट दिली तेव्हाचा एक ऐकीव किस्सा. 'न्यूयॉर्क विमानतळावर पोप उतरले' या घटनेत सनसनाटी