पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात यापेक्षा, तुम्ही पडद्यावर कसे दिसता, हेच आज अधिक महत्वाचे मानले जाऊ लागले आहे. पडद्यावर अधिक प्रभावी कसे दिसायचे याचे खास प्रशिक्षण आज पाश्चात्त्य राजकारणी घेतात. राजकारण्यांप्रमाणेच उद्योगपती, खेळाडू, कलावंत, लेखक, पत्रकार, व्यावसायिक अशा अनेकांना हे प्रशिक्षण घेणे उपयुक्त वाटते. आपल्याकडेही आता हा प्रकार रूढ होत आहे. कारण तुमची तुम्हांला हवी तशी प्रतिमा तयार करण्याचे, तुमची 'हवा' तयार करण्याचे माध्यमांचे सामर्थ्य प्रचंड आहे. अगदी शोकसभेला जातानाही पत्रकारांनी 'बाइट्स' घेतले तर, याचे भान ठेवूनच कपडे करणारे महाभाग आहेत. पुस्तकप्रकाशन असो की वर्धापनदिन खूप परिश्रमपूर्वक एखादा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यापेक्षा प्रसारमाध्यमांचा योग्य वापर केला, तर आज कितीतरी अधिक प्रसिद्धी मिळू शकते. हॉलमध्ये जेवढे पंखे तेवढेच श्रोते असले तरी चालते, व्यासपीठाचा फोटो तरीही पहिल्या पानावर झळकू शकतो. योग्य त्या व्यक्तींना पटवता आले पाहिजे, व्याप कमी, खर्च कमी, प्रसिद्धी मात्र भरपूर. माध्यमांना 'मॅनेज' करता येणे, मिडिया-सॅव्ही असणे, हे आज एक मोठेच कौशल्य मानले जाते. मध्यंतरी एका विख्यात पण विक्षिप्त चित्रकाराला मुंबईच्या एका प्रतिष्ठित क्लबने, तो अनवाणी आला आहे म्हणून, प्रवेश नाकारल्याची खळबळजनक बातमी पेपरात वाचली होती. त्यावर नंतर बरेच दिवस गरमागरम चर्चाही रंगली होती. पण मुळात, त्या क्लबचे नियम ठाऊक •असूनही, त्या चित्रकाराने तिथे अनवाणी का जावे, हा प्रश्न त्याला कोणीच विचारला नाही. शिवाय त्या प्रसंगाची 'बातमी' करायला नेमक्या त्या क्षणी तो पत्रकार तिथे कॅमेऱ्यासह हजर होता, हा निव्वळ 'योगायोग' म्हणायचा का? बरेचसे माध्यम व्यावसायिक या सगळ्याचे समर्थनच करतात, त्यांच्या मते, बातमी जर सनसनाटी नसेल, तर तिच्यात कोणालाच काही रुची असणार नाही एखाद्याने दगड मारून खिडकीची काच फोडली, तरच ती बातमी होते, तुम्ही ती काच पुन्हा नव्याने बसवता, तेव्हा ती मात्र बातमी नसते. किंवा कुत्रा माणसाला चावला, तर ती काही बातमी होत नाही, पण एखादवेळी माणूस कुत्र्याला चावला, तर ती मात्र लगेच मोठी बातमी होईल. थोडक्यात, जे नेहमीचेच आहे ती बातमी नव्हे, तर जे चाकोरीबाहेरचे (अॅबनॉर्मल) आहे, तीच बातमी होते. म्हणूनच, त्यांच्या व्यावसायिक विचारसरणीनुसार, भडक वा सनसनाटी असे काहीतरी बातमीत असणे हे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आवश्यक आहे. - मला वाटते, 'बातमी' शब्दाविषयीची आपली ही मूलभूत धारणाच बदलायला हवी. तिचा संबंध करमणुकीशी जोडू नये. समाजात महत्त्वाचे बदल घडवणाऱ्या घटना