पान:निवडक अंतर्नाद.pdf/४८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्माण होते की जणू सारे रान पेटून उठले आहे. म्हणजे मग पडद्यावरची बरीचशी निदर्शने, बरेचसे 'हल्लाबोल' स्टंटबाजीचाच एक प्रकार म्हणायचा? काही 'मिडिया-सॅव्ही' मंडळींनी व्यक्तिगत अजेंड्यानुसार घडवून आणलेला ? इव्हेंट मॅनेजमेंट ? हा विचार मनात आला आणि मग त्या पाठोपाठ आणखीन एका शंकेचा किडा मनात घुसला असे वाटले, की महत्त्वाचे मानले गेलेले आणि अगदी इतिहासातही नोंद होणारे अनेक व्यापक लदेही वास्तवापेक्षा असल्या प्रतिमांवरच आधारित असतात का? उदाहरणार्थ, आणीबाणीविरुद्धचे देशातील आंदोलन? त्या आंदोलनात आमच्यासारखे जे कमी-अधिक प्रमाणात सहभागी झाले होते त्यांच्या दृष्टीने तो अगढ़ी रोमांचकारक, मंतरलेला काळ होता. हे आंदोलन म्हणजे जणू दुसरे स्वातंत्र्ययुद्धच आहे, अशीच आमची प्रामाणिक भावना होती, पण पुढे एक काळ असाही आला, की हे सगळे आंदोलन चुकीच्या समजुतींवर आधारलेले होते की काय, अशी आमच्यापैकी काहींना शंका येऊ लागली. आणीबाणीतील अत्याचारांची चौकशी करण्यासाठी नंतर नेमलेल्या शहा कमिशनलाही अत्याचारांचे विशेष कुठचे आरोप सिद्ध करता आले नव्हते, बरेचसे आरोप कब से ल सांस्कृतिका अतनाद मार्च २०४९ रुपये ५ मार्च २०११ (चित्रकार जयप्रकाश जगताप) म्हणजे केवळ अफवाच निघाल्या होत्या. आणीबाणीविरोधी आंदोलकांचे जे 'हिरो' होते, तेही स्वतः नंतर पोकळ आणि भ्रष्टच निघाले. विरोधी पक्षांचे सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. आणि पुढे यथावकाश जनतेनेही पुन्हा काँग्रेसलाच प्रचंड बहुमताने निवडून देऊन इंदिराजींच्या निरपराधित्वावरच जणू शिक्कामोर्तब केले होते. मग त्या सगळ्या अत्याचाराच्या घटनांचे काय - ज्या आम्ही गुप्त पत्रकांत छापून मोठ्या धाडसाने एकमेकांकडे पोचवत होतो? ते सगळे अत्याचार आरोप केवळ अतिरंजित होते? त्या केवळ अफवा - म्हणजे एक प्रकारच्या प्रतिमाच होत्या? त्यांच्यावरच विश्वास ठेवून आम्ही त्या आंदोलनात उतरलो होतो ? लोकशाहीसाठी लढतो आहोत असे म्हणताना नकळत कुणाच्या तरी हातची बाहुली बनून गेलो होतो ? मुळात परिस्थिती तेवढी वाईट नव्हतीच? बहुसंख्य लोकांचा आणीबाणीला फारसा विरोध कधी नव्हताच? टीव्ही बघता बघता हे सगळे प्रश्न मनात आले आणि मग अस्वस्थ वाटू लागले. पडद्यावरच्या प्रतिमा मोठ्या अद्भुत असतात. बघता बघता आपल्याला कुठून कुठे घेऊन जातात, (मार्च २००८) सांस्कृतिक मू अंतनाद अंक २०१८ दिवाळी २०१८ (चित्रकार सुभाष कुलकर्णी) निवडक अंतर्नाद ४८१