टिपणे हे जर बातम्यांचे, व म्हणून माध्यमांचे, मुख्य काम असेल, तर तशा घटना बहुतेकदा भडक वा सनसनाटी नसतात याची जाणीव ठेवायला हवी, किंबहुना ४८० निवडक अंतर्नाद त्या घटना म्हणजे चाकोरीतच दीर्घकाळ होत राहणाऱ्या असंख्य छोट्या-छोट्या प्रक्रियांचा एकत्रित परिपाक असतो. उदाहरणार्थ, लोकशाही मार्गाने सातत्याने होत राहिलेले देशातले सत्तांतर रेल्वे तिकीट आरक्षण यंत्रणेचे संगणकीकरण, दिल्ली मेट्रोचे बांधकाम, भारताने आयएमएफचे कर्ज मुदतपूर्व फेडणे. माहितीहक्काचा कायदा ग्रामपंचायतीत महिलांना एक तृतीयांश राखीव जागा निवडणूक आयोगाने किंवा दक्षता आयोगाने केलेली कायद्यातील उपलब्ध तरतुदींची प्रत्यक्षातली अंमलबजावणी, आयटी क्षेत्रातली प्रगती. सर्व शिक्षा अभियान, कन्याकुमारीला टाकलेले पोस्टकार्ड पन्नास पैशांत कोहिमाला पोचणे. उत्तम पीक काढून एखाद्या शेतकऱ्याने कर्जमुक्त होणे किंवा बांधकाम मजूराच्या मुलानी आयआयटीला प्रवेश मिळवणे यादेखील तशा महत्त्वाच्या घटना म्हणता येतील. अशा घटना, व त्यांमागची प्रक्रियास्वरूप कारणे, यांचा सातत्याने पाठपुरावा करत राहावा लागतो, तरच त्यांचे नेमके महत्त्व स्पष्ट होते जे माध्यमांचे मोठे योगदान असू शकते. मात्र त्यासाठी हे लक्षात घेतले पाहिजे, की अशा समाजात मूलगामी बदल घडवणाऱ्या घटनांचे नाते क्रांतीपेक्षा उत्क्रांतीशी अधिक असते. आणि त्यामुळे होणारा बदल हा बहुधा मांजरीच्या पावलांनीच येतो. बीजाचे रोपटे अन् कळीचे फूल कधीच दवंडी पिटवून होत नाही. सोमवारी, चार फेब्रुवारीला मुंबईतील दंगलीच्या बातम्या टीव्हीवर बघताना मला अचानक दिल्लीतला एक जुना प्रसंग आठवला. मागे एकदा दिल्लीत कॅनॉट प्लेसजवळ भाड्याने आणलेले 'निदर्शक' एका ट्रकमधून उतरताना बघितले होते. अधिक चौकशी केली असता कळले होते, की असे 'निदर्शक' पुरवणे हा एक धंदाच आहे. आणि मग मनात आले, 'दंगेखोर' ही असेच पैसे देऊन मिळवता येत असतील का? मुंबईतील एका बड्या कामगार नेत्याचा मागे खून झाला होता, तेव्हा चौकशीत बाहेर आले होते, की ज्याने प्रत्यक्ष चाकू खुपसला त्याला त्या कामाचे फक्त पाच हजार रुपयेच मिळाले होते. जिथे खुनाचीही सुपारी इतक्या स्वस्तात देता येते, तिथे पैसे देऊन 'दंगेखोर' का नाही मिळू शकणार? आणि चॅनेल्सचे फोटोग्राफर्स? काही पूर्वसूचनेशिवाय का ते चॅनेलवाले अगदी मोक्याच्या क्षणी, आणि तेही कॅमेऱ्याला योग्य 'अँगल' मिळेल अशा जागी हजर असतात? अगदी थोडी मूठभर मंडळी तावातावाने घोषणा देतात, एखाद दुसरा टायर किंवा मोडकेतोडके वाहन जाळले जाते, त्या सगळ्याचा व्हिडिओ शूट केला जातो. दहा-पंधरा मिनिटांतच सगळा खेळ आटोपतो; मंडळी विखुरतात, पण तो व्हिडिओ नंतर चॅनलवर पुनःपुन्हा झळकत राहतो. चित्र असे